world news – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Fri, 02 Dec 2022 12:48:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg world news – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 ‘हा’ ठरला जगातील पहिला दुष्काळी भाग, लोकांना खोदून काढावं लागतंय पाणी… https://www.batmi.net/it-became-the-first-drought-region-in-the-world-people-have-to-go-wild-for-water/ https://www.batmi.net/it-became-the-first-drought-region-in-the-world-people-have-to-go-wild-for-water/#respond Fri, 02 Dec 2022 12:48:07 +0000 https://www.batmi.net/?p=28717 तिसरं विश्वयुद्ध हे पाण्यासाठीच होणार हे आपण नेहमीच ऐकत असतो .पाण्याशिवाय जगायचा आपण विचारही केला कि अंगाला काटी येतात. आता विचार करा कि पाणी नसेल तर तुम्ही काय कराल? हा विचारही किती भयानक आहे. (It became the first drought region in the world, people have to go wild for water…)

अशीच भयावह परिस्थिती दक्षिण आफ्रिकेचा देश मैडागास्कर वर आलीये. इथले लोक सध्या मोठ्या दुष्काळाचा सामना करत आहे. इथल्या लोकांचे जीवन हे शेतीवर निर्भय आहे.

पण पाऊस नसल्यामुळे, दुष्काळामुळे जगायचं कस? प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही, अश्या परिस्थितीत गाव सोडून शहराकडे जाण्याशिवाय त्या लोकांकडे पर्याय नाही.

पूर्ण कोरडी पडलेली मनंमबोहो नदी तिथे राहणाऱ्या लोंकाना खोदून तिथंन पाणी काढावं लागतंय, इतकच नाही तर पोटाची भूक शांत करायसाठी काटेरी कच्चे कॅक्टस फळ खाऊन ते स्वतःचा गुजारा करत आहेत.

हेही फळ शोधायसाठी त्यांना वन वन फिरावं लागत, फळ तोडताना हातात काटे घुसतात, पाण्याचा शोधात जीव जातोय अश्या परिस्थितीत भविष्याचा विषय तर दूरच पण आपल्याला उद्या खायला फळ आणि प्यायला पाणी मिळेल का? आणि कुठे, कसं या विचारात ते जगत आहेत.

अनेकांचे मृत्यू झाले. मुलं कुपोषित झालेत, असं म्हटलं जातंय की अशी परिस्थिती जगात याआधी कुठेही पाहायला मिळाली नाही. संयुक्त राष्ट्रने याला जलवायू परिवर्तनामुळे आलेला जगातील पहिला दुष्काळ असं म्हटलं आहे.

जंगलतोड ,लोकसंख्या वाढीमुळे आणि पाश्चिमात्य देशांच्या कार्बनने भरलेल्या जीवनशैलीमुळे. आज तिथल्या लोकांचं जीवन हे अतिशय कठीण होऊन बसलय.

]]>
https://www.batmi.net/it-became-the-first-drought-region-in-the-world-people-have-to-go-wild-for-water/feed/ 0 28717