vikram gokhale – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Mon, 28 Nov 2022 06:41:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg vikram gokhale – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 विक्रम गोखले यांना वडिलांकडूनच लाभला होता समाजसेवेचा वसा… https://www.batmi.net/vikram-gokhale-got-the-fortune-of-social-service-from-his-father/ https://www.batmi.net/vikram-gokhale-got-the-fortune-of-social-service-from-his-father/#respond Mon, 28 Nov 2022 06:41:12 +0000 https://www.batmi.net/?p=28537 चित्रपट सृष्टीतील एक दिग्गज आणि नावाजलेलं नाव, एक वादळी व्यक्तीमत्व म्हणजेच , विक्रम गोखले. चित्रपट असो ,मालिका असो किव्हा नाटक आपल्या अप्रतिम अभिनयानं आणि दमदार आवाजानं लोकांना मोहून टाकणारे अप्रतिम कलाकार विक्रम गोखले आज शरीरानं जरी ते या रंगभूमीपासून दूर झाले असले, तरी जोपर्यंत मराठी रंगभूमी आणि चित्रपट आहेत तो पर्यंत विक्रम गोखले हे नाव पुसले जाणार नाही.पण विक्रम गोखले या नावामागे खूप मोठा इतिहास आहे. आणि हा इतिहास काय हेच आज आपण जाणून घेणार आहोत. (Vikram Gokhale got the fortune of social service from his father)

गोदावरी चित्रपटात वयाची 77 वर्षे उलटेलेल्या विक्रम गोखले या अभिनेत्याचे तरुण पणातले चित्रपट ज्यांनी पाहिले असतील त्यांना त्यांची मोहिनी किती होती हे माहिती असेल . अत्यंत देखणा, रुबाबदार असा हा अभिनेता चित्रपटात आला, आणि चित्रपटातील अभिनेत्यांची व्याख्याच बदलून गेला.

पण हे सर्व वाटतं तेवढं सोप नव्हतं. विक्रम गोखले या नावामागे खूप मोठा इतिहास आहे. अगदी पणजी, आजी, बाबांपासूनचा विक्रम गोखले यांना घरातून अभिनयाचा, अगदी पिढीजात वारसा मिळाला. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या अभिनेत्री होत्या.

जेव्हा चित्रपट हे माध्यम नुकतच जन्माला आलं होतं, तेव्हाची ही गोष्ट तेव्हा तर चित्रपट दूर, पण नाटकातही महिलांना भूमिका करता येत नसत. त्या काळी दुर्गाबाई कामत यांनी ही क्रांती केली. विक्रम गोखले यांच्या आजी कमलाबाई गोखले म्हणजे, लग्ना आधीच्या कमलाबाई कामत या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या.

1913 मध्ये दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांच्या मोहिनी भस्मासूर नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका साकारली. एकूण विक्रम गोखले यांची रोखठोक भूमिका घेण्याची वृत्ती कुठून आली हे स्पष्ट होतच. हे गोखले कुटुंबच तस रोखठोक विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनीही हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली.

या अभिनय संपन्न घरात विक्रम गोखले यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1947 रोजी पुण्यात झाला. पणजी, आजी, आणि वडीलांचा हा अभिनयचा वारसा विक्रम गोखले यांच्याकडे आला. आणि तो त्यांनी अप्रतिम रित्या पुढे आणला . यासोबत विक्रम गोखले हे नाव अनेक धर्मदाय संस्थांबरोबरही जोडल गेलं आहे.

या गोष्टीचा त्यांनी कधीच जाहीर उच्चार केला नाही, हे आणखी एक त्याचं वैशिष्ट. धर्मादाय संस्था, अपंग सैनिकांना मदत करणारी संस्था यासोबत ते जोडले होते. शिवाय अनाथ मुलांची काळजी आणि अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतही त्यांनी दिली आहे.अभिनयच नाही तर सामाजिक कार्यात गोखले कुटुंब नेहमीच पुढे होत.

विक्रम यांचे वडील चंद्रकांत गोखले दरवर्षी युद्धात अथवा सीमेवर जखमी झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांसाठी १ लाख रुपयांची आर्थिक मदत करायचे. त्यासाठी त्यांनी बँकेत ठराविक रक्कम ठेवलेली होती. त्या रक्कमेवरील येणाऱ्या व्याजातून ही आर्थिक मदत ते करायचे. परंतु काळानुरूप व्याजदर कमी झाल्यानंतर चंद्रकांत गोखले यांनी काटकसरीनं रहायला सुरुवात केली आणि पै न् पै वाचवत त्यातून अव्याहत मदत केली.

वडिलांचा हाच कित्ता विक्रम यांनीही गिरवला. इतकंच नाही तर त्यांनी आपली आजी कमलाबाई यांच्या नावानं ट्रस्टची स्थापना केली. ट्रस्टच्या माध्यमातून आदिवासी मुलांच्या कल्याणासाठी काम केलं जायचं. तसंच अपंग मुलांचं पुनर्वसन केलं जातं.आणि समाजसेवेचा हा वारसा विक्रम गोखले यांनी देखील चालवला उतारवयात ज्येष्ठ कलाकारांची फरफट होते.

त्यामुळे त्यांच्यासाठी काही तरी करावं असं विक्रम गोखले यांच्या मनात होतं वृद्धापकाळात कलाकारांना हक्कच घर मिळावं यासाठी त्यांनी काही महिन्यांपूर्वी पुण्यातील दोन एकर जमीन मराठी चित्रपट महामंडळाला दान केली होती. विक्रम गोखले यांनी जवळपास 80 हून अधिक चित्रपटात भूमिका केल्या. मराठी, हिंदी चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि नाटकं अशा सर्व क्षेत्रात त्यांचा वावर होता.

अगदी तरुण वयापासून सुरु केलेला हा अभिनयाचा प्रवास अगदी वयाच्या ७७ व्या वर्षापर्यंतही कायम होता. त्यांच्याबरोबर ज्यांनी रंगभूमीवर प्रवेश केला, ते कधीच रंगभूमीपासून दूर झाले. पण विक्रम गोखले यांची नाळ कायम अभिनयाबरोबर जोडली गेली. यामागे प्रमुख कारण म्हणजे त्यांची प्रचंड शिस्त. दिलेली वेळ पाळण्याची वृत्ती आणि अभिनयाचं खणखणीत नाणं.

हे सर्व त्यांनी त्यांच्या शेवटच्या चित्रपटापर्यंतही पाळलं. आपली भूमिका स्पष्टपणे मांडतांना त्यांनी कोणताही आडपडदा वापरला नाही. ती भूमिका राजकीय असो वा सामाजिक.अशे विक्रम गोखले हे आपल्या पासून दूर गेले असतील पण फक्त शरीराने पण मराठी रंगभूमीत त्यांचा वावर नेहमी आपल्या सोबत असणार आहे.

]]>
https://www.batmi.net/vikram-gokhale-got-the-fortune-of-social-service-from-his-father/feed/ 0 28537