Anand Mahindra – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Fri, 09 Dec 2022 05:55:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg Anand Mahindra – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 तरुणानं भंगारातून बनवली अनोखी स्कुटर, आनंद महिंद्रा यांनी या देशी जुगाडाचं केलं कौतुक… https://www.batmi.net/a-unique-scooter-made-by-a-young-man-from-scrap-anand-mahindra-appreciated-this-indigenous-experiment/ https://www.batmi.net/a-unique-scooter-made-by-a-young-man-from-scrap-anand-mahindra-appreciated-this-indigenous-experiment/#respond Fri, 09 Dec 2022 05:55:18 +0000 https://www.batmi.net/?p=28887 आनंद महिंद्रा हे नाव सगळ्यांच्याच परिचयाचं आहे. ते भारतातील प्रसिद्ध उद्योजक असून. हे त्यांच्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते दररोज आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अनेक पोस्ट शेअर करत असतात. (A unique scooter made by a young man from scrap, Anand Mahindra appreciated this indigenous experiment)

त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक खास पोस्ट शेअर केली आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक जुन्या असलेल्या स्कूटरचा वापर करुन सिमेंटच्या गोणी चौथ्या मजल्यावर पोहोचवत आहे.

त्या जुन्या स्कूटरच्या मागच्या चाका जवळ एक दोरी बाधली आहे. फक्त एकचदा त्या स्कुटरला एक्सलेटर दिले कि स्कुटरच्या मागचं चाक फिरते आणि ती दोरी गुंडाळत जाऊन ती गोणी वर जाऊन पोहोचते.

हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रा सुद्धा थक्क झाले. आनंद महिंद्रा यांनी ट्विटर वर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ‘मला वाटतं यासाठी आम्ही यांना ‘पॉवर ट्रेन’ असं म्हणतो.

वाहन इंजिनाच्या पॉवरचा वापर करण्याच्या अनेक पद्धती आहेत. ई स्कूटरसोबत हे आणखी सोपं होईल. ई स्कूटरची प्रोडक्शन कॉस्ट कमी झाली किंवा सेकंड हँड उपलब्ध झाल्या की सांगायला नको.

हा व्हिडीओ अपलोड झाल्या झाल्याच हजारो लोकांनी तो बघितला. आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याच्यावर कमेंट करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत.

]]>
https://www.batmi.net/a-unique-scooter-made-by-a-young-man-from-scrap-anand-mahindra-appreciated-this-indigenous-experiment/feed/ 0 28887
तरुणानं बनवली ८ रुपयात १५० किमी चालणारी इलेक्ट्रिक बाईक, आनंद महिंद्रांकडून प्रशंसा… https://www.batmi.net/a-young-man-built-a-150-km-electric-bike-for-rs-8-praised-by-anand-mahindra/ https://www.batmi.net/a-young-man-built-a-150-km-electric-bike-for-rs-8-praised-by-anand-mahindra/#respond Tue, 06 Dec 2022 05:54:04 +0000 https://www.batmi.net/?p=28813 दररोज इंधनाचे दर वाढल्याने नवनवीन टेक्नॉलॉजीच्या मदतीने इलेक्ट्रिक बाईक आणि कार्सची निर्मिती होत आहेत. पण मोठमोठ्या कंपन्यांच्या वाहनांना सुद्धा तगडी टक्कर देणार. सध्या एका अशाच ई-बाईकची चर्चा होत आहे. (A young man built a 150 km electric bike for Rs 8, praised by Anand Mahindra)

या बाईकने उद्योगपती आनंद महिंद्रा यांचंही लक्ष वेधून घेतलंय. त्यांनी ट्विटरवर या बाईकचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्या कंपनीचे चीफ डिझायनर प्रताप बोस यांना इंजिनीअरिंग बाबत एक प्रश्नही विचारला आहे.

व्हिडीओ शेअर केलेल्या या इलेक्ट्रिक बाईकची खास गोष्ट म्हणजे यात जास्त फीचर्स नाही, पण ग्रामीण भागामध्ये फिरण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. इतकंच नाही तर ही बाईक शेतात सुद्धा आरामात चालते, म्हणजेच ती ऑफ-रोडदेखील उत्तम चालते.

ही बाईक बनवण्यासाठी खर्च १०००० ते १२००० रुपये असल्याचं या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे. ही बाईक पाहून महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा खूपच प्रभावित झाल्याचं दिसतं आहे.

ग्रामीण भागामध्ये ट्रान्सपोर्टसाठी होणाऱ्या नवनवीन शोधांनी मी नेहमीच प्रभावित होतो. तिथं खरंच, गरज ही शोधाची जननी आहे, असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आनंद महिंद्रा या बाईकमुळे चांगलेच प्रभावित झाले आहेत.

त्यामुळे येत्या काळात महिंद्राने अशी बाईक बनवली तर त्यात आश्चर्य वाटणार नाही.

]]>
https://www.batmi.net/a-young-man-built-a-150-km-electric-bike-for-rs-8-praised-by-anand-mahindra/feed/ 0 28813