pune news – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Wed, 07 Dec 2022 10:24:38 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg pune news – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 ऐकावं ते नवलच! पुण्यातील ‘या’ ठिकाणी जमिनीत नव्हे तर झाडाला लागले लबालब बटाटे… https://www.batmi.net/it-will-be-surprising-to-hear-in-this-place-in-pune-potatoes-grew-not-in-the-ground-but-on-trees/ https://www.batmi.net/it-will-be-surprising-to-hear-in-this-place-in-pune-potatoes-grew-not-in-the-ground-but-on-trees/#respond Wed, 07 Dec 2022 10:24:38 +0000 https://www.batmi.net/?p=28829 निसर्गाचे चमत्कार भन्नाट असतात. कधी काय होणार हे कुणालाच ठाऊक नसते. अशीच एक बातमी समोर आली आहे. बटाटा हे जमिनीच्या खाली येणारं पीक आहे. (It will be surprising to hear! In this place in Pune, potatoes grew not in the ground but on trees)

आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष आहे. बटाटा हे तर कंदमुळ म्हणूनच त्याची ओळख आहे. कारण ते जमिनीखाली च उगवतं . पण हिच बटाटे जेव्हा जमिनीच्या वर झाडाला अली तर.

आश्चर्य वाटलं ना.. पण हे अगदी खरं आहे. पुणे जिल्ह्यातच आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर या गावामध्ये चक्क झाडाला बटाटे लागले आहेत. युवा शेतकरी संदीप आणि धनेश पांडुरंग वळसे पाटील यांच्या शेतात असणाऱ्या झाडाला चक्क १८ ते १९ बटाटे लगडले आहेत.

आंबेगाव तालुक्यात बटाटा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. बाजारभावही बटाट्याला चांगला मिळतो. या भागात अनेक ठिकाणी बटाटे काढणीला आले आहेत.

जमिनीत बटाटे येतात तसेच हे बटाटे जमिनीच्या वर आले आहेत. थंडीमुळे जमिनी खालचा बटाटा हिरवा पडतो त्याच प्रमाणे हा बटाटा देखील हिरवा पडला आहे.

बटाटे झाडाला लगडलेले दिसल्याने परिसरात हा कुतूहलाचा विषय होत असून लोकं त्याला बघायला गर्दी करत आहेत. आंबेगाव तालुक्यातीमधील निरगुडसर येथे माळरानावर वळसे पाटील यांची शेती आहे.

साडेतीन एकरमध्ये त्यांनी बटाट्याची लागवड केली असून . बटाटा पीक काढणीला आलेला आहे . अंतिम टप्प्यातील पाला काढण्याचे काम सुरू आहे.

या पाल्याची कापणी करत असताना वळसे पाटील यांना त्यांच्या पिकातील एका झाडाला चक्क बटाटे आलेले दिसले. हे बटाटे त्यांनी पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

कारण एवढे दिवस बटाटे लागवड करत असतांना आतापर्यंत असे काही बघायला त्यांना मिळालेलं नाही. मात्र यावर्षी बटाटा चक्क झाडाला लगडलेले असल्याने त्यांना आश्चर्य वाटले.

]]>
https://www.batmi.net/it-will-be-surprising-to-hear-in-this-place-in-pune-potatoes-grew-not-in-the-ground-but-on-trees/feed/ 0 28829
सावधान! पुढे नवले पूल आहे.. ‘या’ कारणामुळे नवले पूल ठरतोय मृत्यूचा सापळा… https://www.batmi.net/beware-next-navle-bridge-due-to-this-reason-navle-bridge-is-becoming-a-death-trap/ https://www.batmi.net/beware-next-navle-bridge-due-to-this-reason-navle-bridge-is-becoming-a-death-trap/#respond Sat, 03 Dec 2022 05:13:33 +0000 https://www.batmi.net/?p=28721 सावधान पुढे नवले पूल आहे, घाबरलेत का !! तुमचं माहिती नाही पण मी तर नक्कीच घाबरले कारण, जितकी चर्चा एखाद्या अभिनेता किंवा राजनेत्याची होत नाही तितकी चर्चा आजकाल पुण्यातील नवले ब्रिजची होत आहे. (Beware! Next Navle Bridge.. Due to ‘this’ reason, Navle Bridge is becoming a death trap…)

नवले ब्रिज च नाव जरी काढलं की पुणेकरांच्या मनात धास्ती बसते. आता याचं एक उदाहरण सांगायचं झालं तर काल परवाचीच गोष्ट, मी पुण्यात एका ऑटो ने जात होते ऑटो वाल्या काकांशी चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या पण अचानक ऑटोवाले काका शांत झाले. मी विचारलं काका काय झालं सगळं ठीक आहे ना, तर काका काय बोलतात.

सावधान पुढे नवले पूल आहे, नवले पूल म्हणजे मृत्यूचा सापळा इथंन लवकर गेलेलच बरं आणि जो पर्यंत नवले ब्रिज पार होत नाही. अक्षरशः त्यांच्या तोंडून एकही शब्द निघालेला नाही. तर सांगायांचा विषय म्हणजे सामान्य माणूस असो, रिक्षा वाला असो किंवा मोठा व्यक्ती नवले पूल आता लोकांसाठी खास करून पुणेकारणांसाठी एक भीती चा विषय झाला आहे.

तर यावरच थोडा रिसर्च करायचा म्हणून इथे अपघात का होतात याची कारणे शोधायला लागली. आता कारणे तर सापडलेत पण मग त्या वर उपाय काय? तर या बद्दलच आपण चर्चा करणार आहोत.

आता नवले ब्रिज बद्दल लोंकाच्या मनात इतकी धास्ती का बसली आहे? तर गेल्या कित्येक दिवसांपासून पुण्यातील नवले ब्रिज हे अपघातांचं हॉटस्पॉट बनला आहे. आता काही दिवससांपूर्वी पुण्यातील नवले ब्रिजवर झालेल्या भीषण अपघाताची चर्चा सर्वत्र झाली. या अपघातामध्ये एक कंटेनरने तब्बल ४७ वाहनांना धडक दिली.

या भीषण अपघातात अनेक जण जखमी झालेत. तर कार, रिक्षा, दुचाकी अशा वाहनांचा चक्काचूर झाला होता.या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात तेल गळती झाल्याने वाहतूक बराच वेळ थांबवावी लागली होती. आता हा अपघात ताजाच होता, तर परत दुसरा अपघात झाला. आता हा दुसरा अपघात जुना होत नाही, तर पुन्हा अपघात.

अश्या रोज अपघातांच्या बातम्या कानावर येऊ लागल्या आणि अपघातांची ही मालिका सुरु झाली. मात्र नवले पुलावर झालेला हा काही पहिला अपघात नाही. कात्रजचा नवीन बोगदा ते नवले पूल, वडगाव पूल हा काकांनी म्हटल्या प्रमाणे अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. आता साहजिक आहे आपल्या भारतात काही लोकं अशेही आहेत जे अश्या गोष्टी ना एक हॉरर अँगल देतात.

इथे ही काहींनी नवले ब्रिज ला एक हॉरर अँगल दिलेला. पण खर सांगायचं तर असं काहीच नाही, इथे अपघात होण्याची काही कारण आहेत. कात्रज नवीन बोगदा संपल्यानंतर दरी पुलापासून महामार्गावर तीव्र उतार सुरू होतो. या उतारावरून येताना वाहनचालक डिझेल वाचविण्यासाठी वाहने बंद करून तीव्र उतारावरून भरधाव येतात.

उतार संपल्यानंतर अनेकदा वाहनांना ब्रेक लागत नाही, त्याचवेळी अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागते. या सोबतच बँगलोर -मुंबई बाह्य वळण महामार्गावरील वाहतुकीसाठी धोकादायक ठरणाऱ्या कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल, वडगाव पूल या महामार्गाभोवती अफाट नागरिकीकरण झालं आहे. त्याच वेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असते.

दक्षिणेकडील अनेक राज्यातील अवजड वाहने ही देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे आपआपल्या राज्यातील माल वाहतूक करत असतात. यामुळे २४ तास हा महामार्ग गजबजलेला असतो. परंतु त्याच वेळी हा मार्ग जीवघेणा ठरताना दिसत आहे.आता हेही एक कारण आहे कि, सेवा रस्त्यावर दुतर्फा असणारे अतिक्रमण व बेशिस्त वाहनचालक हे प्रामुख्याने अपघाताला जबाबदार ठरत आहेत.

सेवा रस्त्याच्या दुतर्फा, टपऱ्या, दुकाने, पार्किंग तसंच मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज देखील उभारण्यात आली आहेत. महामार्गावर अनेक ठिकाणी पंक्चरची दुकाने असल्याने अनेक वाहनचालक उलट्या दिशेने ये-जा करत असतात. यामुळे देखील अपघात वाढताना दिसत आहे.

या वर सुप्रिया सुळे यांनी हि माध्यमांशी बोलताना चिंता व्यक्त केली , त्या म्हणाल्या होत्या की २०२१ मध्ये लोकसभेत या नवले पुलाबाबत मी भूमिका मांडली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष घातलं आणि नॅशनल हायवेने १८ ते २० बदलही केले. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पुणे महापालिकेने जे सर्व्हिस रोड करायला हवे ते त्यांनी केलेले नाहीत.

तसेच नॅशनल हायवेला विनंती करण्यात आली आहे की, जे उतार आहेत आणि जिथे सातत्याने अपघात होतात अशा ठिकाणच्या टेक्निकल बाबींचा अभ्यास करणे गरजेचं आहे.’ असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. पण खरं सांगायचं तर पुण्यातील नवले पूल हा अपघातांचं केंद्र बनला असून अनेक निष्पापांना प्राण गमवावे लागले आहेत.

रस्त्यांची चुकलेली रचना, यासाठी कारणीभूत आहे. तीव्र उतार आणि वळणे एकत्र झाल्याने पुण्यातील नवले पूल अपघातांचं हॉटस्पॉट बनला आहे. वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळत आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होते आहे.

नवले पूल ते वडगाव पुलादरम्यान अर्धवट स्थितीत असणारे सेवा रस्ते पूर्ण करण्याची गरज आहे . आज राष्ट्रीय महामार्गावरील उताराची तीव्रता कमी केली गेली पाहिजे ,तर वारजे पूल ते वडगांव पुलादरम्यान सेवा रस्ता करणे गरजेचे झाले आहे. सर्व स्थानिक वाहतूक सेवा रस्त्यावरून होईल, याबाबत योग्य त्या उपाययोजना जर केल्या तर नक्कीच अपघात टाळण्यास मदत होईल.

पण हे कधी होईल ते सांगता येणे कठीणच आहे. त्यामुळे ही अपघातांची मालिका कधी थांबणार? पुणेकरांच्या जीवाची किंमत आहे की नाही? असा सवाल लोकांकडून उपस्थित केला जात आहे.

]]>
https://www.batmi.net/beware-next-navle-bridge-due-to-this-reason-navle-bridge-is-becoming-a-death-trap/feed/ 0 28721