tirupati balaji temple – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Tue, 29 Nov 2022 06:21:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg tirupati balaji temple – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 तिरुमला तिरुपती देवस्थानाची संपत्ती जाहीर, आकडा ऐकून तुम्हीही व्हाल थक्क… https://www.batmi.net/wealth-of-tirumala-tirupati-temple-announced-you-will-be-shocked-to-hear-the-figures/ https://www.batmi.net/wealth-of-tirumala-tirupati-temple-announced-you-will-be-shocked-to-hear-the-figures/#respond Tue, 29 Nov 2022 06:21:15 +0000 https://www.batmi.net/?p=28607 तिरुमला तिरुपती देवस्थानने शनिवारी एक श्वेतपत्रिका जारी केली. या श्वेतपत्रीकेच्या माध्यमातून त्यांनी तिरुपती बालाजी देवस्थान ट्रस्टकडे असलेली संपत्ती जाहीर केली आहे. यात मुदत ठेवी आणि सोन्याच्या ठेवींसह त्यांच्या मालमत्तेची यादी सुद्धा आहे. तिरुपती बालाजी देवस्थानमध्ये एक लाखापेक्षा जास्त श्रद्धाळू रोज दर्शनाकरिता येत असतात. (Wealth of Tirumala Tirupati temple announced, you will be shocked to hear the figures…)

वार्षिक ब्रम्होत्सव आणि सण यांसारख्या विशेष प्रसंगी भाविकांची संख्या चार ते पाच लाखांपर्यंत वाढते. भाविक येथे प्रसाद म्हणून सोने, चांदी, रोख रक्कम, जमिनींची कागद पत्रे आणि डिमेंट शेअर्स ठेवतात. तर या अनुषंगाने तिरुमला तिरुपती देवस्थानाची संपत्ती किती? तिरुपतीतील तिरुमला मंदिर इतके श्रीमंत कसे? हेच या माध्यमातून आपण थोडक्यात जाणून घेऊयात. तिरुपती बालाजीचं देवस्थान आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आहे.

हे देवस्थान भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान आहे. या देवस्थानात दररोज कोट्यवधी रुपयांचं दान केलं जातं. तिरुमाला तिरुपती देवस्थानाने पहिल्यांदा देवस्थानाच्या एकूण संपत्तीची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार देवस्थानाची कोट्यवधींची संपत्ती बँकेत जमा आहे. जवळपास पाच हजार तीनशे कोटीं, दहा पॉईंट तीन टन सोनं आणि पंधरा हजार नवशे अडतीस कोटी रोख रक्कम राष्ट्रीयकृत बँकेत जमा आहे. देवस्थानची एकूण संपत्ती दोन पॉईंट सव्वीस कोटी इतकी आहे.

ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी एवी धर्म रेड्डी सांगतात की सध्या ट्रस्ट बोर्डने २०१९ पासून आपल्या गुंतवणुकीची मार्गदर्शक तत्वं आणखी मजबूत केली आहे. साल २०१९ पर्यंत अनेक बँकांमध्ये तेरा हजार पंचवीस कोटी रक्कम होती, जी आता वाढून पंधरा हजार नवशे अडतीस कोटी झाली आहे. मागील तीन वर्षात गुंतवणुकीमध्ये एकोणतीशे कोटींची वाढ झाली आहे.

त्याशिवाय २०१९ मध्ये तिरुमाला तिरुपती देवस्थानकडे सात हजार तीनशे एकोणचाळीस पॉईंट चवऱ्यातर टन सोनं होतं, जे मागील तीन वर्षांत दोन पॉईंट नऊ टनने वाढले आहे. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, तिरुपती देवस्थानाची मालमत्ता भारतातील अनेक मोठ्या उद्योगांपेक्षा जास्त आहे. आंध्र प्रदेशातील तिरुमाला तिरुपती देवस्थान देणगीच्या बाबतीत, संपत्तीच्या बाबतीत जगातील सर्वात श्रीमंत देवस्थान आहे. देवस्थानात विविध ठिकाणी सात हजार एकशे तेवीस एकरात पसरलेल्या एकूण नवशे साठ मालमत्ता आहेत.

चांदीपासून ते किमती दगड, नाणी, कंपनीचे शेअर्स आणि इतर प्रॉपर्टी यासारख्या अनेक गोष्टी देवस्थानात दान केल्या जातात. बँकांमध्ये जमा केलेली रोख रक्कम आणि सोन्याची गुंतवणूक अत्यंत पारदर्शक असून ती योग्य पद्धतीने केली जात असल्याचे ट्रस्टने सांगितले. ट्रस्टने शेअर केलेल्या बँक-निहाय गुंतवणुकीनुसार, तिरुमला तिरुपती देवस्थानकडे २०१९ मध्ये सात हजार तीनशे एकोणचाळीस पॉईंट चवर्यात्तर टन सोन्याची ठेव आहे आणि गेल्या तीन वर्षांत दोन पॉईंट नऊ टनांची भर पडली आहे.

स्टेटस नोटमध्ये तिरुमला तिरुपती देवस्थानाने तिरुमला तिरुपती देवस्थानच्या नियमांनुसार सांगितले की, त्यांनी शेड्युल्ड बँकांमध्ये फक्त व्याज दराने गुंतवणूक केली होती. या गुंतवणूकींमुळे, भक्तांच्या दानामुळे आणि यांसारख्या अनेक गोष्टींमुळे तिरुमाला तिरुपती देवस्थान जगातील श्रीमंत देवस्थानांपैकी एक बनले आहे. आणि मंदिराच्या संपत्तीत वाढ होतच राहील असे मंदिर ट्रस्टचे सांगणे आहे.

]]>
https://www.batmi.net/wealth-of-tirumala-tirupati-temple-announced-you-will-be-shocked-to-hear-the-figures/feed/ 0 28607