guwahati – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Mon, 28 Nov 2022 06:29:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg guwahati – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 पुन्हा गुवाहाटीला जाण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्देश नेमका काय आहे? https://www.batmi.net/what-exactly-is-the-purpose-of-chief-minister-eknath-shinde-to-go-to-guwahati-again/ https://www.batmi.net/what-exactly-is-the-purpose-of-chief-minister-eknath-shinde-to-go-to-guwahati-again/#respond Mon, 28 Nov 2022 06:29:55 +0000 https://www.batmi.net/?p=28533 मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात गुवाहाटी चांगलेच चर्चात आहे. तीन महिन्यापूर्वी शिवसेना पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे आपल्यासोबत असलेल्या सर्व आमदारांना घेऊन आधी सुरतला आणि तिथून गुवाहाटी येथे मुक्कामी होते. गुवाहाटी येथे सर्वाधिक काळ त्यांचा मुक्काम होता. (What exactly is the purpose of Chief Minister Eknath Shinde to go to Guwahati again?)

या काळात त्यांनी भारतातील एक प्रसिद्ध देवस्थान असलेल्या कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन तिथे विशेष पूजा केली होती. आमचे प्रयत्न सफल होऊ देत असे साकडे देखील कामाख्या देवीला घातले . त्यामुळेच मुख्यमंत्री बनल्यानंतर आता पुन्हा एकनाथ शिंदे हे त्याच देवीच्या दर्शनाला गेले आहेत.

कामाख्या देवीला केलेला नवस फेडण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री शिंदे आपल्या सगळ्याच शिंदे समर्थक आणि आमदारांसह गुवाहाटीला पोहोचलेत.जून महिन्यात राज्यातील घडामोडीच्या काळात शिंदे यांना आसामच्या ज्या व्यक्तींनी मदत केली त्यांची ते भेट घेणार आहेत.

या दौऱ्यात कामाख्या देवीच्या मंदिरात मुख्यमंत्री शिंदेंकडून विशेष पूजे चे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व मंत्री, आमदार आणि खासदारांसह काल गुवाहाटीच्या दौऱ्याला निघाले आहेत. 26 आणि 27 असा दोन दिवसीय हा दौरा आहे.

पण गुवाहाटी दौऱ्याला रवाना होण्या आधी मुख्यमंत्र्यानी प्रतिक्रिया देत सांगितले होते कि आसामच्या मुख्यमंत्र्यानी आम्हाला निमंत्रण दिले होते .तेव्हा गडबडीत होतो . तेव्हा आम्ही इथे आलो . आणि तेव्हा आसामच्या मुख्यमंत्र्यानी निमंत्रण दिल्या प्रमाणे आम्ही जात आहोत. कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहोत त्यांमध्ये कोणाला काही वाईट वाटण्याचे कारण नाही .

आमची श्रद्धा आहे .भक्ती भावाने सर्व लोकांची इच्छा आहे , तिकडे परत जायची आणि जात आहोत . राज्यातील बळीराजाला चांगले दिवस येऊ द्या . जनता सुखी होऊ दे . राज्यावरील संकट दूर होउदे, यासाठी आम्ही जात आहोत. आमचा दुसरा काही हेतू नाही.

जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल ,सुख, समृद्धी, आनंद असू दे. राज्यातील जनतेला सुखी करावे, या भावनेने आम्ही कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहोत. दलित पँथर गंडाटे आम्हला समर्थन दिले आहे कामाख्या देवी ने आमची इच्छा पूर्ण केली आणि जनतेच्या मनातील सरकार स्थापन झाले आहे. असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी गुवाहाटीला प्रस्थान करण्यापूर्वी केले.

पण सहाजिकच मुख्यमंत्र्यांच्या या गुवाहाटी दौऱ्यावर विरोधकांनी आरोप देखील केले आहेत. स्वातंत्र्याच्या काळात मदत केलेल्या प्रत्येकाला मुख्यमंत्री स्वतः जाऊन भेटून त्यांचे आभार व्यक्त करत आहेत. तसेच कामाख्या देवीला घातलेले साकडे देखील ते पूर्ण करणार आहेत.

पण आधीच ज्योतिषाला हात दाखवल्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका होत असताना पुन्हा एकदा देव दर्शनाला संपूर्ण मंत्री आमदार आणि खासदारांना नेल्याने हा गुवाहाटी दौरा देखील वादग्रस्त होण्याची चिन्ह दिसत आहेत.

]]>
https://www.batmi.net/what-exactly-is-the-purpose-of-chief-minister-eknath-shinde-to-go-to-guwahati-again/feed/ 0 28533