birds – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Fri, 23 Dec 2022 11:30:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg birds – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 टिटवी या पक्षाचे अंडे माणसाने खाल्ले तर त्याची झोप खरचं पूर्णपणे नाहीशी होते का? https://www.batmi.net/if-a-person-eats-the-egg-of-titvi-does-his-sleep-really-disappear-completely/ https://www.batmi.net/if-a-person-eats-the-egg-of-titvi-does-his-sleep-really-disappear-completely/#respond Fri, 23 Dec 2022 11:30:55 +0000 https://www.batmi.net/?p=29052 तुम्ही अनेक पक्षांबद्दल ऐकलं असेल, पण तुम्हला टिटवी या पक्षाबद्दल माहिती आहे का हो… असं म्हटल्या जाते की टिटवी या पक्षाचे अंडे जर मनुष्याने खाल्ले तर त्याची झोप नाहीशी होते. सोबतच टिटवी या पक्षाला अपशकुनी सुद्धा म्हटल्या जाते. (If a person eats the egg of Titvi, does his sleep really disappear completely?)

एखाद्याच्या घरावरून टिटवी आवाज करत गेली ,की काहीतरी अपशगुन होणारच.. अशे लोक बोलतात पण हे कितपत खरंय ? हेच आज यामध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर टिटवी या पक्षा बद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. ३३ सेंटीमीटर आकाराचा असणारा हा जीव. रात्रीच्या शांततेचे गूढ वाढविण्याच्या आवाजाच सामर्थ असणाऱ्या पक्षांमध्ये टिटवीला गणल्या जात.

पण टिटवी बद्दल बोलल्या जाणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या आहेत का ? तर या बद्दल एक-एक करून आपण समजून घेऊयात. तर पाहीली गोष्ट अशी की हा पक्षी अपशगुणी असतो का? पूर्वी एखाद्या घरावरून ही टिटवी रात्री-बेरात्री जोरजोराने ओरडत गेली की , अनेकांचा रात्रभर डोळ्याला डोळा लागत नसायचा. कारण टिटवीचा आक्रोश हा प्रियजनांच्या विरहाचा संदेश असल्याची समजूत आहे.

पण खर सांगायचं तर हि निव्वळ एक अफवा आहे जी पिढी न पिढी पसरत गेलीय. टिटवी हा पक्षी केवळ आपल्या ओरडण्यासाठी बदनाम आहे. परंतु टिटवीच्या ओरडण्या मागे सुद्धा एक रंजक गोष्ट आहे. तिच्या ओरडण्यातून अपशकुन होत नाही तर तिच्या पिल्लांचं संरक्षण होत, आता तुम्ही म्हणत असाल ते कसं, तर आता आपण एक उदाहरण घेऊयात आपल्याला काही झालं किंवा आपल्यावर कुठलं संकट आलं.

की आपले आई वडील कुठलाही विचार न करता आपल्या संरक्षणासाठी धावपळ करत असतात. तसंच यांचं आहे.. हे पक्ष्याचं जोडपं आपल्या घरट्यातील अंड्यांवर, त्यातनं डोकावणाऱ्या लालचुटूक पिल्लांवर अतोनात प्रेम करतं.आपल्या घरट्यावर घारीचीच काय, पण झाडाच्या पानाच्या सावलीची दखलसुध्दा या पक्ष्याला अस्वस्थ करते. अन् तिथनंचं सुरू होतो या जीवाचा आकांत.

ज्यातली करूणा , पिलांच्या रक्षणासाठीची आर्तता डोळ्याआड करत आपल्याचं पिल्लांचा विचार ते करू लागतात. नदी परिसर, ओसाड, माळराने, मैदान आणि निर्जन डोंगरावर या पक्षाचे अधिवास असते. कारण घर बांधने टिटवीला शक्य नाही तिच्या पायाची विशिष्ट रचना असल्याने ती जमिनीवरच राहते. टिटवी ला झाडाची फांदी धरून ठेवता येत नाही.

जमिनीवर खड्डा खोदून टिटवी त्यात आपली अंडी घालते.या घरट्या जवळ साप ,कोल्हा, लांडगा ,मुंगूस किंवा माणूस असा कोणताही प्राणी आल्यास टिटवी जिवाचा आक्रोश करून आसमंत डोक्यावर घेते. तर दुसरी टिटवी घरट्याच्या दूर पंख मोडल्याने फडफडत असल्याचं नाटक करते, त्यामुळे शत्रू प्राण्याचे लक्ष विचलित होते तो प्राणी जखमी असल्याचे नाटक करणाऱ्या टिटवीच्या दिशेने जातो.

त्याला भुलवत – भुलवत ती घरट्यापासनं दूर नेऊन त्याची दिशाभूल करते आणि पिल्यांच्या-अंड्यांचं रक्षण करते. मादी एका वेळी ३ ते ४ तपकिरी आणि राखाडी रंगाची टिपके असलेली अंडी देते.या अंड्यातून बाहेर आलेली पिल्ली दोन दिवसातच धावू लागते. त्याच्यावर कोणतं संकट येणार हे टिटवी ला कळताच ती सांकेतिक आवाजातून आपल्या पिल्लांना सतर्क करते.

आपल्या पालकांच्य ओरडण्यातून संकेत मिळताच पाय दुमडून हि पिल्लं जमिनीशी एकरूप होऊन जातात. त्यामुळे शत्रू प्राण्याला त्यांच्या असण्याची थोडीही चाहूल लागत नाही आणि तो प्राणी तिथंन दूर जातो. याच कारणांमुळे खासकरून माळरानात टिटवी सतत ओरडत असते. हा तिचा आवाज अपशगुन नाही तर तिच्या पिल्लांसाठी तिची काळजी असते

आता दुसरी गोष्ट म्हणजे टिटवी पक्षाचे अंडे जर मनुष्याने खाल्ले तर त्याची झोप नाहीशी होते का ? तर असल काहीही नाही आहे.. ही केवळ लोकांनी पसरवलेली एक अंधश्रद्धा आहे… कारण अजून पर्यंत आम्हला तरी असला कोणता मनुष्य सापडलेला नाही. आणि सांगायचंच झालं तर मी म्हटल्या प्रमाने टिटवीचं आपल्या अंड्यावर आणि पिल्लांवर अतोनात प्रेम आहे.

तुम्ही तिच्या अंड्यांना हात जरी लावला तर ती तुम्हाला सोडणार नाही. टिटवी एक हिंमतवान पक्षी आहे . आपलं मानवी मन कुठलीही गोष्ट ऐकलं की लगेच घाबरत आणि अश्या अफवांना तर आपण खूप लवकर बळी पडतो. मला वाटत आता तुमचा गैरसमज दूर झाला असावा आता कधीही तुमच्या घरावरून टिटवी ओरडत गेली, की मनात भीती ची धाक नाही तर टिटवीच्या मायेची आस म्हणून तुम्ही तिच्या कडे बघा.

]]>
https://www.batmi.net/if-a-person-eats-the-egg-of-titvi-does-his-sleep-really-disappear-completely/feed/ 0 29052