snake video – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Mon, 05 Dec 2022 12:04:49 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg snake video – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 श्वानाने तोंडात धरला विषारी साप, शेवट जे झालं ते पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही… https://www.batmi.net/a-dog-caught-a-poisonous-snake-in-its-mouth-you-wont-believe-what-happened-in-the-end/ https://www.batmi.net/a-dog-caught-a-poisonous-snake-in-its-mouth-you-wont-believe-what-happened-in-the-end/#respond Mon, 05 Dec 2022 12:04:49 +0000 https://www.batmi.net/?p=28768 माणूसच नव्हे तर प्राण्यांसाठी सुद्धा साप हा जीवघेणा ठरू शकतो हे प्रत्येकाला चांगल्याने ठाऊक आहे. पण एका श्वानाने मात्र सापाशी पंगा घेतल्याचे दिसून आले आहे. (A dog caught a poisonous snake in its mouth, you won’t believe what happened in the end…)

साप दिसताच त्याला आपल्या जबड्यामध्ये धरले आणि त्यानंतर जे घडलं ते भयंकर होत. असं काही घडेल याचा तुम्ही कधीही विचार केला नसेल.

सोशल मीडियावर कुत्रा आणि सापाचा हा धक्कादायक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती गाडीखाली काठी टाकून काहीतरी काढण्याचा प्रयत्न करतो आहे.

त्या व्यक्तीजवळ एक कुत्रासुद्धा दिसतो आहे. काही वेळातच त्या गाडीच्या खालून एक साप खाली पडतो. त्यावेळी कुत्रा गाडीच्या खालीच असतो. जसा साप पडतो तसा क्षणाचाही विलंब न करता कुत्रा त्याच्यावर तुटून पडतो.

त्या सापाला आपल्या जबड्यात धरतो. आता कुत्र्याने सापाला जबड्यात धरलं म्हणजे आता या कुत्र्याचं खरं नाही असंच तुम्हाला नक्की वाटेल. पण प्रत्यक्षात मात्र उलटच घडतं.

कुत्रा त्या सापाला जबड्यात धरून खेचत घेऊन जातो आणि त्याला आपटत राहतो. जोपर्यंत त्याचा जीव जात नाही तोपर्यंत तो आपटत राहतो, पण आपल्या तोंडातून काही सोडत नाही.

हा जॅक रसल प्रजातीचा श्वान आहे. ज्याची सापाशीही लढण्याची क्षमता असते. विषारी सापांनासुद्धा हा श्वान कधीच घाबरत नाही.
ए. एफ. रँच इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. कमेंट मध्ये श्वानाच्या हिमतीला नेटकऱ्यांनी दाद दिली आहे.

]]>
https://www.batmi.net/a-dog-caught-a-poisonous-snake-in-its-mouth-you-wont-believe-what-happened-in-the-end/feed/ 0 28768
सापाला पळवायला महिलेने चप्पल फेकली अन् साप चप्पल घेऊन पळाला… https://www.batmi.net/the-woman-threw-the-slipper-to-the-snake-and-the-snake-ran-away-with-the-slipper/ https://www.batmi.net/the-woman-threw-the-slipper-to-the-snake-and-the-snake-ran-away-with-the-slipper/#respond Mon, 28 Nov 2022 06:58:03 +0000 https://www.batmi.net/?p=28545 साप म्हटलं कि प्रत्येकाच्या अंगावर शहारे येतात. त्याच्या समोरसुद्धा जायला काहींना हिंमत नसते. सापाला पाहताच अनेकांची घाबरगुंडी उडते. पण या वायरल झालेल्या व्हिडीओला बघून चक्क तुम्ही पोट धरून हसणार. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. (The woman threw the slipper to the snake and the snake ran away with the slipper…)

हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी ट्विटर वरती शेअर केला या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की सापाला घराच्या पायऱ्यांवर आलेले बघून एका महिलेने त्याला हकलवण्यासाठी पायातील चप्पल घेऊन मारली. मात्र, साप ती चप्पलच तोंडात पकडून पळतांना दिसतो आहे. साप चप्पल घेऊन जाताना पाहून महिला त्याला ऐ…ऐ करत असल्याचे दिसून येत आहे.

परवीन कासवान यांनी व्हिडीओ शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, साप या चप्पलेचे नक्की करणार काय? त्याला तर पायही नाही आहेत.या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लोकांनी बघितले आहे.

याला चांगलेच व्ह्यूज मिळाले असून लोक त्यावर आपल्या प्रतिक्रिया सुद्धा मांडत आहेत. एकाने तर म्हटलंय, हा नक्कीच बिहारचा साप असावा, इथला नेता किंवा साप रिकाम्या हाती कधीच जात नाहीत. हा व्हिडीओ कुठचा आणि कधीचा आहे हे अद्यापहि कळलेलं नाही.

]]>
https://www.batmi.net/the-woman-threw-the-slipper-to-the-snake-and-the-snake-ran-away-with-the-slipper/feed/ 0 28545