sharad pawar – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Wed, 14 Dec 2022 11:45:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg sharad pawar – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 शरद पवार वाढदिवस: पवारांचा पुल आणि ग.दि माडगूळकारांसोबतचा एक गमतीशीर किस्सा… https://www.batmi.net/a-funny-anecdote-with-pawars-bridge-and-g-di-madgulkar/ https://www.batmi.net/a-funny-anecdote-with-pawars-bridge-and-g-di-madgulkar/#respond Wed, 14 Dec 2022 11:45:43 +0000 https://www.batmi.net/?p=28919 शरद पवारांचे अनेक किस्से आपण ऐकले असतील पण साहित्यिक जगताचे मोठे नाव असणारे दोन व्यक्ती, पूल देशपांडे आणि ग. दि. माडगूळकर, यांचं नाव कोणाला माहित नसेल विशेष करून महाराष्ट्रात असा व्यक्ती शोधणं कठीणच आहे. (A funny anecdote with Pawar’s Bridge and g. di. Madgulkar)

तर हेच दोन व्यक्ती बारामतीला आले असता शरद पवारांसोबत यांचा एक गंमतीशील किस्सा घडला. आता हा किस्सा काय होता हेच आज यामध्ये आम्ही तुम्हला सांगणार आहोत तर ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा शरद पवार हे बारामतीतून उदयास येणारे अगदी तरुण राजकीय होते.

साहित्यमंडळातर्फे बारामतीत एक कार्यक्रम घेण्यात येणार होता आणि त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून पूल देशपांडे आणि ग. दि. माडगूळकर येणार होते, आता हे इतके मोठे साहित्तिक आपल्या कडे येणार म्हटल्यावर साहजिक आहे बारामतीकरही अतिशय उत्साहात होते पण सगळ्यात मोठी जबाबदारी ही शरद पवारांवर दिली होती, ते म्हणजे त्या दोघांना आणायची.

आता ही आणायची जबादारी तर चांगली होती पण शरद पवार हे विचारात पडले कारण इतक्या मोठ्या व्यक्तींना आणायचं म्हणजे गाडी लागणारच एसटी मध्ये तर आणता येणार नव्हते आणि त्याहूनही मोठी पंचायत म्हणजे पवारांकडे त्यावेळी गाडी नव्हती. मग करायचं काय.. पवार तर पवारच त्यांनी एका श्रीमंत बागायतदाराला पकडले आणि त्याची गाडी घेतली.

जबाबदारी पार पडली दोघे आले आणि कार्यक्रम छान पार पडला. आता त्या दोघांना परत सोडायसाठी सगळे गाडीत बसले त्यावेळी ज्याची गाडी होती तो बागायतदारही त्या गाडीत होता. त्याला सुद्धा शहरात काहीतरी अर्जंट काम आले म्हणून निघायचे होते तर तोही त्यांच्या बरोबरच निघाला.

आता टिपिकल व्यापारी जसे असतात तसा तो होता. हाताच्या पाचही बोटात सोन्याच्या अंगठया, गळ्यात चेन, जाडजूड, एखाद्या सावली सारखा काळाकुट्ट आता पवारांनी बागायतदाराला दोघांची ओळखी करून दिली . हे पूल देशपांडे आणि ग .दि. माडगूळकर मोठे लेखक आहेत.

असं म्हणत बागायतदारांनी ओळख करून घेतली, आणि मग त्यांच्यात छोट्या मोठ्या गोष्टींच्या गप्पा रंगतच होत्या की बागायतदार महाशयांनी एक मोठा बॉम्बच टाकला. तो म्हणाला , माडगूळकर साहेब आणि देशपांडे साहेब पण नक्की तुम्ही करता काय हो? म्हणजे धंदा पाणी असेल, लेखकाला खरंच पैसे मिळतात का?

तो पोट कस भरतो हा सामान्य माणसांना प्रश्न पडन स्वाभाविकच आहे आणि हे महाशय तर हाडाचे व्यापारी बागायतदार … आता शरद पवारांची काही वेळेसाठी मोठी पंचाईतच झाली कारण ग.दि माडगूळकर हे अति कोपिष्ट तापट स्वभावाचे, हे दोघे काय म्हणेल याचीच जास्त चिंता शरद पवारांना वाटू लागली.

आता काय होणार पवार या विचारातच होते तर पू ल देशपांडे हे शांत पने म्हणाले, हे माडगूळकर आहेत ना ते पोस्टाच्या बाहेर बसून लोकांना चिठ्या लिहून देतात आणि मी यांच्या शेजारी बसून छत्र्याच्या काड्या दुरुस्त करतो. या व्यंगात्मक उत्तरा नंतर शरद पवारांच्या जीवात जीव आला.

काहीही म्हणा मात्र या साहित्यिकांचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला घेण्यासारखा आहे खरं तर साहित्यिक आपल्या महाराष्ट्राला लाभले हे आपल्यासाठी आपल्या पिढयांसाठी अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे.

]]>
https://www.batmi.net/a-funny-anecdote-with-pawars-bridge-and-g-di-madgulkar/feed/ 0 28919
अजित पवारांची ऑफर वसंत मोरे स्वीकारणार का? मनसेतील नाराजीवर स्पष्टचं जाहीर केलं मत… https://www.batmi.net/will-vasant-more-accept-ajit-pawars-offer-a-clear-vote-was-announced-on-the-displeasure-in-the-mns/ https://www.batmi.net/will-vasant-more-accept-ajit-pawars-offer-a-clear-vote-was-announced-on-the-displeasure-in-the-mns/#respond Fri, 09 Dec 2022 05:20:36 +0000 https://www.batmi.net/?p=28873 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुण्यातील आक्रमक आणि धडाकेबाज चेहरा म्हणून वसंत मोरे यांच्याकडे पाहिले जाते. मात्र ते गेल्या काही महिन्यांपासून पक्षाच्या काही भूमिकांवर नाराज असल्याची चर्चा रंगतेय. (Will Vasant More accept Ajit Pawar’s offer? A clear vote was announced on the displeasure in the MNS)

त्यामुळे वसंत मोरे आता मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या.

अशात विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी वसंत मोरे यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याची चर्चा हि राजकीय वर्तुळात सुरु आहे.

ज्यावर खुद्द वसंत मोरे यांनी स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.अजित पवार यांनी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिल्याची बाब त्यांनी मान्य केली.

मी सध्या मनसेतच आहे. पण अलीकडे मला पक्षसंघटनेतील लोकांकडून त्रास देण्याचा प्रकार सुरु असल्याचेही वसंत मोरे यांनी सांगितले. त्यामुळे वसंत मोरे भविष्यात मनसेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होणार का, हा प्रश्न पुन्हा समोर येतोय.

वसंत मोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले पुण्यातील एका लग्नात अजित पवारांनी मला आवाज दिला आणि दादा म्हणाले, अरे तात्या किती नाराज…आता या आमच्याकडे… मी वाट बघतोय.

लग्नातून जाताना हि अजित पवार पुन्हा म्हणाले, वसंतराव मी वाट बघतोय… आपल्याला भेटायचं आहे. अजित दादाच्याविधानावर मी होय असं म्हटलं . मला वाटत कि , हा मी केलेल्या कामाचा गौरव असल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलं.

या सगळ्या घडामोडींमुळे वसंत मोरे हे मनसेतून बाहेर पडणार, अशा चर्चा सुरु आहेत. याविषयी वसंत मोरे यांना विचारले असता, मी अजूनही मनसेतच असल्याचे त्यांनी सांगितले.

मला अजून तरी राजसाहेब प्रिय आहेत. परंतु, आता मला पक्षातील बाकीच्यांचा त्रास जाणवू लागला आहे. पूर्वी जो त्रास होत नव्हता, तो आता जाणवत आहे.

मला स्टेजवर बोलवायचे आणि बसवून ठेवायचे, मी काय शो पीस नाही ना, असा संतप्त सवाल वसंत मोरे यांनी विचारला. त्यांच्या या टीकेचा रोख नेमका कोणाच्या दिशेने होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मात्र, वसंत मोरे यांच्या बोलण्याचा एकूण सूर पाहता भविष्यात ते वेगळा विचार करण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.

]]>
https://www.batmi.net/will-vasant-more-accept-ajit-pawars-offer-a-clear-vote-was-announced-on-the-displeasure-in-the-mns/feed/ 0 28873
मुख्यमंत्री होऊन देखील Sharad Pawar यांना ५ वर्षांचा कार्यकाळ का पूर्ण करता आला नाही? https://www.batmi.net/why-sharad-pawar-could-not-complete-5-years-tenure-despite-being-chief-minister/ https://www.batmi.net/why-sharad-pawar-could-not-complete-5-years-tenure-despite-being-chief-minister/#respond Mon, 05 Dec 2022 09:54:36 +0000 https://www.batmi.net/?p=28753 राजनेतिक जगताचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार हे एकेकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. एकदा नव्हे तर तेही चार वेळा. पण चार वेळा मुख्यमंत्री झाल्या नंतरही त्यांना एकदाही पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. (Why Sharad Pawar could not complete 5 years tenure despite being Chief Minister?)

यावर आजही विरोधक त्यांची मज्जा घेतात . पण याला नेमकं कारण काय? ते चार वेळा मुख्यमंत्री कसे झाले?, त्या वेळी राजनेतिक परिस्थिती काय होती आणि ते ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण का करू शकले नाहीत? याबद्दलच आज आपण चर्चा करणार आहोत.

नुकतीच एकनाथ शिंदे यांनी केलेली बंडखोरी तर सगळ्यांना माहितीच असेल, अशीच बंडखोरी शरद पवार यांनी देखील केली होती . १९७८ साली वसंत दादाच्या सरकार मध्ये शरद पवार हे उद्योगमंत्री होते, त्यावेळी सुरु असलेल्या भर पावसाळी अधिवेशनात पवारांनी दत्ता मेघे ,सुशील कुमार शिंदे,आणि सुंदरराव सोळंके या मंत्र्यांसह एकूण ३८ आमदारांना घेऊन बंडखोरी केली होती.

याच बंडखोरी मुळे वयाच्या 38 व्या वर्षी शरद पवार हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेत, त्या वेळी ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले होते. त्यांनी केलेली ही बंडखोरी महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरची सगळ्यात मोठी बंडखोरी होती. शरद पवारांच्या नेतृत्त्वात १७ कॅबिनेट आणि १७ राज्यमंत्र्यांसह राज्यात पुलोदचा प्रयोग सुरू झाला.

जवळपास दोन वर्षे शरद पवारांच्या नेतृत्वातील पुलोदचं सरकार चाललं, त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या आणि पंतप्रधान झाल्या. १७ फेब्रुवारी १९८० रोजी इंदिरा गांधींच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शरद पवारांचं पुलोदचं सरकार बरखास्त केलं आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली. अश्याप्रकारे शरद पवार यांच्या पहिलया मंत्रिपदाचा कार्यकाळ हा १ वर्ष २१४ दिवसांचा झाला.

पुलोदचं सरकार गेल्यानंतर ६ वर्षे शरद पवार हे विरोधी बाकावर बसलेले होते.. पण त्यानंतर ७ डिसेंबर १९८६ रोजी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नेतृत्वात ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते. त्यांच्यावर झिरो बजेट च्या मुद्द्यावरून टीका व्हायला लागल्या, त्यातल्या त्यात काँग्रेसमधील एक गट त्यांना मुख्यमंत्री पदावरून काढण्यासाठी प्रयत्न करत होता.

महाराष्ट्रात काँग्रेसच वातावरण त्यावेळी फारस बरं नव्हतं, महाराष्ट्र काँग्रेसमधील तेव्हाचे ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील हे राजस्थानचे राज्यपाल होते. आणि त्यांनाही चव्हाण हे मंत्रीपदावर नको होते ., त्यामुळे राजस्थानच्या राजभवनातूनच महाराष्ट्रातील मुख्यमंत्रि बदलासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले.

नंतर राज्यपाल पदाचा राजीनामा देऊन ते मुंबईत आले आणि मुंबईतून शंकरराव चव्हाणांना हटवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. आता चव्हाण हे मंत्रिपदावरून हटणार हे माहित होताच.. नवीन मुख्यमंत्रीसाठी नावांची निवड सुरु झाली. तेव्हा शरद पवार यांचं नाव राजीव गांधींपर्यंत पोहोचलं.

पवारांना राजीव गांधी यांचा फोन आला आणि त्यांनी पवारांना थेठ दिल्लीला बोलावलं आणि सांगितलं की, “शंकरराव चव्हाणांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेत आहोत आणि तुम्हाला मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देत आहोत”. २६ जून १९८८ रोजी शरद पवार हे २ दा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले, यावेळी त्यांचा एकच वर्षांचा कार्यकाळ होता.

कारण त्यानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आणि पवारांना नियमाप्रमाणे पद सोडावं लागलं. १९९० ची निवडणुक काँग्रेस ने शरद पवार यांच्या नेतृत्वात लढवली होती त्यामध्ये शिवसेना भाजप ने युती केली होती, त्यांना हरवत काँग्रेस ने १४७ जागा जिंकल्या, त्यामुळे बहुमत हे काँग्रेस कडे होत.

पवार मात्र काठावर पास झाले, पण अखेर शरद पवार पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर आले. निवडणूक निकालानंतर शरद पवार यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला. आणि ४ मार्च १९९० रोजी पवारांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, हा कार्यकाळही त्यांना पूर्ण करता आला नाही.

कारण पवार केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी व्हायला गेले. पी. व्ही. नरसिंहराव म्हणजे तेव्हा चे पंतप्रधान यांनी पवारांना केंद्रीय मंत्रिमंडळात येण्याची विनंती केली. आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत, पवारांनी केंद्रात संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी घेतली. अशाप्रकारे पवारांचा तिसऱ्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ जवळपास एक ते दीड वर्षांचाच झाला.

आता शरद पवार हे दिल्लीत चांगलेच रमले होते, पण ६ डिसेंबर १९९२ ला ‘बाबरी मशीद उद्ध्वस्तीचं’ प्रकरण घडलं आणि त्यानंतर मुंबईमध्ये त्याचे पडसाद उमटले. मुंबईत दंगली सुरू झाल्या. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून ‘मुंबई वाचवा’ च्या हाका दिल्लीपर्यंत पोहोचू लागल्या. सुधाकरराव नाईक यांना या दंगली काही रोखता आल्या नाहीत.

पर्यायानं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद पूर्वी तीनवेळा भूषवलेल्या शरद पवार यांनाच महाराष्ट्रात पाठवण्यात आलं. त्यानुसार ६ मार्च १९९३ रोजी शरद पवार यांच्याकडे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद देण्यात आलं. पवारांच्या या चौथ्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं. बॉम्बस्फोट, भ्रष्टाचाराचे आरोप इत्यादी बऱ्याच गोष्टी घडल्या.

मात्र, पवारांनी या सगळ्यात आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाचा वापर करत मार्ग काढला आणि मुख्यमंत्री पद यशस्वी रित्या पार पाडले. परंतु हे ४ मुख्यमंत्रीपदे पवारांनी नाईलाजाने स्वीकारले होते. पुढे पवारांच्याच नेतृत्वात काँग्रेसने महाराष्ट्रात १९९५ च्या निवडणुका लढल्या. मात्र, यावेळी काँग्रेसला यश काही आलं नाही, पवारांच्या या चौथ्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ केवळ २ वर्षे ८ दिवसांचाच होता.

]]>
https://www.batmi.net/why-sharad-pawar-could-not-complete-5-years-tenure-despite-being-chief-minister/feed/ 0 28753