pet owner – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Mon, 28 Nov 2022 06:09:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg pet owner – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 तुम्हीही कुत्र्याचे मालक आहात?, तर ‘हे’ नियम तुम्हाला माहित असायलाच हवेत… https://www.batmi.net/are-you-a-dog-owner-too-then-you-must-know-these-rules/ https://www.batmi.net/are-you-a-dog-owner-too-then-you-must-know-these-rules/#respond Sat, 26 Nov 2022 12:34:47 +0000 https://www.batmi.net/?p=28474 बऱ्याच लोकांना घरी प्राणी पाळायची आवड असते, त्यातही कुत्रा पाळण्याची आवड असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कुत्र्यांच्या विविध जाती पेट शॉप मध्ये उपलब्ध असतात. जिथून खरेदी करून लोक त्यांना घरी आणतात. हे लोकही प्राणी प्रेमीच असतात, जे त्या कुत्र्याला देखील घरातल्या एखाद्या सदस्याला देतो त्यापेक्षाही अधिक प्रेम देतात. (Are you a dog owner too?, then you must know ‘these’ rules)

त्यांना विशेष ट्रेनिंग देखील देतात. मात्र कधी कधी पाळीव कुत्रे सुद्धा हिंसक होतात.. दरम्यान पाळीव प्राणी हिंसक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सरकारने या पाळीव प्राण्यासाठी काही नियम सांगितले आहे.

तुम्हीही जर कुत्र्याचे मालक असाल व कुत्रा घेण्याच्या तयारीत असाल. तर तुम्हाला हे नियम नक्कीच माहित असायला हवेत. चला तर मग हे नियम थोडक्यात जाणून घेऊयात.

Animal Welfare Board ने पाळीव प्राण्यांसाठी काही नियम बनविले आहेत. घरमालक किंवा भाडेकरू कुत्रा पाळत असेल, यात महानगरपालिकेच्या नियमांचे उल्लंघन होत नसेल आणि याचा शेजाऱ्यांना काही त्रास होत नसेल तर कुत्रा नक्कीच पाळू शकता असे या नियमावलीत सांगण्यात आले आहे.

कुत्र्यांच्या भुंकण्यावरून अनेक वादविवाद झाल्याचे देखील पाहायला मिळते. तर याबाबत सुद्धा काही नियम आहेत. कुत्र्याच्या भुंकण्यावरून नक्कीच आक्षेप घेतला जाऊ शकतो, मात्र त्याचा अर्थ हा नाही की तो भुंकतो म्हणून त्याला घरातून काढून दिले जाईल.

याऐवजी कुत्र्याचे मलिक त्याच्यावर उपचार नक्कीच करू शकतात. आणि हाच एकमात्र उपाय देखील आहे. आता एखाद्याच्या घरात कुत्रा असला तर एखाद्या शेजार्याला नक्कीच याचा त्रास होतो. काही कुत्रे अधीक भुंकतात, मग अशावेळी शेजाऱ्यांनी काय करावे.

तर यासाठी कुत्र्याच्या मालकाला एकदा समज द्यावी, याव्यतिरिक्त तुम्ही कोर्टात ध्वनी प्रदूषणाची देखील तक्रार करू शकता. या तक्रारींमध्ये खूप आवाज, घाणेरडा वास यांसारख्या तक्रारींचा समावेश असतो.

लिफ्ट आणि मैदाना संबंधात सुद्धा पाळीव प्राण्यांसाठी नियम आहेत. या नियमानुसार पाळीव प्राण्याला लिफ्टने ये- जा करण्याची पूर्णतः मुभा आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा विरोध केला जाऊ शकत नाही. कुत्रा म्हणजे घरातील एक सदस्यच असल्यामुळे त्याला लिफ्टने ये जा करण्याची पूर्ण परवानगी आहे, व यासोबतच कुठलीही सोसायटी प्राण्यांकरिता वेगळे चार्जेस लावू शकणार नाही.

या प्राण्यांना गार्डनमध्ये फिरवणयाला देखील कुणालाही थांबवता येणार नाही. भारतीय संविधानाने देखील याबाबतचे अधिकार सामान्य नागरिकाला दिले आहेत. आर्टिकल A (G) अनुसार प्रत्येक नागरिकाला प्राण्यांप्रती प्रेम आणि दया दाखविण्याचा संपूर्ण अधिकार आहे. यासोबतच १९६० च्या कलम ११ (३) अनुसार हाऊसिंग सोसायटीत पाळीव प्राणी पाळण्याचा संपूर्ण अधिकार आहे.

परंतु कुत्रा पाळताना देखील सांगितलेले नियम लक्षात ठेऊनच पाळावा, अन्यथा तुमचा कुत्रा एखाद्याला चावल्यास अथवा त्याचा त्रास झाल्यास, तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

मात्र हेही लक्षात ठेवायला हवे, की हे नियम केवळ कुत्र्यांच्या मालकांसाठी नव्हे तर शेजाऱ्यांसाठी, ज्यांना कुत्र्यांचा त्रास आहे त्यांच्याकरिता देखील आहेत. त्यामुळे जर का तुमच्याकडे कुत्रा असेल, तुम्ही कुत्रा पाळण्याच्या तयारीत असाल, किंवा विनाकारण तुम्ही कुत्र्याला त्रास देत असाल तर हे नियम या सर्वांकरिता आहेत.

]]>
https://www.batmi.net/are-you-a-dog-owner-too-then-you-must-know-these-rules/feed/ 0 28474