Government scheme – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Wed, 14 Dec 2022 12:08:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg Government scheme – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 तुम्हालाही गुंतवणूक करायची आहे?, जाणून घ्या या सरकारी योजनांबद्दल… https://www.batmi.net/do-you-also-want-to-invest-know-about-these-government-schemes/ https://www.batmi.net/do-you-also-want-to-invest-know-about-these-government-schemes/#respond Wed, 14 Dec 2022 12:08:31 +0000 https://www.batmi.net/?p=28931 आपले भविष्य आर्थिदृढया उज्वल व्हावे या उद्धेशाने जो तो आपल्या परीने गुंतवणूक करत असतो पण पैसा नेमका कुठे गुंतवायचा,याबद्दल आपल्यापैकी अनेकांना फारशी माहिती नसते. बहुतेक वेळा गुंतवणूक करत असताना ज्या काही रिटर्न्स असतात, त्याच्याबद्दल अनेकांना माहित नसते. (Do you also want to invest?, know about these government schemes)

शेयर मार्केटमधील गुंतवणूक जोखीमेची मानली जाते , मार्केटच्या कमीजास्त पणामुळे गुंतवणूकदाराचे अनेकदा नुकसान होते.आणि अपेक्षित परतावा न मिळाल्याने गुंतवणुकीचा लाभ मिळत नाही मात्र, असे असले तरी देशात अनेक प्रकारच्या योजना आहेत ज्यामध्ये निश्चितच परतावा प्राप्त होऊ शकतो.

सांगायचं झालं तर , ईपीएफ आणि पीपीएफ यासारख्या सरकारच्या योजना देखील आहेत. या दोन्ही योजनांची नावे एकसारखी असल्यामुळे अनेकजणांचा गोंधळ उडतो. परंतु या दोन्हीही योजना पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत. ईपीएफ म्हणजे एम्प्लॉई प्रॉव्हिडन्ट फंड आणि पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडन्ट फंड रिटायरमेंटनंतर लागणारा पैसा उभा करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत.

ईपीएफ आणि पीपीएफ. यात तुम्ही दीर्घकाळात नियमितपणे थोडा-थोडा पैसा साठवू शकता ज्याने रिटायरमेंटच्या वेळी तुम्ही हा पैसा वापरू शकता. रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी ईपीएफ आणि पीपीएफ बऱ्यापैकी लोकप्रिय पर्याय आहेत. कारण यात तुमची गुंतवणूक सुरक्षित राहाते आणि त्यावर एक निश्चित परतावा मिळतो.

तसेच, या दोन्ही योजनांमध्ये कर सवलतीसह कर-समायोजित परतावा मिळतो. तरीही, तुम्ही दोन्हीमध्ये किंवा यापैकी एकात गुंतवणूक करून रिटायरमेंट सुरक्षित करण्याआधी फरक जाणून घ्या. ईपीएफ आणि पीपीएफ या दोन्हीमध्ये गोंधळून जाण्याचे काहीच कारण नाही. ईपीएफ हा केवळ नोकरदार वर्गासाठी असतो.

तुम्ही सरकारी नोकरीत असा किंवा खासगी नोकरीत असा. तुमच्या मासिक पगारातील ठराविक रक्कम आपल्या ईपीएफ खात्यात जमा केली जाते. ईपीएफ खात्याची इपीएफओ कार्यालयाकडे अधिकृत नोंद असते. तर पीपीएफ चे खाते कोणत्याही व्यक्तीला उघडता येते. यासाठी तो व्यक्ती कोणत्या सरकारदरबारी किंवा इतर कोणत्या खासगी संस्थेत नोकरीला असायलाच पाहिजे असे बंधन नसते.

अगदी नोकरी न करणारा, शेती, व्यवसायिक, गृहिणी आदि गोष्टी करणारी व्यक्तीही हे खाते उघडू शकते. भारतातील कोणताही नागरिक कोणत्याही बॅंकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ चे खाते उघडू शकतो. जर एखादी व्यक्ती नोकरी करत असेल आणि कंपनी ईपीएफओ एक्ट अंतर्गत रजिस्टर्ड असेल, तर त्याच्या पगारातून प्रत्येक महिन्याला काही रक्कम ही प्रोविडेंट फंड मध्ये जमा होते.

जर एखाद्या कंपनीमध्ये २० पेक्षा जास्त लोक काम करत असतील तर अशा ठिकाणी हा कायदा लागू करणे अत्यंत गरजेचे ठरते. आणि त्या कंपनीचा ईपीफ कापला जातो. या योजने अंतर्गत कर्मचाऱ्याला त्याच्या पगाराची ठराविक रक्कम ईपीएफ खात्यात जमा करावी लागते. आणि नियोक्ताही तेवढीच रक्कम ईपीएफ खात्यात जमा करतो.

भविष्यात सर्व कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण हा ईपीएफ चा खरा उद्देश आहे. त्यात जमा केलेल्या रकमेचा व्याज दरही मिळतो आणि कर सूटही मिळते. ईपीएफ मध्ये गुंतवणूक केल्यावर आपल्याला टॅक्स मध्ये देखील सवलत मिळते. गुंतवणूक केल्यावर सेक्शन ८० सी अंतर्गत डिडक्शनचा लाभ मिळतो.

याशिवाय तुमचा पुर्ण इन्वेस्टमेंट टॅक्स देखील मोफत होतो. ईपीएफओ मध्ये गॅरंटी रिटर्न मिळते. नुकतेच ईपीएफओ बोर्ड ने आर्थिक वर्ष २०२१ -२२ साठी ८. १ टक्के व्याज दर देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आर्थिक वर्षी हा दर ८. ५ इतका होता.
पीपीएफ ही सरकारद्वारे हमी दिलेली गुंतवणूक योजना आहे जी विशिष्ट परतावा आणि कर लाभ देते.

पगारदार आणि पगार नसलेले लोक पीपीएफ खाते उघडू शकतात. विशेष म्हणजे नियोक्ता पीपीएफ मध्ये कोणतेही योगदान देत नाही . पीपीएफ योजनेत गुंतवलेल्या रकमेवर चक्रवाढ व्याज मिळतो. या योजनेत १५ वर्षासाठी गुंतवणूक करता येते. जर एखाद्या व्यक्तीची बेसिक सॅलरी १५ हजार रूपये पेक्षा कमी असेल तर त्याच्यासाठी एंप्लॉयी प्रोविडेंट फंड मध्ये ठराविक रक्कम जमा करावी लागते.

कमी पगार असणाऱ्या लोकांना हे अनिवार्य नाही परंतु प्रॉव्हिडंट फंड च्या मदतीने तुम्हाला भविष्यात मदत मिळते. प्रत्येक महिन्याला तुमच्या सॅलरीतून ठरावीक रक्कम खात्यामध्ये जमा केली जाते. काही ठराविक भाग कर्मचाऱ्यांकडून देखील जमा केला जातो. आपण जमा केलेल्या रकमेवर सरकार व्याज मिळवते अशा प्रकारेच तुमचे पेन्शन फंड तयार होते.

याच्या मदतीने लॉंग टर्म वेल्थ निर्माण केले जाऊ शकते. या योजनेचा लाभ कोणताही भारतीय नागरिक घेऊ शकतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये पीपीएफ वर ७. १ टक्के व्याज दर मिळत आहे. व्याजदराचा निर्णय एक महिना किंवा तीन महिन्याच्या आधारावर घेतला जातो. पगारदार कर्मचारी नेहमी ईपीएफमध्ये गुंतवणूक करतात. तसेच पीपीएफमध्ये स्वतंत्रपणे पैसे जमा करू शकतो.

]]>
https://www.batmi.net/do-you-also-want-to-invest-know-about-these-government-schemes/feed/ 0 28931