Atal Bihari Vajpayee – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Mon, 26 Dec 2022 11:15:54 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg Atal Bihari Vajpayee – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 बर्थडे स्पेशल: जेव्हा अटल बिहारी वाजपेयी बैलगाडीतून संसदेत पोहोचले होते… https://www.batmi.net/birthday-special-when-atal-bihari-vajpayee-reached-parliament-in-a-bullock-cart/ https://www.batmi.net/birthday-special-when-atal-bihari-vajpayee-reached-parliament-in-a-bullock-cart/#respond Mon, 26 Dec 2022 11:15:54 +0000 https://www.batmi.net/?p=29093 आज पेट्रोल आणि डिजेलचे भाव गगनाला भिडले आहेत, अश्यात अटल बिहारी वाजपेयी यांचा एक किस्सा आठवतो. मला सांगा जेव्हा एखादी मोठी व्यक्ती किंवा मोठा नेता तुम्हाला बैलगाडीतुन फिरताना दिसला तर तुम्हाला कस वाटेल, थोडं विचित्रच वाटेल ना. (Birthday Special: When Atal Bihari Vajpayee reached Parliament in a bullock cart)

की इतका मोठा माणूस असा का फिरतोय. तर आपले भारताचे पुर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अशेच एकदा बैलगाडीत बसून संसदेत पोहोचले होते, आता ते बैलगाडीतूनच का गेले, ते तर कार ने ही जाऊ शकत होते.

पण बैलगाडीतुन जाण्यामागेही त्यांचा एक मोठा किस्सा प्रचलित आहे. आणि विशेष म्हणजे या किस्स्याची चर्चा संपूर्ण विश्वात झाली होती. चला तर मग यामध्ये जाणून घेऊयात हा किस्सा नेमका आहे तरी काय.

तर गोष्ट आहे १९७३ ची. इंदिरा गांधी त्या काळात भारताच्या पंतप्रधान होत्या,आणि पूर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे जनसंघ म्हणजेच आता ची भाजपाचे मुख्य नेता होते.

या दिवसांमध्ये इंदिरा गांधी पेट्रोल वाचवण्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बग्गीतून प्रवास करत होत्या. कारण त्यावेळी जगभरात तेल एक्स्पोर्ट करणारी ऑर्गनायजेशन ओपेक ने तेल निर्यात कमी करण्याचा निर्णय घेतला.

तेल निर्यातदार देशांच्या संघटनेने म्हणजेच ओपेक ने जगभरातील तेलाचा पुरवठा कमी केला तेव्हा तेल संकट आले. आणि याचे नुकसान भारताला देखील झाले, कारण पेट्रोल डिजेलसाठी भारत पूर्णपणे या देशांवरच निर्भर होता.

आता त्या वेळी परिस्थीला बघून इंदिरा गांधी सरकार कडे महसुलासाठी तेलावर कर लावण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता त्यामुळे,इंदिरा गांधींच्या सरकारने तेलाच्या किमती ८० टक्क्यांहून अधिक वाढवण्याचा निर्णय घेतला.

आता इतका मोठा निर्णय घेतल्या नंतर विरोधी पक्ष शांत कसा राहणार.आणि म्हटल्या प्रमाणे विरोधी पक्षाने या विरुद्ध जोरदार आंदोलन केले, पण यातही वेगळी आणि मजेशीर गोष्ट अशी घडली की.

नोव्हेंबर १९७३ चे संसदीय अधिवेशन सुरु होणार होत, सरकारला घेरण्याचा विरोधी पक्षाचा प्लॅन होता, पण त्यातच याच प्लॅन सोबत काही वेगळं करण्याचा प्लॅन जनसंघ म्हणजेच आताच्या भाजपाने केला होता.

वाजपेयी यांच्या डोक्यात काही तरी शिजत होत आणि बघतो तर काय. भारताचे पूर्व पंतप्रधान आणि जनसंघ प्रमुख अटल बिहारी वाजपीयी, आपल्या दोन साथीदारान सोबत चक्क बैलगाडी वर बसून संसदेत पोहोचले.

इतकच नव्हे तर काही मेम्बर ऑफ पार्लियामेंट सायकल वरून सुद्धा सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत संसदेत पोहोचले.हे बघून त्या वेळी तिथे सगळेच आश्चर्यात होते.

हा एक अनोखा आणि वेगळा निषेध होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिजेलच्या विरोधात पहिल्यांदाच अश्या आंदोलनाची बातमी प्रसिद्ध झाली होती, त्या वेळी न्यूयॉर्क टाइम्स ने देखील या निषेधाचे वृत्त प्रसिद्ध केले होते.

आता जेव्हाही पेट्रोल डीझेल चे भाव वाढतात तेव्हा अटलजींचा हा अनोख्या बैलगाडीच्या निषेधाचा किस्सा नेहमीच आठवतो. पण आज परिस्तिथी अशी झाली आहे की तेव्हाचे या आंदोलनातले नेते आता मात्र पेट्रोल डीजेल च्या वाढत्या भावावर शांत बसले आहेत.

]]>
https://www.batmi.net/birthday-special-when-atal-bihari-vajpayee-reached-parliament-in-a-bullock-cart/feed/ 0 29093