intraday trading – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Wed, 21 Dec 2022 05:56:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg intraday trading – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 घरबसून उत्तम पैसा कमवायचा आहे? मग शेअर मार्केट मधील इंट्राडे ट्रेडिंग समजून घ्या… https://www.batmi.net/want-to-make-great-money-from-home-then-understand-intraday-trading-in-share-market/ https://www.batmi.net/want-to-make-great-money-from-home-then-understand-intraday-trading-in-share-market/#respond Wed, 21 Dec 2022 05:56:20 +0000 https://www.batmi.net/?p=29003 घरबसून उत्तम पैसा कमविण्याचा पर्याय म्हणून इंट्राडे ट्रेडिंग कडे पाहिलं जात आहे. हा स्टॉक चाच एक प्रकार आहे. आता प्रत्येक नवीन व्यक्तीला, ज्याला या व्यवसायात उतरायचे आहे, त्याला या व्यवसायाबद्दल जाणून घ्याचेच असते. (Want to make great money from home? Then understand Intraday Trading in Share Market)

अनेकांना हे माहित नाही की नेमकं इंट्राडे ट्रेडिंग कशाला म्हणतात. तर याच इंट्राडे ट्रेडिंगबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत, ज्यात आपण याचे फायदे, तोटे, यात लागणारी भांडवल तसेच यात मिळणाऱ्या प्रोफीट अगदी थोडक्यात आणि सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत.

आता सर्वप्रथम इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय? तर इंट्राडे म्हणजे एका दिवसापुरता आणि ट्रेडिंग म्हणजे व्यापार असा याचा अर्थ होतो. यात मार्केटमधील जोही व्यवसाय असतो तो केवळ एका दिवसापुरता मर्यादित असतो. भारतातील शेअर मार्केट सकाळी ९ वाजून पंधरा मिनिटांनी सुरु होते व सायंकाळी ४ वाजता बंद.

यात प्री ओपन सेशन, नॉर्मल सेशन आणि क्लोझिंग सेशन असे हे ठरलेले असतात. आता इंट्राडे ट्रेडिंग ची संकल्पना समजून घेण्यासाठी एक उदाहरण लक्षात घ्या. जर तुम्ही अमुक एका तारखेला महेंद्रा कंपनीचे १०० स्टोक्स २०० रुपयांना खरेदी केले आणि त्याच दिवशी २ वाजता हे स्टोक्स २१० रुपयांना विकले, अशा ट्रेंडला आपण इंट्राडे ट्रेड म्हणू शकता.

इंट्राडे चे बरेच फायदे आहेत. आणि त्यामुळेच लोक आता या व्यवसायाला फुल टाइम व्यवसाय म्हणून स्वीकारू लागले आहे. आता लोकांवर हे इंट्राडे ट्रेडिंग इतकं प्रभावी कस ठरत आहे, तर यात भांडवलासाठी मिळणारे मार्जिन एक आकर्षक बाजू ठरत आहे, मार्जिन म्हणजे एका दिवसासाठी मिळणारी उधारीच समजा.

तसेच शॉर्ट सेलिंग देखील महत्वाचे ठरत आहे. शॉर्ट सेलिंग बद्दल सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आधी स्टॉकची विक्री करायची आणि नंतर खरेदी करायची. आता तुम्ही म्हणाल जे स्टॉक खरेदीच केले नाही ते विकायचे कसे. तर बघा समजा मला असं वाटलं की आज टाटा कंपनीचे स्टॉक २००० रुपयांहून कोसळतील.

तर यावेळी मी २००० रुपयांना हे १० स्टॉक विकेल आणि १९५० रुपयांना खरेदी करेल ज्यामुळे माझा ५० रुपयांचा फायदा होईल. हे आपण केवळ इंट्राडे ट्रेडिंग मध्येच करू शकतो, आणि यामुळेच लोक याला आपली पसंती देत आहेत. यात मोठ्या प्रमाणात प्रॉफिट होण्याची देखील शक्यता असते, आता ते कसं तर यात केवळ असेच स्टॉक निवडले जातात ज्या स्टॉक मध्ये सतत हालचाल सुरु असते.

स्टॉक एक्स्चेंज मध्ये बरेच स्टॉक असे आहेत ज्यात ५ टक्के तरी हालचाल होते आणि याचाच फायदा इंट्राडे ट्रेडर घेतात. तसेच यात भांडवलाची गरजही कमीच असते आणि विशेष म्हणजे हे काम तुम्ही अगदी घरबसल्या करू शकता. आता हे तर झाले इंट्राडे ट्रेडिंगचे फायदे पण याचे तोटेही आहेतच.

असही म्हणायला हरकत नाही की इन्ट्राडे ट्रेडींग ही एक दुधारी तलवारच आहे. कारण जर हे इतकं सोपी आणि नुसतं फायद्याचंच असत, तर मला वाटत प्रत्येक व्यक्ती यात गुंतलाच असता. आता यात व्होलॅटिलिटी पाहायला मिळते. व्होलॅटिलिटी म्हणजे किमतीची अस्थिरता. व्होलॅटिलिटी स्टॉकमध्ये अंदाज बांधण्यासाठी अडचण ठरते.

दुसरं म्हणजे वेळेची मर्यादा, यात आपल्याकडे केवळ ६ तासांचा वेळ असतो, या ६ तासात स्टॉक निवडून, ट्रेड शोधून, प्रॉफिट किंवा लॉस बुक करून बाहेर पडायच असतं, असे न झाल्यास ब्रोकरच आपली पोझिशन एक्झिट करत असतात. हे सगळं करत असतांना घड्याळी कडे तर लक्ष हवच आणि आपल्याला किती प्रॉफिट होतोय याकडे सुद्धा लक्ष असणे गरजेचं असत.

बापरे यात फायदा कितीही असला मात्र हे इतकं काही सोप्प नाही. इन्ट्राडे ट्रेडींग करायलाही आपल्याकडे कौशल्यचं हवीत. पैशाचे व्यवस्थापन आणि विशेष म्हणजे संयम हा तर ट्रेडरकडे असायलाच हवा.

]]>
https://www.batmi.net/want-to-make-great-money-from-home-then-understand-intraday-trading-in-share-market/feed/ 0 29003