Arun Gawali – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Tue, 20 Dec 2022 05:36:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg Arun Gawali – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 बापू बिरूआणि अरुण गवळी यांची जेव्हा जेलमध्ये भेट झाली… https://www.batmi.net/when-bapu-biru-and-arun-gawali-met-in-jail/ https://www.batmi.net/when-bapu-biru-and-arun-gawali-met-in-jail/#respond Tue, 20 Dec 2022 05:36:08 +0000 https://www.batmi.net/?p=28997 सांगली जिल्ह्यात कृष्णा-वारणा खोऱ्यात बंदूक आणि कुऱ्हाडीच्या जोरावर दहशत निर्माण करणाऱ्या बापू-बिरूच नाव जरी काढलं, तरी थरारा उडायचा असं म्हणायला हरकत नाही की, जुन्या मराठी चित्रपटाची आठवण यावी असा दरारा आणि धाक बापूने या भागावर एकेकाळी ठेवला होता. (When Bapu Biru and Arun Gawali met in jail)

तर दुसरी कडे मुंबईचा मोठा अंडरवर्ल्ड डॉन म्हणून ओळखला जाणारा डॅडी म्हणजेच अरुण गवळी. मुंबईत खून,खंडणी, धमकावणे यासारख्या अनेक प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असल्याबद्दल नेहमी पोलिसांच्या रडारवर असलेले हे नाव. अरूण गवळी हे साध नाव जरी उच्चारले तरी कित्येकजण चळाचळा कापतात ही वस्तुस्थिती आहे.

आता विचार करा जर हे दोन्ही डॉन जेव्हा समोरा-समोर आले तेव्हा काय झाले असेल. तर यांचाच एक किस्सा आज यामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्या काळात रंगा शिंदे नावाच्या गुंडाची दहशत चालायची, त्याचा उपद्रव इतका वाढला की, त्याने एक दिवस गावातील एका महिलेवर जबरदस्ती केली.

हे बापु बिरूंना सहन झाले नाही आणि मग बापूने एका कार्यक्रमात चाकूने रंगाचा कोथळा बाहेर काढला. १९६६ मध्ये बापूच्या हातून झालेला हा पहिला खून. यानंतर फरार झालेला बापू पोलिसांना २५ वर्षे सापडलाच नाही. बापूने गावगुंडांचा खात्मा केला. स्वत:ची टोळी तयार केली.

२५ वर्षे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन १२ खून केले. यांपैकी केवळ एका खुनात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. पोलिसांकडून खासगीत मिळालेल्या माहितीनुसार त्याने केलेल्या खुनांची मोजदाद नाही. पुरावे आणि साक्षीदारही त्याने मागे ठेवले नाहीत. फरार असलेल्या काळात एकदा बापू बहे-बोरगावच्या रामलिंग बेटावर गेला होता, सोबत चार साथीदार होते.

मध्यरात्रीच्या सुमारास रामाचे दर्शन घेण्यासाठी त्याने पुजाऱ्याला उठवले. तेव्हा स्वामी जोगळेकर महाराज मंदिरात भेटले. जोगळेकर महाराजांनी बापूला माळ दिली. ‘मांसाहार मस्तीची वस्तू आहे. व्यसन सोड आणि पैशांचा मोह करू नको,’ असा सल्ला त्यांनी दिला. यानंतर बापूने मांसाहार आणि व्यसन कधीच केले नाही आणि त्यांच्या टोळीतही कुणी मांसाहार किंवा व्यसन करायचे नाही.

येरवडा जेल मध्ये अरुण गवळी आधी पासूनच शिक्षा भोगत होता. तब्बल २५ वर्षानंतर बापू बिरू पोलिसांच्या हाती लागला. बापू बिरूंना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, आणि त्याची रवानगी येरवडा जेल मध्ये करण्यात आली. आता बापूची कितीही दहशत गुंड्यांमध्ये असली तरी लोकांसाठी तो देवच होता. त्यात अरुण गवळीही बापूंबदल बरच ऐकून होता.

आता बापू बिरू आले कळल्यावर अरुण गवळीने मोठ्या आदरानं बापू बिरूना बोलावून घेतलं. आणि गवळी ने बापूला एक प्रश्न विचारला, माझ्या कडे एवढे हत्यारं आहेत, माझी एवढी मोठी गॅंग आहे, मुंबईत आमची चांगलीच दहशत आहे मग आमचं नावं झालं नाही आणि तुमचं इतकं नाव का?

त्यावर बापू अरुण गवळींना म्हणले,की आम्हाला कुणाच्या रुपयाचा लोभ नाही, जेवणावर लोकांचे संसार उभे करून दिले. जिवाला जिव देणारी माणसं जोडली. पैसे घेउन काय करायचं. म्हणूनच माणसं सोबत राहतात. या उत्तरावर अरुण गवळीला देखील काहीच बोलता आले नाही. बापू बिरू जसे बाहेर होते तसेच ते जेलमध्ये राहिले. जन्मठेपेच्या काळात अध्यात्मिक वृत्ती आणखी वाढली.

अभंग तोंडपाठ झाले. गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांची संगत सुटली. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यात अंतर्बाह्य बदल झाला होता. बापू प्रवचने देऊ लागला. खून केलेल्या गुंडांचे कारनामे सांगून त्याने समाजात स्वत:बद्दल सहानुभूती निर्माण केली. अन्यायाविरोधात लढणारा ढाण्या वाघ, अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली.आणि वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांची प्राण ज्योत मावळली.

]]>
https://www.batmi.net/when-bapu-biru-and-arun-gawali-met-in-jail/feed/ 0 28997