horror stories – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Mon, 19 Dec 2022 12:06:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg horror stories – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 पिंपळाच्या झाडावर खरंच मुंजा किंवा हडळ असते? https://www.batmi.net/is-there-really-munja-or-hadal-on-pimpal-tree/ https://www.batmi.net/is-there-really-munja-or-hadal-on-pimpal-tree/#respond Mon, 19 Dec 2022 12:06:02 +0000 https://www.batmi.net/?p=28980 मी लहान असताना सुट्ट्या लागल्या की आजी कडे राहायला जायची,आजी च्या घराच्या बाजूनी भलं मोठं पिंपळाच झाड होत.एक दिवस आम्ही रात्री बाहेर चांदण्या बघत बसलो. (Is there really munja or hadal on pimpal tree?)

मी काही तरी आणायचं म्हणून पिंपळाच्या झाडा कडे जायला निघाली इतक्यात, आजी ची हाक कानावर ऐकू आली. इतक्या रात्री पिंपळाच्या झाडा जवळ जाऊ नये तिथे मुंज्या असतो. तुम्ही ही हे नाव अनेकदा ऐकलं असतील पण आता हा मुंज्या कोण आणि हा काय प्रकार आहे हे विचारलं असता.

तो भूताखेताचाच काही तरी प्रकार असल्याचं कळलं पण पिंपळाच्या झाडाला अक्षय वृक्ष म्हटल्या जाते या विशाल वृक्षा खाली बसून गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्ती केली होती. पिंपळाच्या पानांनी लाख बनवतात त्याच्या औषधाने व्रण बरे होतात . आणि हे झाड किती तरी पटीनं आपल्यासाठी गुणकारी आहे तरीही हे झाड इतकं भयावह का ठरलं.

लोक रात्री या झाडाकडे जायला का भितात किंवा या मुंज्या मागे काही वेगळा दृष्टीकोण आहे का याचा शोध घेत असतांना काही गोष्टींचं तथ्य पुढं आलं पण ते काय हेच आपण आज यामाध्यमातून जाणून घेणारआहोत.

प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही कारण नक्कीच असते तसच,या पिंपळाच्या झाडावरच्या मुंज्या मागे ही एक शास्त्रीय कारण आहे आता ते काय तर सगळे वृक्ष दिवसा वातावरणातील कार्बनडाय ऑक्सईड शोषून सूर्य प्रकाशाच्या साहाय्याने झाडासाठी पोषक अन्न तयार करतात आणि मोबदल्यात प्राणवायू सोडतात.

मात्र रात्री सूर्य किरणांच्या अभावी त्याच्या कार्यात अडथळा येतो आणि त्यांच्या वाटे कार्बनडाय ऑक्सइड बाहेर टाकल्या जातो . हा वायू मानवी शरीरासाठी हानिकारक असतो म्हणून रात्रीच्या वेळी झाडाजवळ जाऊ नये असे मोठे आपल्याला सांगतात. आता हे तत्व तर सगळ्याच झाडा साठी लागू आहे मग पिंपळाच्या झाडात असं काय की यालाच असं भयावह बनवलं.

तर पिंपळाच झाड रात्रीच्या अनाघ्रात मोठ्या राक्षसासारखा वाटतो . पिंपळाच्या पानांची सळसळ होता ती एका वर एक आपटून पावलांचा आवाज येतो आणि कितीही म्हटलं तरी शेवटी आपण मनुष्यच आपण या आवाजाने लवकर घाबरून जातो अन अश्याच गोष्टीं मुळे पिंपळावरच्या मुंज्या च्या दंतकथांना सुरुवात झाली.

परंतु प्रत्येक अध्यात्मिक श्रद्धेमागे, विज्ञान लपलेलं आहे. पिंपळाच्या झाडावर मुंजा असतो अशी दंतकथा प्रचलित झाल्याने त्या झाडाला कापण्याचा, तोडण्याचा, सहसा कोणी प्रयत्न करत नाही . भुताखेतांच्या कथा रचून वृक्ष भोवती कुंपण आखण्यात आले कारण जीवाची भीती प्रत्येकालाच असते म्हणूनच या पुरातन वृक्षाची कत्तल कमी प्रमाणात होते. तरी प्रश्न उरतोच की मुंज्या म्हणजे नेमकं काय?

तर रिकामटेकडी माणसं, जी हमखास गावाच्या पारावर काथ्याकूट करत बसलेली असतात अश्या लोकांचा संग टाळा,असाही एक त्याचा अर्थ घेता येईल. कस असतं, एखाद्या लहान मुलांना काही गोष्ट सांगितली की ते ऐकत नाही आणि जर तुम्ही त्यांना भीती घातली की ते लगेच शांत होतात.

ऐकतात पण हे मोठे लोक भीती दाखवायसाठी नाही ,तर काळजी पोटी करतात. तसाच काही तरी पिंपळाच्या झाडा सोबत झालय.
अक्षय वृक्षापासून जैविक पर्यावरण समतोल राहण्यास मदत होते. निसर्गचक्र झाडांमुळे सुरळीत चालते.

ह्या सर्व गोष्टी आपल्या पूर्वजांना ठाऊक असाव्या म्हणूनच वृक्ष संवर्धनासाठी लोककथा रचून मनामध्ये भीतीच्या रूपात चिंच, वड, पिंपळ, औदुंबर अश्या झाडांवर विविध आख्यायिका तयार झाल्या.

एका पिढी पासून दुसऱ्या पिढी पर्यंत या पसरत गेल्या. म्हणून कुठल्याही गोष्टी मागे काही ना काही कारण असतात त्या मागील कारण जाणून घ्या आणि मगच कुठल्याही गोष्टी वर विश्व ठेवा.

]]>
https://www.batmi.net/is-there-really-munja-or-hadal-on-pimpal-tree/feed/ 0 28980