rahul gandhi – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Fri, 23 Dec 2022 05:48:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg rahul gandhi – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 कोरोना इस बॅक: राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला लागणार ब्रेक? https://www.batmi.net/corona-is-back-will-rahul-gandhis-bharat-jodo-yatra-take-a-break/ https://www.batmi.net/corona-is-back-will-rahul-gandhis-bharat-jodo-yatra-take-a-break/#respond Fri, 23 Dec 2022 05:48:07 +0000 https://www.batmi.net/?p=29038 जगात परत एकदा कोरोनाने आपले डोके वर काढले आहे. कारण ओमीक्रोन चा सबव्हेरिएंट BF.7 ला चीनमधील कोरोनाच्या बिघडलेल्या स्थितीसाठी पुन्हा एकदा जबाबदार धरले जात आहे. (Corona is Back: Will Rahul Gandhi’s Bharat Jodo Yatra take a break?)

आता ओमीक्रोन चे सबव्हेरिएंट BF.7 ची तीन प्रकरणे भारतात देखील आढळून आली आहेत. त्यानंतर केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालय देखील सतर्क झाले आहे. या सगळ्या पार्श्वभूमी वर आता राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, ही चर्चेचा विषय ठरतीय. आता याला नेमकं कारण काय हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

जगभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 1 आठवड्यात जगभरात कोरोनाचे 36 लाख रुग्ण आढळले आहेत. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता भारत सरकारही अलर्ट मोडवर आले असून,आरोग्य मंत्रालय यावर नजर ठेवून आहेत . त्यामुळे परिस्थिती योग्यपणे हाताळण्यासाठी केंद्राने सर्व राज्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

जगभरात कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी काँग्रेसची भारत जोडो यात्रा रद्द करण्याची मागणी राहुल गांधींकडे केली आहे. मनसुख मांडविया यांनी राहुल गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “राजस्थानमध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेत कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले जावे, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा.”

यात्रेत केवळ लसीकरण झालेले लोकच सहभागी होतील याची खात्री करावी. प्रवासात सामील होण्यापूर्वी आणि नंतर प्रवाशांना वेगळे केले पाहिजे. मांडवीय यांनी पुढे लिहिले की, जर कोरोना प्रोटोकॉलचे पालन करणे शक्य नसेल. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन,देशाला कोरोनापासून वाचवण्यासाठी भारत जोडो यात्रा देशहितासाठी पुढे ढकलण्यात यावी.

आता यामुळे राहुल गांधीची भारत जोडो थांबणार अशी चर्चा सर्वत्र पाहायला मिळतिय. खरं तर, राजस्थानचे खासदार पीपी चौधरी, निहाल चंद, देवजी पटेल यांनी आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहून भारत जोडो यात्रेतून पसरणाऱ्या कोविड महामारीबाबत चिंता व्यक्त केली होती.त्यांनी लिहिले की, गेल्या काही दिवसांत देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

यासोबतच राजस्थानमध्ये भारत जोडो यात्रा सुरू आहे. यामध्ये देशातील विविध राज्यातील लोक सहभागी होत आहेत. इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांमुळे राजस्थानमध्ये कोरोना पसरण्याचा धोका असून, प्रवासात सहभागी झालेल्या प्रवाशांमध्येही कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू हेही सहलीवरून परतल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

अशा परिस्थितीत याबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. कोरोना बाबतचा हा मुद्दा विधानसभेतही गाजला ज्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ,त्याचा अभ्यास करण्यासाठी लवकरच एखादी समिती किंवा टास्क फोर्स तैयार करण्यात येईल. जी आपल्याला जगभरातील बाबींची अपडेट देत राहील.

असं फडणवीसांनी सुरु असलेल्या हिव्हाळी अधिवेनाच्या सभागृहात सांगितलं भारतातील लोकांना चिंता करण्याचं कारण नाही. कारण भारतात अशी परिस्थिती उद्भवणार नाही असं तज्ज्ञांचं मत आहे. भारतात बहुतांश लोकांचे लसीकरण झाल्याने भारतात याचा धोका कमी असल्याचं म्हटलं आहे.

पण तरी देखील सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याची गरज असल्याचं तज्ञानी म्हटलं आहे. तर दुसरीकडे काँग्रसेच सांगणं आहे, कि भारत जोडो यात्रा थांबवण्यासाठी ही भाजपाची खेळी आहे. आता भारत जोडो यात्रा थांबेल, की पूर्वी प्रमाणेच सुरु राहील हे पाहणे महत्वाचे ठरेल.

]]>
https://www.batmi.net/corona-is-back-will-rahul-gandhis-bharat-jodo-yatra-take-a-break/feed/ 0 29038
भारत जोडो यात्रेतून राहुल गांधी यांना नक्की काय साधायचे आहे? https://www.batmi.net/what-exactly-does-rahul-gandhi-want-to-achieve-from-bharat-jodo-yatra/ https://www.batmi.net/what-exactly-does-rahul-gandhi-want-to-achieve-from-bharat-jodo-yatra/#respond Tue, 29 Nov 2022 06:43:34 +0000 https://www.batmi.net/?p=28617 काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. या यात्रेचा हेतू देश जोडण्यासाठी असल्याचे बोलले गेले आहे. हि यात्रा प्रत्येक वर्गाच्या लोकांना सोबत घेऊन सुरु केली गेली आहे. देशातील लाखो नागरिक या यात्रेत सहभागी होत आहेत. मात्र या यात्रेतून राहुल गांधी यांना नक्की काय साधायचे आहे? याचा काँग्रेसला फायदा होईल का? ही यात्रा सुरु करण्याची नक्की आवश्यकता का पडली? आणि नुकतच कोर्टाने भारत जोडो यात्रेच्या ट्विटर हँडलवर रोक का लावली? हेच या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात. (What exactly does Rahul Gandhi want to achieve from Bharat Jodo Yatra?)

७ सप्टेंबरला भारत जोडो यात्रेची सुरुवात करण्यात आली. ही यात्रा तब्बल ३५७० किलोमीटरचा प्रवास निश्चित करणार असून, यात १२ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असणार आहे. आथिर्क, सामाजिक आणि राजनैतिक दृष्ट्या देशातील नागरिकांमध्ये दुरावा निर्माण झाल्यामुळे, तो दुरावा मिटविण्याचे काम भारत जोडो यात्रा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांना लोकांवर काँग्रेसचा प्रभाव टाकायचा आहे ज्याचा फायदा त्यांना येणाऱ्या निवडणुकांच्या काळात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या यात्रेच्या अगदी सुरुवातीपासूनच राहुल गांधी यांना लोकांचे मोठ्या प्रमाणात समर्थन मिळतांना दिसत आहे. यात राहुल गांधी यांचा मुख्य उद्देश काँग्रेस पार्टी अजून मजबूत करणे हाच आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाच उम्मेदवार मानलं जात आहे. सध्या नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहे, मात्र ते अशा प्रकारे कधीच जनतेत गेले नाही, पत्रकार परिषद घेतल्या नाहीत.. हाच मुद्दा हाती घेऊन या यात्रेद्वारे नरेंद्र मोदींवर देखील थेट निशाणा साधण्यात आला आहे.

आता लवकरच हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुका असतील, याकरिता प्रत्येक पक्ष जोरदार मेहनत घेत आहे. मात्र जर का या दोन ठिकाणी काँग्रेस पक्ष निवडून आला तर याच थेट श्रेय राहुल गांधींनी सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेलाच जाईल. आणि जर का काँग्रेस पक्ष पराभूत झाला, मग मात्र या यात्रेचा फायदा कितपत झाला हा प्रश्न उपस्थित होईल.

ही यात्रा जर का यशस्वीरीत्या पार पडली तर, यामुळे राहुल गांधींची पूर्वी काही वर्षात स्थापित झालेल्या प्रतिमेत नक्कीच सुधारणा होईल. राहुल गांधी आपल्या प्रतिमा सुधारणे कडे देखील लक्ष देतांना दिसत आहे, आईच्या बुटांची लेस बांधणं, तरुणांसोबत फोटोज काढणं, पाऊसात भिजत भाषण करण यांसारख्या अनेक गोष्टी ते करतांना दिसत आहेत. दुसर म्हणजे निवडणुकांमध्ये मागे पडलेल्या काँग्रेसच्या पुनरुज्जीवनावर देखील याचा चांगला प्रभाव पडेल.

आतापर्यंत या भारत जोडो यात्रेला कोणतही गालबोट लागलं नव्हतं व ही यात्रा अगदी सुरळीत रित्या सुरु होती, मात्र नुकताच कोर्टाने भारत जोडो यात्रेचे ट्विटर हॅण्डल बंद करण्याचे आदेश दिले. हे केवळ त्यांच्या यात्रेच्या एका व्हिडिओमध्ये केजीएफ २ चित्रपटाचं गाणं बेकायदेशीर स्वरूपात वापरल्यामुळे. कोर्टाच्या पुढील सुनावणी पर्यंत त्यांचे ट्विटर अकाउंट बंद ठेवण्यात आले आहे.

या यात्रेने आतापर्यंत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा अशी पाच राज्य कव्हर केली आहेत. आता या यात्रेचा परिणाम २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकांवर कितपत पडेल, हे येणार काळच सांगेल.

]]>
https://www.batmi.net/what-exactly-does-rahul-gandhi-want-to-achieve-from-bharat-jodo-yatra/feed/ 0 28617
चिमुकल्याने साठवलेल्या पैशांची पिग्गी बँक हाती देताच राहुल गांधी झाले भावुक… https://www.batmi.net/rahul-gandhi-got-emotional-as-he-handed-over-a-piggy-bank-of-money-saved-by-a-toddler/ https://www.batmi.net/rahul-gandhi-got-emotional-as-he-handed-over-a-piggy-bank-of-money-saved-by-a-toddler/#respond Tue, 29 Nov 2022 05:17:22 +0000 https://www.batmi.net/?p=28591 गेल्या कित्येक दिवसांपासून राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. या यात्रे दरम्यान एक असा प्रसंग घडला कि तो पाहून राहुल गांधी हे भावुक झालेत. (Rahul Gandhi got emotional as he handed over a piggy bank of money saved by a toddler…)

राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेसाठी मध्येप्रदेशात पोहोचले आहेत . तिथे राहूल गांधीना भेटण्यासाठी भोपाल वरून दोन चिमुकले मध्यप्रेदेश येथील खांडवी येथे पोहोचले, राहुल गांधीना भेटताच मुलांनी गेल्या ७८ दिवसांनपासून जमा केलेली पैश्यांची पिग्गी बँक राहुल गांधी याच्या हाती दिली आणि हे पैसे भारत जोडो यात्रेसाठी वापरा असे सांगितले .

हे सगळं चित्र बघताच राहुल गांधी हे भावुक झालेत आणि त्या मुलांना प्रेमाने जवळ घेतलं, गेल्या ७८ दिवसांन पासून हे मुलं भारत जोडो यात्रे साठी पैसे जमा करत होते असं सांगितलं जातंय.

या प्रसंगी मुलांची भावना बघून राहुल गांधी समेत तिथे असणारा प्रत्येक व्यक्ती हा भावुक झाला . या यात्रेत वेगवेगळे रंग पाहायला मिळत आहेत. कधी गरीब महिला प्रवासात राहुल गांधींना आपुलकी देताना दिसतात.

तर कधी बॉलिवूड कलाकारही त्यांच्या या प्रवासात सामील होतात. आणि आता राहुल गांधी यांच्या भेटीसाठी मध्य प्रदेशातील दोन लहान मुलांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. हे बघून असं वाटतं कि कुठे तरी लोकांना काँग्रेस कडून आशेचा किरण पाहायला मिळतोय .

]]>
https://www.batmi.net/rahul-gandhi-got-emotional-as-he-handed-over-a-piggy-bank-of-money-saved-by-a-toddler/feed/ 0 28591