pankaja munde – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Thu, 22 Dec 2022 05:35:54 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg pankaja munde – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे ज्यांच्यासाठी एकत्र आले, ते अभय मुंडे कोण आहेत… https://www.batmi.net/who-is-abhay-munde-for-whom-pankaja-munde-and-dhannajay-munde-came-together/ https://www.batmi.net/who-is-abhay-munde-for-whom-pankaja-munde-and-dhannajay-munde-came-together/#respond Thu, 22 Dec 2022 05:35:54 +0000 https://www.batmi.net/?p=29022 राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे भाऊ बहीण असले तरी कट्टर राजकीय विरोधक आहेत. पण आपल्या चुलत भावाला म्हणजेच अभय मुंडेला सरपंच करण्यासाठी ते दोघं एकत्रीत आले. आणि मग काय राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले. (Who is Abhay Munde, for whom Pankaja Munde and Dhannajay Munde came together.)

एकमेकांवर राजकीय टीका करणारे धनंजय मुंडे,आणि पंकजा मुंडे हे एकाच बॅनरवर आल्याने अनेकांना आश्चर्य देखील वाटले. पण अखेर ते ज्या कामसाठी एकत्रित आले होते ते पूर्ण झालं. नाथरा ग्रामपंचायतीत अभय मुंडे यांचा दणदणीत विजय झाला.आणि राजकारणात सक्रिय असलेले ते पाचवे मुंडे ठरलेत.

पण आता हे अभय मुंडे आहेत तरी कोण ?आणि एकत्र येण्यासाठी मुंडे बहीण भावात काय डील झाली हेच आज आपण यामध्ये जाऊन घेणार आहोत. बीड जिल्ह्यातील मुंडेंचे मूळगाव असलेल्या नाथरा ग्रामपंचायतीत पंकजा आणि धनंजय मुंडे यांनी एकत्र पॅनल लढवण्याचा निर्णय घेतला.

अखेर या निर्णयामुळे गावच्या सरपंचपदी अभय मुंडे हे विराजमान झाले आहेत.अभय माणिकराव मुंडे हे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचे चुलत भाऊ तर आहेतच, पण जिल्हा परिषद सदस्य असलेल्या अजय मुंडेंचे अभय सक्खे भाऊ आहेत. अभय मुंडेंची ही पहिलीच निवडणूक होती. हे धनंजय मुंडेंच्या गटाचे आहेत असं मानल जातं.

मागील दोन टर्मपासून नाथरा ग्रामपंचायत राष्ट्रवादी आमदार धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नाथरा ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. त्यावेळी बीड जिल्हा परिषदेचे गटनेते,अजय मुंडे आणि अभय मुंडे यांच्या मातोश्री या सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आल्या होत्या.

त्यापूर्वी अजय मुंडे हे देखील सरपंच म्हणून निवडून आले आहेत. आता त्यांचे बंधू अभय मुंडे हे सरपंचपदी निवडून आल्याने सत्ता पुन्हा त्यांच्याच घरात राहिल्याचे दिसून येत आहे. पण लोकांना सगळ्यात मोठा प्रश्न हा पडला आहे की, या कट्टर विरोधी मुंडे भाऊ बहिणीत एकत्र येण्यासाठी अशी कुठली राजकीय डील झाली होती? तर नाथरा ग्रामपंचायतिचा निकाल हाती.

आल्यानंतर पंकजा मुंडे यांनी दावा केला आहे की, ”आमचं पहिलेच ठरलं होत की, त्यांचा सरपंच आमचा उपसरपंच असेल” या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकत्र येत 8 सदस्यांची बिनविरोध निवड केली. यात राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत 5 सदस्य तर भाजप पुरस्कृत 3 सदस्य निवडून आले आहेत.

मुंडे बहीण-भावाने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले असले तरी वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार गौतम आदमाने यांनी माघार न घेता निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र या निवडणुकीत अभय मुंडे हे ६४८ मतांनी विजयी झाले आहेत.

मुंडे बंधून मधून पंकजा मुंडे,प्रीतम मुंडे,धनंजय मुंडे, अजय मुंडे नंतर आता अभय मुंडे यांच्या विजयानी मुंडेंचे पाचवे बंधू राजकारणात सक्रिय झाले आहेत.

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात राजकारणात कितीही शत्रूत्व असलं, तरी कौटुंबिक विषय येतो तेव्हा हे दोघेही भाऊ-बहीण नेहमीच समजुतीने वागताना दिसले आहेत. आणि याच समजूतदारीची चर्चा आता सर्वत्र पाहायला मिळतीय.

]]>
https://www.batmi.net/who-is-abhay-munde-for-whom-pankaja-munde-and-dhannajay-munde-came-together/feed/ 0 29022