pandharinath phadke – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Wed, 30 Nov 2022 05:26:17 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg pandharinath phadke – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 पंढरीनाथ फडके आणि राहुल पाटील यांच्यातील वाद आहे तरी काय? https://www.batmi.net/what-is-the-dispute-between-pandharinath-phadke-and-rahul-patil/ https://www.batmi.net/what-is-the-dispute-between-pandharinath-phadke-and-rahul-patil/#respond Wed, 30 Nov 2022 05:26:16 +0000 https://www.batmi.net/?p=28640 बैलगाडा शर्यतींचा विषय निघाला की एक नाव हमखास समोर येत ते म्हणजे पंढरीनाथ शेठ फडके, बैलगाडा शर्यतिच्या क्षेत्रातील लोकांना तर हे नाव हमखास माहिती असेलच. आपल्या बैलांवर अतोनात पैसा खर्च करण असो, त्यांच्या अंगावरील सोन किंवा त्यांची रावडी स्टाईल असो ते कुठल्या ना कुठल्या गोष्टींमुळे नेहमी चर्चेत असतात. (What is the dispute between Pandharinath Phadke and Rahul Patil?)

पण अंबरनाथ येथे त्यांनी त्यांच्या बैलगाडा शर्यतीतले कट्टर विरोधक राहुल पाटील यांच्या वर केलेल्या गोळीबारा नंतर फोरव्हिलरच्या सीटवर कमी आणि टपावर जास्त दिसणारे पंढरीनाथ फडके आता सगळ्यांमध्ये चर्चेचा विषय झाले आहे. आता हा गोळीबार का झाला, या मागे नेमकं कारण काय होत, पंढरीनाथ शेठ फडके आणि राहुल पाटील यांच्यातील वाद काय हेच आपण जाणून घेणार आहोत.

पनवेलच्या विहीघरमध्ये राहणाऱ्या पंढरीनाथ फडकेंचं अंगावर किलोभर सोनं, गाडीच्या टपावर बसून वरात ,बैलगाडा शर्यतीचा नाद आणि त्यांचं रावडी लुक अक्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे. कुठल्याही शर्यतीमध्ये एक नंबरला बैल पळायला लागला की त्याच्यावर पंढरीनाथांची नजर असतेच, मग त्याची कितीही किंमत होऊ द्या, त्याला आपल्याकडे घ्यायचंच, असा प्रण पंढरीनाथांचा असतो.

बैल नजरेत बसला की कितीही पैसे लागू द्या, त्याला विकत घेणारा बैलमालक म्हणून पंढरीनाथ यांची ओळख आहे. १९८६ सालापासून वडिलांमुळे फडकेंना बैलगाडीचा नाद लागला. शर्यत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढा मिळायचा, तरीही शर्यत जिंकायची क्रेझ वेगळीच होती. तिथपासून सुरु झालेली आवड फडकेंनी आज पर्यंत राखुन ठेवली आहे. आतापर्यंत ४० ते ४५ शर्यतीची बैलं फडकेंनी राखलीत.

शर्यत मारेपर्यंत बैलाला राखायचं. नंतर शर्यतीमध्ये मागे राहू लागला की त्या बैलाला विकायचं आणि त्याच्या जागी दुसरा बैल घ्यायचं, असं चक्र पंढरीनाथांच सुरु असतं. त्यांच्या बैलांना महिन्याभराला लाखभर रुपयांची खाद लागते. खादीमध्ये शेंगदाणे, काजू, बदाम, डाळ, पिस्ता, खोबरं, अशा सगळ्यांचा वापर करून बैलांना अंगाने तंदुरुस्त बनवण्यामध्ये पंढरीनाथ फडके नंबर वनला असतात.

त्यांनी महाराष्ट्रात अनेक बैलगाडा शर्यती गाजवल्या, पंढरीनाथ यांच्याकडे अनेक टॉप चे बैल आहेत पण यांचा महाराष्ट्रातील सगळ्यात टॉपचा समजला जाणारा बैल म्हणजे बादल. जो त्यांचा खास बैल म्हणूनही ओळखला जातो. पंढरीनाथ हे महाराष्ट्रातील बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांची पश्चिम महाराष्ट्रतील लोकांमध्ये बरीच क्रेज आहे. पण ते कधी कधी त्यांच्या बेकायदेशीर वागण्यामुळे बरेच चर्चेत असतात.

उदाहरण सांगायचं म्हटलं तर मागे त्यांनी पनवेल मध्ये एका क्रिकेट सामान्य दरम्यान तिथे एन्ट्री करतांना अंधाधुंद गोळी बार केला होता त्या वेळी त्यांना लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. पण त्याकडे यांनी दुर्लक्ष केलं आता राहुल पाटील आणि पंढरीनाथ यांच्यातील वाद काय होता तर बैलगाड्या क्षेत्रातील एका व्यक्तींनी धक्कादायक वक्तव्य केलं होत ज्यात त्यांनी म्हटले की बिनजोड शर्यतीत लोक खेळण्यासाठी कमी आणि एकमेकांची जिरवण्यासाठी जास्त येतात.

यांनतर या वादाची खरी सुरुवात झाली. ठाण्यातील खडवली येथील बैलगाडा शर्यतीचे शौकीन राहुल पाटील आणि पंढरीनाथ फडके यांच्यात वादाची सुरुवात झाली ती अशी की, बिनजोड च्या ३ मैदानात राहुल पाटील यांच्या मथूर बैलाने पंढरीनाथ यांच्या बादल बैलाची सलग तीन वेळा हरवले, मग आता प्रत्येक शर्यत जिंकणारे पंढरीनाथ शेठ ज्यांना हार मानणे आवडत नाही त्यांना ही गोष्ट चांगली मनाला लागली कारण यामुळे त्यांच्या ब्रँड इमेजला धक्का लागला.

मग काय पंढरीनाथ चांगलेच फॉम मध्ये आले आणि त्यांनी एका मैदानात राहुल पाटील यांच्या वर चांगलीच शिवीगाळ केली. मग राहुल पाटील हे तरी कसे शांत बसणार, त्यांनी ही फडकेंना प्रतिउत्तर दिल त्यानंतर दोघांमध्ये काही महिने असेच शब्दांचे वार सुरु होते.
वातावरण चांगलेच गरम झाले होते त्यामुळे बैलगाडा क्षेत्रातील लोकांनी दोघांना समजून सांगितले की या वादामुळे बैलगाडा शर्यती बंद होतील, त्यामुळे हे दोघं काही काळ शांत होते.

पण दोघांच्याहि मनात एकमेकांबद्दल राग तो कायमच होता. त्यानंतर अंबरनाथमध्ये पंढरीनाथ फडके आणि राहुल पाटील आमनेसामने आले आणि तिथंच फडकेंकडून अंधाधुंद गोळीबार झाला. आता हा गोळीबार यांच्या याच वादामुळे झाला असं समजण्यात आलं पण याला हेच एक कारण नव्हते ते म्हणतात एका नाण्याला दोन बाजू असतात.

मग याची दुसरी बाजू समोर आली ती म्हणजे राजकीय द्वेष राहुल पाटील हे एकनाथ शिंदें च्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडून कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या नगरसेवक पदासाठी निवडणूक लढणार होते मग ही गोष्ट फडकेंना समजली पण यामुळे तिथले माजी नगरसेवक कुणाल पाटील आणि राहुल पाटील यांच्यात वैर निमार्ण झालं आणि त्यातल्या त्यात कुणाल पाटील हे फडकेंचे जवळचे व्यक्ती आणि म्हणून त्या दोघांनी राहुल पाटील यांचा काटा काढायचा प्लॅन केला असं राहुल पाटील यांनी खुलासा केला.

भर लोकांसमोर तब्बल १८ गोळ्या अंबरनाथ येथे फडकें कडून झाडण्यात आल्या होत्या नंतर या घटने मध्ये मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके, माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्यासह सर्व 33 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं.

]]>
https://www.batmi.net/what-is-the-dispute-between-pandharinath-phadke-and-rahul-patil/feed/ 0 28640