gangster news – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Mon, 28 Nov 2022 05:53:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg gangster news – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 दुर्लभ कश्यप चा गॅंगवॉर मध्ये मृत्यू झाल्यावरही त्याची तरुणांमध्ये इतकी क्रेज का? https://www.batmi.net/even-after-the-death-of-durlabh-kashyap-in-gangwar-why-is-he-so-much-craze-among-the-youth/ https://www.batmi.net/even-after-the-death-of-durlabh-kashyap-in-gangwar-why-is-he-so-much-craze-among-the-youth/#respond Sun, 27 Nov 2022 09:32:57 +0000 https://www.batmi.net/?p=28477 आजकाल तरुणाईतील काही मुलं गुंडागर्दी प्रस्थापित करण्यासाठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करतात. सोशल मीडिया जितके उपयोगाचे मानले जाते, त्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त ते धोक्याचे झाले आहे. कोणत्या व्यक्तीला आपला आदर्श बनवावा व कोणत्या व्यक्त्तीला बनवू नये यातील फरक देखील आजच्या पिढीला समजून घेणं जणू कठीणच झालं आहे. एका अशाच किशोरवयीन डॉन ला आपला आदर्श बनवून काही तरुण त्याच्याच पाउलांवर चालत आहेत. (Even after the death of Durlabh Kashyap in Gangwar, why is he so much craze among the youth?)

आता हा डॉन कोण? तर हा डॉन म्हणजे दुर्लभ कश्यप. काही जणांना हा कोण आहे हे चांगलेच ठाऊक असेल. आता हा कोण आहे म्हणण्यापेक्षा कोण होता हे विचारणे बरोबर असेल कारण. कारण एका गॅंगवॉर मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर देखील त्याची इतकी फॅन फॉलोविंग कशी? तो नेमका कोण होता? हेच या माध्यमातून आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

उज्जैनचा कुख्यात गुंड अशी दुर्लभ कश्यपची ओळख होती, वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी त्याने गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल टाकले. सोशल मीडियावर तो चांगलाच प्रसिद्ध होता.

त्याने आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलवर कुठलीही भीती न बाळगता ” कुख्यात, बदमाश हत्यारा पीवर अपराधी, कोणसाभि और कैसाभि विवाद करणा हो तो मुझे संपर्क करे” असं लिहिलं होत. हि जणू त्याची सुपारी घेत असल्याची जाहिरातच होती.

खांद्यावर पांढर्या रंगाचं उपरणं, काळा शर्ट, गळ्यात जाड माळ, डोळ्यात काजळ, कपाळावर लाल रंगाचा आडवा टिळा असा त्याचा पेहराव होता. उज्जैनमधील शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलं देखील दुर्लभच्या गॅंग मध्ये सामील झाले होते.

केवळ १८ वर्षाचा होईस्तोवर त्याच्यावर तब्ब्ल ९ केसेस दाखल झाल्या होत्या. सोशल मीडियावर आक्षेपार्ह्य मजकूर टाकल्यामुळे त्याला व त्याच्या साथीदारांना २०१८ साली अटक देखील करण्यात आली होती.

यावेळी पोलीस अधिकारी सचिन अतुलकर यांनी त्याला चेतावणी देखील दिली होती, कि जोवर तू तुरुंगात आहेस सुखरूप आहेस, ज्या दिवशी तुरुंगाबाहेर जाशील तुझा नक्की खून होईल.” आणि अगदी तेच झालं.

दुर्लभ कश्यप जामिनीवर बाहेर आला असता, ६ सप्टेंबर २०२० च्या रात्री आई आणि मित्रांसोबत जेवण केल्यानंतर एका पानटपरीवर सिगारेट आणि चहा पिण्यासाठी गेला.

तिथे केकेसी नावाने ओळखली जाणारी गॅंग उपस्थित होती, ज्यात शहनवाज, शाबाद, राजा, रमीज आणि त्याचे भाऊ होते. या गॅंग मध्ये पूर्ववैमनस्यांतून वाद झाला.

ज्यात दुर्लभ कश्यपची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. त्याच्यावर चाकूने सपासप वार केले गेले, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दुर्लभच्या इतर साथीदारांनी घटनास्थळावरून पळ काढला आणि पोलिसांना दुर्लभ कश्यपचा अर्ध नग्न अवस्थेतील मृतदेह मिळाला.
वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी त्याची हत्या झाली. दुर्लभ कश्यपची इतकी निघृण हत्या होऊन देखील आजही त्याचे अनेक चाहते आहे.

गेल्या फेब्रुवारी महिन्यातच औरंगाबाद येथे फुकट विडी- सिगारेट न दिल्यामुळे शुभम नावाच्या एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ज्यात या तरुणाच्या डोक्याला ५0 टाके लागले. या टोळीने आपण दुर्लभ कश्यपचे मोठे चाहते असल्याचे जाहीरपणे सांगितले. आणि आपण दुर्लभ कश्यपच्याच गॅंगमधील असल्याचे या आरोपींचे सांगणे आहे.

अनेक तरुण तर नशेच्या आहारी जाऊन, गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहेत आणि यामुळेच तरुण मुलांची गुंडागर्दी देखील वाढत आहे. दुर्लभ कश्यप सारख्या गुंडांचा गॅंगवॉर मध्ये अंत होऊंन देखील काही तरुण आजही सुधारायला नाहीत.

किशोरवयीन मुलं देखील डॉन होण्याची स्वप्न पाहतात ही खरं तर शोकांतिका आहे. यासांदर्भात पोलीस प्रशासना समवेत समाजानही वेळीच पाऊल उचलणे गरजेचे आहे.

]]>
https://www.batmi.net/even-after-the-death-of-durlabh-kashyap-in-gangwar-why-is-he-so-much-craze-among-the-youth/feed/ 0 28477