tukaram mundhe – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Tue, 06 Dec 2022 05:41:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg tukaram mundhe – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 28 वर्षात 52 बदल्या, यांना मानले जाते हरियाणाचे ‘तुकाराम मुंढे’… https://www.batmi.net/with-52-transfers-in-28-years-he-is-considered-the-tukaram-mundhe-of-haryana/ https://www.batmi.net/with-52-transfers-in-28-years-he-is-considered-the-tukaram-mundhe-of-haryana/#respond Tue, 06 Dec 2022 05:41:08 +0000 https://www.batmi.net/?p=28805 तुकाराम मुंडे हे नाव अगदी सर्वांच्याच परिचयाचं आहे. शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ अशी त्यांची ओळख. त्यांच्या कामासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या १६ वर्षाच्या कार्यकाळात १५ पेक्षाही जास्त बदल्या झाल्या आहेत. (With 52 transfers in 28 years, he is considered the ‘Tukaram Mundhe’ of Haryana.)

कदाचित इतक्या बदल्या होणारे हे एकमात्र आयएएस अधिकारी आहेत असे तुम्हाला वाटत असेल, तर असे नाही. तुकाराम मुंडेंप्रमाणेच देशात एक असे आयएएस अधिकारी आहेत ज्यांच्या २८ वर्षांच्या कार्यकाळात ५२ वेळा बदल्या झाल्यात. हरियाणात काँग्रेसचं सरकार हलवून सोडणारे हे आयएएस अधिकारी कोण आहेत? हेच जाणून घेऊयात.

अशोक खेमका या नावाची चर्चा माध्यमांवर कायम ऐकायला मिळते, पण हे नाव सर्वात जास्त चर्चेत आल होत. जेव्हा त्यांनी हरियाणात काँग्रेसचं सरकार असतांना, सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांना अडचणीत आणलं होत, आणि संपूर्ण गांधी कुटुंबाचं टेन्शन वाढवलं होत. आता हे प्रकरण नेमकं काय होत? हे तर पुढे जाणून घेणारच आहोत.

मात्र त्यापूर्वी अशोक खेमका कोण आहेत हे जाणून घेऊयात. अगदी तुकाराम मुंडेंप्रमाणेच कडक शिस्त आणि कर्तव्यनिष्ठ असा अशोक खेमका यांचा उल्लेख केला जातॊ, त्यांची बदली कुठेही होऊ द्या त्याजागेवर ज्याची सरकार असेल. त्या मंत्राच्या टेन्शनमध्ये वाढ होते हे नक्की.

कलकत्ता चे असणारे अशोक खेमका यांनी आईआईटी खड़गपुर आणि टाटा इंस्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च इथून आपले शिक्षन पूर्ण केले. ते १९९१ साली क्वालिफाय झालेल्या बॅच चे आयएएस ऑफिसर आहेत. खेमका यांच्या २८ वर्षांच्या नौकरीत त्यांची तब्बल ५२ वेळा बदली करण्यात आली.

म्हणजे तस पाहायला गेलं तर प्रत्येक सहा महिन्यात त्यांची बदली झाली. हा रेकॉर्डच म्हणावं लागेल, कारण यामुळेच त्यांना ‘ट्रान्स्फरमैन’ म्हणून देखील ओळखले जाते. ही २०१२ ची गोष्ट आहे, हरियाणा मध्ये जेव्हा काँग्रेस सरकार होती, तेव्हा सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यावर अशोक खेमका यांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते.

यात रॉबर्ट वाड्रा आणि रीयल एस्टेट कंपनी डीएलएफ मध्ये झालेला जमिनीचा करार त्यांनी रद्द केला होता. अगदी याच काळापासून त्यांचे कायम ट्रान्स्फर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अगदी राजनेता असो, जज असो की कुठला संसद असो ते प्रत्येकासमोर आपली ठोस बाजू मांडतांना दिसतात, आणि यामुळेच त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो हेही खरे.

कधी हे आव्हान बदल्यांच्या रूपात समोर येतात तर कधी त्यांच्याविरोधात चार्जशीट देखील लावली जाते. एकदा तर एका अधिकाऱ्याने खेमका यांची सरकारी गाडी देखील हिसकावून घेतली होती, मात्र ते घाबरून न जाता. घर ते ऑफिस चालत ये – जा करायचे.

भ्रष्टाचाराविरोधात आवाज उचलण्यावर अनेकांनी त्यांची प्रशंसा केली मात्र त्यांचा साथ कुणी दिला नाही. त्यांच्या याच संघर्षमयी प्रवासावर एक बायोग्राफी देखील लिहण्यात आली आहे, ज्याचे नाव आहे ‘जस्ट ट्रांसफर्ड. दी अनटोल्ड स्टोरी ऑफ अशोक खेमका’

]]>
https://www.batmi.net/with-52-transfers-in-28-years-he-is-considered-the-tukaram-mundhe-of-haryana/feed/ 0 28805