shraddha walker – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Wed, 30 Nov 2022 05:12:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg shraddha walker – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबवर हल्ल्याचा प्रयत्न, दोघांना घेतले ताब्यात… https://www.batmi.net/attempted-attack-on-accused-aftab-in-shraddha-murder-case-two-arrested/ https://www.batmi.net/attempted-attack-on-accused-aftab-in-shraddha-murder-case-two-arrested/#respond Wed, 30 Nov 2022 05:12:58 +0000 https://www.batmi.net/?p=28636 श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याला घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनवर सोमवारी रोहिणीतील  एफएसएल बाहेर काही जणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. (Attempted attack on accused Aftab in Shraddha murder case, two arrested)

त्यांच्या हातात तलवारी होत्या. हल्लेखोरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी रिव्हॉल्व्हर बाहेर काढले. मात्र, गोळीबार केला नाही.यातील दोन हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले असून एका हल्लेखोराने सांगितले की १५ लोक गुरुग्राममधून आले होते.

सकाळी ११ वाजल्यापासून एफएसएलच्या बाहेर घात घालून बसले होते. या लोकांनी कारमध्ये अनेक तलवारी आणि हातोडे सुद्धा आणले होते. तो पुढे म्हणाला कि आमच्या बहिणीचे आणि मुलीचे ३५ तुकडे करणार्‍या आफताबचे ७० तुकडे करायला आम्ही आलो होतो.

हे हल्लाखोर आफताबला व्हॅनमधून उतरवण्याचा प्रयत्न करत होते. एकाने तर पोलिस व्हॅनचा दरवाजाही उघडला होता.
श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर दिल्ली पोलीस सतर्क झाले आहेत.

तिहारमध्येही सुरक्षा वाढवण्यात आली असून .व्हॅनवर हल्ला करणाऱ्या आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर उर्वरितांचा शोध सुरू आहे.

]]>
https://www.batmi.net/attempted-attack-on-accused-aftab-in-shraddha-murder-case-two-arrested/feed/ 0 28636
श्रद्धा वालकर हत्याकांड खरंच लव्ह जिहादचं प्रकरण आहे का? https://www.batmi.net/is-shraddha-walker-murder-really-a-case-of-love-jihad/ https://www.batmi.net/is-shraddha-walker-murder-really-a-case-of-love-jihad/#respond Mon, 28 Nov 2022 13:06:46 +0000 https://www.batmi.net/?p=28586 मुंबईच्या वासइ येथे राहणाऱ्या तरुणीची तिच्या प्रियकराने दिल्लीत हत्या केली. या हत्येने महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली. हत्येनंतर आरोपीने मुलीच्या शरीराचे तब्बल ३५ तुकडे केले. दिल्ली पोलिसांनी बर्याच महिन्यानंतर ही केस सोडवली, आणि अनेक धक्कादायक खुलासेही केले. आता या हत्येला लव जिहादचेही नाव देण्यात येत आहे. हे नेमकं प्रकरण काय? आणि हत्येमागे आरोपीचा नेमका उद्देश काय होता? खरंच हे लव जिहाद च प्रकरण आहे का? हेच आपण सविस्तर जाणून घेऊयात. (Is Shraddha Walker murder really a case of love jihad?)

श्रद्धा वालकर असे हत्या झालेल्या तरुणीची नाव आहे, तर आफताब पुनावाला असे आरोपी बॉयफ्रेंडचे नाव आहे. या दोघांची ओळख झाली ती एका डेटिंग ऍप वरून, दोघेही कॉल सेंटर वर एकत्र काम करू लागले. श्रद्धा ने घरच्यांना तिच्या आणि आफताब च्या प्रेम संबंधांबद्दल सांगितले, मात्र या नात्याला घरच्यांचा पूर्णतः विरोध होता.

त्यामुळे श्रद्धा आणि आफताब यांनी लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला, पुढे दोघेही दिल्ली येथेच लिव्ह इन मध्ये राहू लागले. श्रद्धा कायम त्याला लग्नाची मागणी घालायची आणि तो तिला नकार द्यायचा, यावरूनच त्यांच्यात वाद व्हायचे. एक दिवस हाच वाद विकोपाला गेला आणि आफताब ने श्रद्धाला कायमच संपवलं.

ही हत्या इतकी क्रूर होती, की मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी आफताब ने श्रद्धाच्या देहाचे तब्बल ३५ तुकडे केले. त्याने ३० लिटरचा नवीन फ्रिज विकत घेतला आणि यात हे तुकडे तीन आठवडे ठेवले. कुणाच्या लक्षात येऊ नये याकरिता तो रोज हे तुकडे दिल्लीतील मेहरोली जंगलामध्ये दूरवर नेऊन फेकायचा.

दुर्गंध येऊ नये म्ह्णून अगरबत्ती लावायचा. आणि फ्रिज मधील श्रद्धाच्या मृतदेहाचा चेहरा तो रोज बघायचा, असे धक्कादायक खुलासे पोलिसांनी केले. हे सर्व ऐकून आपल्याही पायाखालची जमीन सरकेल. मात्र हे सगळं त्याने केलं डेक्स्टर नावाची एक वेब्सिरीज बघून, त्याच्या गुगल सर्च हिस्टरी मध्ये देखील पोलिसांच्या हाती अनेक पुरावे लागले.

आता या प्रकरणाचा पत्ता नेमका कसा लागला? तर बर्याच महिन्यांपासून मुलीची काहीच खबर नसल्यामुळे मुलीचे वडील अस्वस्थ झाले, अखेर त्यांनी दिल्लीत येऊन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार केली. मुलीचा शोध सुरु झाला आणि आरोपी बॉयफ्रेंडला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या कठोर चौकशीत आरोपीने आपले तोंड उघडले.

आता मुलीचे वडीलच नव्हे तर अनेक राजनेता देखील हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचं सांगत आहेत. नुकतच भाजप नेते राम कदम यांनी एक ट्विट करत ‘हा खून म्हणजे लव्ह जिहादच प्रकरण आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. आरोपी आफताब एक फूड ब्लॉगर होता, सोशल मीडियावर हाच आफताब, स्त्रीमुक्ती, LGBTQ, खरे स्त्री सौंदर्य यासोबतच लिगभेद सारख्या विषयांवर चर्चा केल्याचे दिसेल.

मात्र या मुखवट्याच्या आड एक हिंसक आणि क्रूर चेहरा आहे हे श्रद्धाला देखील माहित नसेल. म्हणून आजच्या काळात माणसांची पारख अत्यंत महत्वाची आहे. आपण नेहमी म्हणतो की, प्रेम सांगून अथवा ठरवून होत नाही मात्र आपल्याला ज्या व्यक्तीसोबत नवे आयुष्य सुरु करायचे आहे तो खरंच आपल्यावर प्रेम करतो का?, शरीराच्या उपभोगानंतर तो खरंच आपल्या सोबत असेल का? त्याची मनोवृत्ती काय? यांसारख्या गोष्टींचा गहण विचार करायलाच हवा.

या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा मुळात लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेजचा प्रश्न नाहीच. हा प्रश्न आहे योग्य व्यक्ती निवडण्याचा. जन्मदात्यांच्या मर्जीनेच जोडीदार निवडावा अशी सक्ती नसली तरी त्यांच्या अनुभवातून आलेल्या मतांचा विचार करायला हरकत नाही. आफताबने ज्या क्रूरतेने हे अमानवी कृत्य केले आहे, याची कठोर सजा त्याला न्यायालय देईल अशीच अपेक्षा.

]]>
https://www.batmi.net/is-shraddha-walker-murder-really-a-case-of-love-jihad/feed/ 0 28586