trending video – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Fri, 09 Dec 2022 10:01:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg trending video – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 लग्नाच्या बोहल्यावर बसण्यापूर्वी नवरदेवाचे हटके आंदोलन, ‘या’ अटींची केली मागणी… https://www.batmi.net/the-bridegrooms-agitation-demanding-these-conditions-before-sitting-on-the-marriage-stool/ https://www.batmi.net/the-bridegrooms-agitation-demanding-these-conditions-before-sitting-on-the-marriage-stool/#respond Fri, 09 Dec 2022 10:01:31 +0000 https://www.batmi.net/?p=28891 लग्नसराईचे दिवस सुरू झालेले आहेत. या दिवसांमध्ये सगळीकडे लग्नाचा उत्साह दिसून येतो. लग्नाच्या प्रसंगाबद्दल चे वेगवेगळे मजेशीर व्हिडीओ हे सोशल मीडियावर आपल्याला व्हायरल होतांना दिसून येते. (The bridegroom’s agitation, demanding ‘these’ conditions before sitting on the marriage stool)

लोक जास्तीस्त जास्त ,विशेष म्हणजे वधू-वरांशी संबंधित व्हिडीओ हे मोठ्या उत्सुकतेने पाहतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो थोडा आगळावेगळा आहे.

कारण येथे एक वर लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच रस्त्यावर बसून आंदोलन करताना दिसत आहे. याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

मिळालेल्या माहितीनुसार हा व्हायरल झालेला व्हिडीओ उत्तराखंड मधला असून. दरड कोसळल्यामुळे काठगोदाम हैदाखान हा रस्ता गेल्या महिन्यामध्ये खचला होता.

अशा परिस्थितीमध्ये या रस्त्याच्या बांधणीसाठी तिथली स्थानिक जनता आणि काँग्रेस नेते आंदोलन करत होते. या दरम्यान, वराची लग्नाची मिरवणूक जात होती.रस्त्याच्या बांधणीच्या मागणीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू होते.

ते पाहून वराने वधूच्या घरी जाण्याच्या ऐवजी तिथेच आंदोलन करत बसला. आणि आंदोलनकर्त्यांसोबत रस्ता बांधणी व दुरुस्त करण्याची मागणी केली.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत या आंदोलनावर बसणार असल्याचे त्याने सांगितले. हा व्हायरल झालेला व्हिडीओ काँग्रेस नेते यशपाल आर्य यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

हा व्हिडीओ प्रचंड नेटकऱ्यांनी बघितला असून त्याला असंख्य लाईक्स सुद्धा मिळात आहे. आणि व्हिडीओवर मजेशीर कमेंट सुद्धा नेटकऱ्यांनी केले आहे.

]]>
https://www.batmi.net/the-bridegrooms-agitation-demanding-these-conditions-before-sitting-on-the-marriage-stool/feed/ 0 28891
तरुणानं भंगारातून बनवली अनोखी स्कुटर, आनंद महिंद्रा यांनी या देशी जुगाडाचं केलं कौतुक… https://www.batmi.net/a-unique-scooter-made-by-a-young-man-from-scrap-anand-mahindra-appreciated-this-indigenous-experiment/ https://www.batmi.net/a-unique-scooter-made-by-a-young-man-from-scrap-anand-mahindra-appreciated-this-indigenous-experiment/#respond Fri, 09 Dec 2022 05:55:18 +0000 https://www.batmi.net/?p=28887 आनंद महिंद्रा हे नाव सगळ्यांच्याच परिचयाचं आहे. ते भारतातील प्रसिद्ध उद्योजक असून. हे त्यांच्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते दररोज आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अनेक पोस्ट शेअर करत असतात. (A unique scooter made by a young man from scrap, Anand Mahindra appreciated this indigenous experiment)

त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक खास पोस्ट शेअर केली आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक जुन्या असलेल्या स्कूटरचा वापर करुन सिमेंटच्या गोणी चौथ्या मजल्यावर पोहोचवत आहे.

त्या जुन्या स्कूटरच्या मागच्या चाका जवळ एक दोरी बाधली आहे. फक्त एकचदा त्या स्कुटरला एक्सलेटर दिले कि स्कुटरच्या मागचं चाक फिरते आणि ती दोरी गुंडाळत जाऊन ती गोणी वर जाऊन पोहोचते.

हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रा सुद्धा थक्क झाले. आनंद महिंद्रा यांनी ट्विटर वर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ‘मला वाटतं यासाठी आम्ही यांना ‘पॉवर ट्रेन’ असं म्हणतो.

वाहन इंजिनाच्या पॉवरचा वापर करण्याच्या अनेक पद्धती आहेत. ई स्कूटरसोबत हे आणखी सोपं होईल. ई स्कूटरची प्रोडक्शन कॉस्ट कमी झाली किंवा सेकंड हँड उपलब्ध झाल्या की सांगायला नको.

हा व्हिडीओ अपलोड झाल्या झाल्याच हजारो लोकांनी तो बघितला. आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याच्यावर कमेंट करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत.

]]>
https://www.batmi.net/a-unique-scooter-made-by-a-young-man-from-scrap-anand-mahindra-appreciated-this-indigenous-experiment/feed/ 0 28887
अजित पवारांची ऑफर वसंत मोरे स्वीकारणार का? मनसेतील नाराजीवर स्पष्टचं जाहीर केलं मत… https://www.batmi.net/will-vasant-more-accept-ajit-pawars-offer-a-clear-vote-was-announced-on-the-displeasure-in-the-mns/ https://www.batmi.net/will-vasant-more-accept-ajit-pawars-offer-a-clear-vote-was-announced-on-the-displeasure-in-the-mns/#respond Fri, 09 Dec 2022 05:20:36 +0000 https://www.batmi.net/?p=28873 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुण्यातील आक्रमक आणि धडाकेबाज चेहरा म्हणून वसंत मोरे यांच्याकडे पाहिले जाते. मात्र ते गेल्या काही महिन्यांपासून पक्षाच्या काही भूमिकांवर नाराज असल्याची चर्चा रंगतेय. (Will Vasant More accept Ajit Pawar’s offer? A clear vote was announced on the displeasure in the MNS)

त्यामुळे वसंत मोरे आता मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या.

अशात विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी वसंत मोरे यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याची चर्चा हि राजकीय वर्तुळात सुरु आहे.

ज्यावर खुद्द वसंत मोरे यांनी स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.अजित पवार यांनी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिल्याची बाब त्यांनी मान्य केली.

मी सध्या मनसेतच आहे. पण अलीकडे मला पक्षसंघटनेतील लोकांकडून त्रास देण्याचा प्रकार सुरु असल्याचेही वसंत मोरे यांनी सांगितले. त्यामुळे वसंत मोरे भविष्यात मनसेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होणार का, हा प्रश्न पुन्हा समोर येतोय.

वसंत मोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले पुण्यातील एका लग्नात अजित पवारांनी मला आवाज दिला आणि दादा म्हणाले, अरे तात्या किती नाराज…आता या आमच्याकडे… मी वाट बघतोय.

लग्नातून जाताना हि अजित पवार पुन्हा म्हणाले, वसंतराव मी वाट बघतोय… आपल्याला भेटायचं आहे. अजित दादाच्याविधानावर मी होय असं म्हटलं . मला वाटत कि , हा मी केलेल्या कामाचा गौरव असल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलं.

या सगळ्या घडामोडींमुळे वसंत मोरे हे मनसेतून बाहेर पडणार, अशा चर्चा सुरु आहेत. याविषयी वसंत मोरे यांना विचारले असता, मी अजूनही मनसेतच असल्याचे त्यांनी सांगितले.

मला अजून तरी राजसाहेब प्रिय आहेत. परंतु, आता मला पक्षातील बाकीच्यांचा त्रास जाणवू लागला आहे. पूर्वी जो त्रास होत नव्हता, तो आता जाणवत आहे.

मला स्टेजवर बोलवायचे आणि बसवून ठेवायचे, मी काय शो पीस नाही ना, असा संतप्त सवाल वसंत मोरे यांनी विचारला. त्यांच्या या टीकेचा रोख नेमका कोणाच्या दिशेने होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मात्र, वसंत मोरे यांच्या बोलण्याचा एकूण सूर पाहता भविष्यात ते वेगळा विचार करण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.

]]>
https://www.batmi.net/will-vasant-more-accept-ajit-pawars-offer-a-clear-vote-was-announced-on-the-displeasure-in-the-mns/feed/ 0 28873
बंद लिफ्टमध्ये अडकल्या ३चिमुकल्या, या व्हिडीओवरून पालकांनी वेळीच सावध व्हायला हवे… https://www.batmi.net/parents-should-be-alert-after-watching-this-video-of-3-children-stuck-in-a-closed-lift/ https://www.batmi.net/parents-should-be-alert-after-watching-this-video-of-3-children-stuck-in-a-closed-lift/#respond Thu, 08 Dec 2022 11:30:37 +0000 https://www.batmi.net/?p=28865 प्रत्येक इमारतीमध्ये लिफ्ट असते. याचा वापर प्रत्येक जण करत असतात, का तर वेळ आणि एनर्जी वाचावं म्हणून हो ना… पण लिफ्ट जितकी उपयोगी ठरू शकते तितकीच ती धोकादायक सुद्धा असू शकते हे सुद्धा तितकेच खरे. (Parents should be alert after watching this video of 3 children stuck in a closed lift)

वयस्कर असो या छोटी मुले याचा पुरेपूर वापर करत असतात. पण जर लिफ्ट बंद पडली आणि लिफ्ट मध्ये अडकलो तर… विचार करून सुद्धा भीती वाटत ना, या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ मध्ये अशीच एक लिफ्ट बंद पडली.

त्यामध्ये चक्क तीन छोट्या मुली अडकल्या. हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ गाझियाबाद मधला असून . या व्हायरल व्हिडीओ मध्ये तीन लहान मुली अडकल्याचे दिसत आहे.

तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट अचानक बंद पडल्याने त्या मुली घाबरल्या असून सुद्धा त्या एकमेकींना धीर देत असल्याचे चित्र या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळत आहे.

या मुलींचे अश्या परिस्थितीमध्ये सुद्धा एकमेकींना न घाबरता धीर देण्याचे आणि तिथून बाहेर पडण्याचे प्रयत्न पाहून नेटकरी त्यांचे कौतुक करत आहे.

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी पालकांना याबाबत सावध होण्याचे आवाहन केले आहे. तर भविष्यात अशी परिस्थिती उद्भवल्यास त्यातून काही गंभीर परिणाम होऊ नयेत.

यासाठी पालकांनी काळजी घेण्याच आणि लहान मुलांना लिफ्टमध्ये एकटे न पाठवण्याचा सल्ला नेटकऱ्यांनी दिला आहे. तर काहींनी लिफ्टमध्ये लिफ्टमॅन असणे आवश्यक आहे, अशी मागणी केली आहे.

]]>
https://www.batmi.net/parents-should-be-alert-after-watching-this-video-of-3-children-stuck-in-a-closed-lift/feed/ 0 28865
गौतमी पाटील च्या लावणीने पुन्हा राडा, पोलिसांनी तिलाच बसवलं गाडीत… https://www.batmi.net/the-dance-performed-by-gautami-patil-created-chaos-againthe-police-put-her-in-the-car/ https://www.batmi.net/the-dance-performed-by-gautami-patil-created-chaos-againthe-police-put-her-in-the-car/#respond Thu, 08 Dec 2022 11:20:39 +0000 https://www.batmi.net/?p=28859 लावणी ही पूर्वीपासूनच लोकांना आवडत आली आहे. लावणी मध्ये केलेलं नृत्य हे सगळ्यांच्या मनाला भावून जाणारे असते. पण लावणीच्याच नावावर अश्लीलतिचे प्रदर्शन करणे हे काही योग्य नाही. (The dance performed by Gautami Patil created chaos again,The police put her in the car)

हो ना… नुकतेच लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करण्याच्या वादावरून गौतमी पाटील हे नाव सध्या खूप चर्चेत आले आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तिने अंगावर पाणी ओतले होते.

सोबतच विभत्स हावभाव करून नाचताना गौतमीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यावरून सुरु झालेला वाद पुढे खूपच चिघळला गेला.

अलीकडेच गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन एकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते. आता याच पाठोपाठ खंडोबा यात्रेदरम्यान पुन्हा एकदा गौतमीच्या लावणीच्या वेळी धुडगूस पाहायला मिळाली आहे.

तुळजापूर तालुक्या मधील वडगाव येथे खंडोबा यात्रेदरम्यान गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये गौतमीची एक झलक पाहण्यासाठी अनेकजण झाडावर चढून बसलेले होते.

गौतमीची लावणी सुरु झाली आणि गर्दीला असा जोश चढला की त्यामुळे पुन्हा एकदा चेंगराचेंगरी झाली. गर्दीला थांबवण्यासाठी तिथे पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

दरम्यान या गर्दीतून बाहेर पडताना गौतमीच्याही नाकी नऊ आले. गौतमीला बाहेर काढण्यासाठी तिला पोलिसांनी चक्क गाडीत बसायला सांगितले आणि मग त्या चाहत्यांमधून तिची सुटका झाली.

गौतमी पाटील ही कितीही हिट असली तरी त्याचे कारण तिचा उत्तम डान्स नव्हे अश्लील स्टेप व अंगविक्षेप आहेत असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

गौतमी तिच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते ज्यावर लाखो व्ह्यूज असूनही त्यावर वाईट कमेंट्स देखील असतात.

]]>
https://www.batmi.net/the-dance-performed-by-gautami-patil-created-chaos-againthe-police-put-her-in-the-car/feed/ 0 28859
विद्यार्थ्यांसमोर शिक्षिकेचा भोजपुरी गाण्यावर डान्स, नेटकरी करत आहेत ट्रोल… https://www.batmi.net/teacher-dances-on-bhojpuri-song-in-front-of-students-users-are-trolling-her/ https://www.batmi.net/teacher-dances-on-bhojpuri-song-in-front-of-students-users-are-trolling-her/#respond Thu, 08 Dec 2022 11:08:05 +0000 https://www.batmi.net/?p=28855 सोशल मीडियावर रोज एक वेगवेगळा आणि नवा ट्रेंड येत असतो. इंस्टाग्राम वर भन्नाट व्हिडीओ पोस्ट केले जात असतात. काही दिवसांपूर्वी मेरा दिल ये पुकारे आजा.. वरील एका पाकिस्तानी मुलीचा व्हिडीओ प्रचंड सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. (Teacher dances on Bhojpuri song in front of students, users are trolling her)

नेटकऱ्यांनी याच गाण्यावर अनेक व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट आणि शेअर केले होते. आता एक भोजपुरी गाणे पतली कमरिया मोर हाय. चे रिमिक्स गाणे बनवून त्यावर नेटकरी व्हिडीओज बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.

यात शिक्षिकेचा सुद्धा समावेश आहे. @गुलझार_साहब या ट्विटर हँड्लर ने एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांसमोर पतली कमरिया मोर हाय या गाण्यावर केलेला डान्स चा व्हिडीओ ‘लहानपणी असे शिक्षक का मिळाले नाहीत’ असे कॅप्शन देऊन हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

आतापर्यंत या व्हिडिओला ३ लाखापेक्षा जास्त नेटकऱ्यांनी बघितल आहे. आणि ८ हजाराहून जास्त लाईक्स मिळाले आहेत . आणि यावर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.

प्रत्येकजण इंस्टाग्रामवर व्हिडीओ बनवून पोस्ट करत असतात. मग ते विद्यार्थी असो अथवा शिक्षक. काही नेटकऱ्यांनी या डान्सच्या पोस्ट वर योग्य नसल्याचे सांगितले आहे. मुलांना शिकायला लावा, हाय हाय नाही… अशी कमेंट सुद्धा एका नेटकऱ्यानी केली आहे.

]]>
https://www.batmi.net/teacher-dances-on-bhojpuri-song-in-front-of-students-users-are-trolling-her/feed/ 0 28855
अहो किती घाई…! लग्न ठरून साखरपुडा आटोपला, अन् नवरी – नवरदेव गेले पळून, हे होत कारण… https://www.batmi.net/hey-how-fast-the-marriage-was-arranged-the-engagement-was-over-the-bride-and-the-bridegroom-ran-away-this-was-the-reason/ https://www.batmi.net/hey-how-fast-the-marriage-was-arranged-the-engagement-was-over-the-bride-and-the-bridegroom-ran-away-this-was-the-reason/#respond Thu, 08 Dec 2022 05:44:33 +0000 https://www.batmi.net/?p=28850 लव्ह स्टोरी तर तुम्ही प्रचंड बघितल्या असतील. पळून जाऊन लग्न करण्याच्या सिनेमे आणि न्यूज सुद्धा तुम्ही भरपूर बघितलेले असतील. पण तुम्ही लग्नाला उशीर होतो आहे म्हणून लग्नाच्या जोडप्याला कधी पळून जातांना बघितलं आहे. (Hey how fast…! The marriage was arranged, the engagement was over, the bride and the bridegroom ran away, this was the reason)

होय..हे अगदी खर आहे.. बिहार मध्ये दररोज विचित्र गोष्टी घडताना दिसत असतात. बिहार मधील हटके लव्ह स्टोरी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात.

लग्नाच्या रीतिरिवाजानुसार पहिले साखरपुडा, नंतर हळद आणि मग लग्न होत असते. साखरपुडानंतर लग्नाची जोरदार तयारी सुद्धा सुरू होते. तर काही कपलचं प्रकरण घरच्यांकडून मान्य नसेल, तर ते पळून जाऊन लग्न सुद्धा करत असतात.

मात्र, बिहारमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. तरुण-तरुणीचे लग्न ठरले होते. मात्र लग्नाला उशीर होणार असल्याचे कळताच दोघेही घरातूनच पळून गेले. दोघांच्या लग्नाची बिहारमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

बिहारमधील सारण जिल्ह्यातील पानापूर या गावामध्ये या जोडप्याचे आधीच लग्न ठरले होते. २०२३ च्या मे महिन्यामध्ये हे जोडपं विवाहबंधनात सुद्धा अडकणार होत. त्यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम देखील पार पडला.

मात्र, तरुणाला इतकी कसली घाई होती माहीत नाही, तो तरुणीला घेऊन चक्क फरार झाला. लग्न ठरल्यानंतर हे लव्ह बर्डस एकमेकांशी मोबाईल फोनद्वारे दररोज बोलत होते.

लग्नाला उशीर होणार असल्याचे कळताच त्यांनी घरातून पळून जाण्याचा बेत आखला. मुलीच्या कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांनी मुलीचा शोध सुरू केला.

कोणतीही खबर न मिळाल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार सुद्धा दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास प्रक्रिया सुरु केली व शोध घेतला.

मात्र, पळून गेल्यानंतर हे जोडपं खुद्द त्यांच्या गावी पोहचल. तिथल्या लोकांनी पळून जाण्याचे कारण विचारले असता, तेव्हा तरुणाने सांगितले की, लग्नाची तारीख खूप लांबणीवर आहे. त्यामुळे आम्ही दोघांनी पळून जाण्याचा हा निर्णय घेतला.

आम्हा दोघांना लवकर लग्न करायचे आहे. हे ऐकून संपूर्ण गावाला आश्चर्याचा धक्का बसला. सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलंच व्हायरल होत आहे.

]]>
https://www.batmi.net/hey-how-fast-the-marriage-was-arranged-the-engagement-was-over-the-bride-and-the-bridegroom-ran-away-this-was-the-reason/feed/ 0 28850
भोजपुरी गाण्यावरील तरुणीचा डान्स नेटकऱ्यांना लावतोय वेड, व्हिडिओची सर्वत्र धुमाकूळ… https://www.batmi.net/girls-dance-on-bhojpuri-song-made-netizens-crazy-video-went-viral/ https://www.batmi.net/girls-dance-on-bhojpuri-song-made-netizens-crazy-video-went-viral/#respond Wed, 07 Dec 2022 10:40:35 +0000 https://www.batmi.net/?p=28837 सोशल मीडियावर दररोज डान्सचे नवनवीन अशे प्रचंड व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक कॉलेज मधल्या मुलीचे भोजपुरी गाण्यावर केलेल्या डान्स चा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Girl’s dance on Bhojpuri song made netizens crazy, video went viral)

पतली कमरिया मोर हाय.. या भोजपुरी गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. या गाण्यावर केलेल्या डान्स चे अनेक व्हिडीओ तुम्ही सध्या सोशल मीडियावर बघत असणार.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ मध्ये कॉलेज युनिफार्म घातलेली एक मुलगी भोजपुरी गाणं पतली कमरिया मोर हाय.. यावर अप्रतिम डान्स करतांना दिसती आहे.

तिने काही वेगळ्या स्टेप्स करून लोकांची मन जिंकली आहेत. तसेच या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनला लिहिले आहे कि, हॅप्पी लास्ट क्लास ऑफ कॉलेज.. भोजपुरीच हे गाणं नेटकऱ्यांना फार आवडत आहे.

या गाण्यावरील अनेक डान्स व्हिडीओजना लाखो लाईक्स मिळत आहे. तर हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर @केतकी_शर्मा१ च्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

या डान्स केलेल्या तरुणीच्या व्हिडीओला ४० लाखापेक्षा जास्त लोकांनी बघितल असून व्ह्यूज दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेकांनी तिच्या डान्स च कौतुक करत कमेंट सुद्धा केल्या आहेत.

]]>
https://www.batmi.net/girls-dance-on-bhojpuri-song-made-netizens-crazy-video-went-viral/feed/ 0 28837
चांदीच चांदी…’या’ जोडप्याने व्हराडासाठी अक्ख विमानाचं केलं बुक, व्हिडीओची व्हायरल… https://www.batmi.net/this-couple-booked-a-full-flight-for-the-wedding-guests-the-video-went-viral/ https://www.batmi.net/this-couple-booked-a-full-flight-for-the-wedding-guests-the-video-went-viral/#respond Wed, 07 Dec 2022 10:33:40 +0000 https://www.batmi.net/?p=28833 सध्या सगळीकडे लगीन सराई सुरू आहे. ज्या घरामध्ये लग्न असते तिथे उत्साहाचे वातावरण असते. लग्न म्हटलं तर वर वधू या दोघांकडे हि लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटणे असो. (This couple booked a full flight for the wedding guests, the video went viral)

लग्नातील वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन असो. ते कार्यक्रम सर्वांपेक्षा वेगळे करण्याच्या हटके कल्पना असो. कपड्यांची खरेदी असो. प्री वेडिंग फोटोशूट असो अशा सर्व गोंष्टींची धमाल हि लग्नामध्ये असते.

या सर्व प्रसंगांमध्ये आपले सर्व जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी आपल्या आनंदात सहभागी व्हावेत असे प्रत्येक जोडप्याला वाटत असते. त्यासाठी सर्वांना सोयीस्कर होईल असे ठिकाण, तारीख असे सर्व नियोजन केले जात असतात.

अशाच एका नियोजनाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. लग्नातील वऱ्हाडी मंडळींसाठी चक्क संपूर्ण विमानाचे बुकिंग करण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या हा व्हिडीओ श्रेया शाह या युजरने इन्स्टाग्राम वर शेअर केला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

या व्हिडीओला ९९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘बहिणीच्या लग्नासाठी संपूर्ण विमान बुक केले आहे’ असे लिहिले आहे. या व्हिडीओमध्ये विमानात बसलेली वऱ्हाडीही दिसत आहेत.

]]>
https://www.batmi.net/this-couple-booked-a-full-flight-for-the-wedding-guests-the-video-went-viral/feed/ 0 28833
ऐकावं ते नवलच! पुण्यातील ‘या’ ठिकाणी जमिनीत नव्हे तर झाडाला लागले लबालब बटाटे… https://www.batmi.net/it-will-be-surprising-to-hear-in-this-place-in-pune-potatoes-grew-not-in-the-ground-but-on-trees/ https://www.batmi.net/it-will-be-surprising-to-hear-in-this-place-in-pune-potatoes-grew-not-in-the-ground-but-on-trees/#respond Wed, 07 Dec 2022 10:24:38 +0000 https://www.batmi.net/?p=28829 निसर्गाचे चमत्कार भन्नाट असतात. कधी काय होणार हे कुणालाच ठाऊक नसते. अशीच एक बातमी समोर आली आहे. बटाटा हे जमिनीच्या खाली येणारं पीक आहे. (It will be surprising to hear! In this place in Pune, potatoes grew not in the ground but on trees)

आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष आहे. बटाटा हे तर कंदमुळ म्हणूनच त्याची ओळख आहे. कारण ते जमिनीखाली च उगवतं . पण हिच बटाटे जेव्हा जमिनीच्या वर झाडाला अली तर.

आश्चर्य वाटलं ना.. पण हे अगदी खरं आहे. पुणे जिल्ह्यातच आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर या गावामध्ये चक्क झाडाला बटाटे लागले आहेत. युवा शेतकरी संदीप आणि धनेश पांडुरंग वळसे पाटील यांच्या शेतात असणाऱ्या झाडाला चक्क १८ ते १९ बटाटे लगडले आहेत.

आंबेगाव तालुक्यात बटाटा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. बाजारभावही बटाट्याला चांगला मिळतो. या भागात अनेक ठिकाणी बटाटे काढणीला आले आहेत.

जमिनीत बटाटे येतात तसेच हे बटाटे जमिनीच्या वर आले आहेत. थंडीमुळे जमिनी खालचा बटाटा हिरवा पडतो त्याच प्रमाणे हा बटाटा देखील हिरवा पडला आहे.

बटाटे झाडाला लगडलेले दिसल्याने परिसरात हा कुतूहलाचा विषय होत असून लोकं त्याला बघायला गर्दी करत आहेत. आंबेगाव तालुक्यातीमधील निरगुडसर येथे माळरानावर वळसे पाटील यांची शेती आहे.

साडेतीन एकरमध्ये त्यांनी बटाट्याची लागवड केली असून . बटाटा पीक काढणीला आलेला आहे . अंतिम टप्प्यातील पाला काढण्याचे काम सुरू आहे.

या पाल्याची कापणी करत असताना वळसे पाटील यांना त्यांच्या पिकातील एका झाडाला चक्क बटाटे आलेले दिसले. हे बटाटे त्यांनी पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

कारण एवढे दिवस बटाटे लागवड करत असतांना आतापर्यंत असे काही बघायला त्यांना मिळालेलं नाही. मात्र यावर्षी बटाटा चक्क झाडाला लगडलेले असल्याने त्यांना आश्चर्य वाटले.

]]>
https://www.batmi.net/it-will-be-surprising-to-hear-in-this-place-in-pune-potatoes-grew-not-in-the-ground-but-on-trees/feed/ 0 28829