rapido – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Sat, 03 Dec 2022 05:29:39 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg rapido – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 रॅपिडो अॅप बंद होईल का? पुण्यात टॅक्सी सेवेला रिक्षाचालकांचे आंदोलन… https://www.batmi.net/will-the-rapido-app-close-taxi-drivers-protest-against-taxi-service-in-pune/ https://www.batmi.net/will-the-rapido-app-close-taxi-drivers-protest-against-taxi-service-in-pune/#respond Sat, 03 Dec 2022 05:29:39 +0000 https://www.batmi.net/?p=28725 पुण्याचे रिक्षा आणि सिटी बसेस शिवाय सामान्य माणसांचा दिवस काही सुरु होत नाही. वेळेवर बस किंवा रिक्षा मिळाला तरच लोक वेळेत आपल्या कामावर पोहोचू शकतील. नाही का? परंतु नुकतच पुण्यात रिक्षा चालकांचे आंदोलन सुरु होते. (Will the Rapido app close? Taxi drivers protest against taxi service in Pune)

हे आंदोलन जरी रिक्षा चालक स्व फायद्यासाठी करत होते तरी मात्र याचा सर्वात जास्त त्रास झाला तो म्हणजे सामन्यांना. रिक्षा चालकाचं हे आंदोलन सुरु होत, रॅपिडो या बाईक टॅक्सी सर्व्हिसेस विरोधात. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की पुण्यात तर बऱ्याच खाजगी टॅक्सी सर्व्हिसेस आहेत.

मग केवळ रॅपिडो विरोधातच हे आंदोलन का? तर हा वाद नेमका काय आहे? आणि आंदोलनातून यावर काही उलगडा निघाला का? हेच जाणून घेणार आहोत. रॅपीडो आणि पुण्यातील रिक्षा चालकांचा वाद काय? तर पुण्यात रॅपीडोने वर्षभरापूर्वी बाईक टॅक्सी सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.

हा निर्णय घेण्यात आला त्यावेळी कंपनीकडून सांगण्यात आलं होत की, कार्याचा विस्तार म्हणून पुढील २ वर्षात दोन लाख दुचाकी चालक रॅपीडोशी जोडले जातील. यानंतर देखील महाराष्ट्राच्या मोटार वाहन विभागाने कंपनीला परवानगी दिली नव्हती. आणि तरीही या कंपनीने आपला अॅप सुरूच ठेवला असून, या टॅक्सी बेकायदेशीर असल्याचं बोलल जात आहे.

अद्यापही राज्य सरकारने या कंपनीला अशा प्रकारचा व्यवसाय करण्याची परवानगी काही दिली नाही, आणि म्हणुणच मुंबई परिवहन विभागाणे रॅपीडो अॅप मधील बाईक टॅक्सी सेवा लवकरात लवकर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आरटीओ कडून आता याविरोधात कठोर ऍक्शन घेतली जात आहे.

पुण्यात याविरोधात तक्रार दाखल होताच ६५ बाईक्स जप्त करण्यात आल्या आहेत. ही तक्रार रॅपीडोच्या दुचाकी टॅक्सी सेवे विरोधात करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी अशीच तक्रार कर्नाटकमध्ये सुद्धा करण्यात आली, जिथे पोलिसांनी कारवाई करत १२० पेक्षाही जास्त बाईक्स जप्त केल्या होत्या.

पुण्यात झालेल्या या आंदोलनात तब्बल १६ ऑटो रिक्षा युनियनने सहभाग घेतला होता. आंदोलनाच्या मध्यंतरी या आंदोलनाने हिंसक रूप घेतल्याचे देखील पाहायला मिळाले. आता मुद्दा असा आहे की एखाद्या व्यक्तीला कुठे प्रवास करायचा आहे तर त्याला ऑटो रिक्षाच्या तुलनेत बाईकच भाडं कधीही परवडणारं असत आणि यामुळेच पुणेकर रॅपीडोला पसंती देत आहे.

मात्र रिक्षा चालकांना याचा सर्वात जास्त फटका बसतोय असे त्यांचे सांगणे आहे. आणि यामुळेच हिंसक स्वरूपाचे आंदोलन रिक्षा चालकांकडून करण्यात आले. यावर प्रादेशिक परिवहन अधिकारीही व्यक्त झाले. ज्यात त्यांनी सांगितले की, हे आंदोलन भविष्यतही सुरु ठेवण्याचं त्यांनी ऑटोरिक्षा चालकांना सांगितलं आहे.

तसेच प्रवाशांना प्रवासासाठी असुरक्षित असलेली रॅपीडो बाईक टॅक्सी सेवा वापरू नये असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आता वाद म्हटलं तर दोन्ही बाजू ऐकणे महत्वाचे ठरते. या प्रकरणावर बोलतांना रॅपीडोचे सहसंस्थापक पवन गुंटूपल्ली सांगतात की, रॅपीडो बाईक टॅक्सी चालवणाऱ्यांना कोणत्याही करणाशिवाय त्रास दिला जात नाही.

ऑटो रिक्षा चालक रॅपीडो बाईक टॅक्सीच्या स्पर्धेला विरोध करत आहेत, असे त्यांनी सांगितले. रॅपीडो ही कायद्याचं पालन करणारी कंपनी आहे व ज्या राज्यांमध्ये या कंपनीच्या सेवा सुरु आहेत, त्या सर्व राज्यांमध्ये ती नियमित कर भरणारी संस्था असल्याचेही त्यांचे सांगणे आहे.
परंतु कंपनीकडे परवाना नसल्यामुळे आता रॅपीडो बाईक टॅक्सी कंपनीला बेकायदेशीर ठरवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरटीओ ने यापूर्वी देखील कंपनीला ३ वेळा नोटीस पाठवली होती मात्र कंपनीकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. सध्या तरी या कंपनीचे अॅप सुरु असल्याने सेवाही सुरु आहेत. आता हे अॅप नक्की कधी बंद होईल आणि अजून किती दिवस सामान्य जनतेला या वादाचा त्रास सहन करावा लागेल, हे काही सांगता येणार नाही.

]]>
https://www.batmi.net/will-the-rapido-app-close-taxi-drivers-protest-against-taxi-service-in-pune/feed/ 0 28725