earthquakes – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Mon, 28 Nov 2022 12:11:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg earthquakes – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 भारतात येणारे छोटे भूकंप म्हणजे मोठ्या भूकंपांचा इशारा तर नाही ना? https://www.batmi.net/small-earthquakes-in-india-are-not-the-warning-of-big-earthquakes-right/ https://www.batmi.net/small-earthquakes-in-india-are-not-the-warning-of-big-earthquakes-right/#respond Mon, 28 Nov 2022 12:11:20 +0000 https://www.batmi.net/?p=28573 ९ नोव्हेंबर रोजी राजधानी दिल्ली आणि त्याच्या जवळ असलेल्या काही भागांमध्ये भूकंपाचे जोरदार झटके जाणवले. राजधानी दिल्लीसोबतच पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा इत्यादी राज्यात देखील हे धक्के जाणवलेत. गेल्या सप्टेंबर महिन्यात ३५ वेळा, ऑकटोबरमध्ये ५० वेळा, भारताने हे भूकंपाचे झटके सहन केले आहेत? आता प्रश्न उपस्थित होतो असे का? भारताला अचानक भूकंपाचे झटके का सोसावे लागत आहे? हेच आपण सविस्तर जाणून घेऊयात. (Small earthquakes in India are not the warning of big earthquakes, right?)

गेल्या काही दिवसात भारतात भूकंपाचे झटके अनुभवले जात आहे. राजधानी दिल्ली समवेत पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंडमध्ये हे धक्के जाणवले. याचवेळी नेपाळ मध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळ मध्ये तर हा धक्का इतका जोरदार होता, कि इथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले.

तब्बल ६.३ तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे इथे जाणवले, आणि या घटनेत एक घर कोसळून सहा जणांचा दुर्दैवी अंत झाला. याच वर्षी ऑकटोबर महिन्यात ५० वेळा भूकंपाचे धक्के भारतातील विविध राज्यांमध्ये जाणवले. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मोलॉजीनुसार ऑकटोबर महिन्यात ५० पेक्षा अधिक धक्क्यांनी देश हादरला.

हिमाचल येथे ६ वेळा, कर्नाटकमध्ये ५ वेळा, आसाम आणि राजस्थानमध्ये ३ वेळा, उत्तराखण्डमध्ये ४ वेळा तर गुजरात, अंदमान आणि छत्तीसगडमध्ये २- २ वेळा भूकंपाचे जोरदार हादरे बसले. यासोबतच लडाख, जम्मू-काश्मीर, मणिपूर मध्ये सुद्धा हे हादरे जाणवले.
संप्टेंबर महिन्यात सुद्धा ३५ पेक्षाही अधिक भूकंपाचे धक्के जाणवले.

यात महाराष्ट्रात सर्वाधिक ७ वेळा, तर लडाखमध्ये ४ वेळा हे धक्के जाणवलेत. यात अरुणाचल प्रदेश, गुजरात, आसाम, मणिपूर, हिमाचल, जम्मू- काश्मीर, मेघालय, पंजाब, उत्तराखंड, राजस्थान आणि अंदमान सारख्या राज्यांचा देखील समावेश होता.
आता भूकंप येण्याची कारणे काय आणि या छोट्या भूकंपामागे मोठ्या दुघटनेची शक्यता तर नाही ना?

हा सवाल देखील अनेकांच्या मनात निर्माण होत आहे. तर या मागील कारण असे की पृथ्वीच्या आत ७ प्लेट्सची लेअर असते, जी सतत फिरत असते. फिरतांना ज्या जागेवरून या प्लेट्स फिरतात तिथे टक्कर होते आणि दबावामुळे या प्लेट्स तुटू लागतात. या प्लेट्स तुटल्यामुळे एक ऊर्जेचा स्रोत बाहेर येतो आणि याच डिस्टर्बन्स मुळे भूकंप येतो.

आता हे छोटे भूकंप म्हणजे मोठ्या भूकंपाचा तर इशारा नाही ना? हा प्रश्न देखील अनेकांना सतावतोय. एक्स्पर्टस देखील ही आशंका असण्याला नकार देत नाहीत, परंतु एक्स्पर्टसचं असं देखील सांगणं आहे की, दिल्लीला सर्वात मोठा धोका हा हिमालय रिजन पासन आहे. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मोलॉजीचे सांगणे आहे की, दिल्ली मध्ये मोठा भूकंप येण्याची शक्यता कमी आहे परंतु, याला आपण पूर्णतः नकार देखील देऊ शकणार नाहीत.

कारण काही अभ्यासकांचे हे देखील सांगणे आहे की, याप्रकारचे छोटे भूकंप म्हणजे मोठ्या भूकंपाची जणू चेतावणीच असते. यापूर्वी सुद्धा कॅलिफोर्निया येथे ४.० तीव्रतेचा भूकंप येण्यापूर्वी असेच हलके झटके अनुभवण्यात आले होते. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत चार भूकंपीय क्षेत्रात विभागला गेला आहे.

ज्यातील जोन क्रमांक ५ सर्वात जास्त धोकादायक असून, यात ९ तीव्रते पर्यंतचा भूकंप येऊ शकतो. यात हिमाचल प्रदेश, जम्मू- काश्मीर मधील काही भाग, उत्तराखंड, गुजरात येथील कच्छ रन आणि उत्तर बिहारचा समावेश आहे. भारत, चीन आणि मुख्यतः नेपाळ ला सतत भूकंपाचे धक्के लागत आहेत. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केल द्वारे ६. ३ इतकी मोजण्यात आली आहे. त्यामुळे आता सतर्क राहणे अतिशय आवश्यक आहे.

]]>
https://www.batmi.net/small-earthquakes-in-india-are-not-the-warning-of-big-earthquakes-right/feed/ 0 28573