माहितीपूर्ण – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Tue, 03 Jan 2023 05:25:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg माहितीपूर्ण – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 भारतातील यूट्युबर्स किती आणि कसा पैसा कमावतात?, जाणून घ्या… https://www.batmi.net/how-much-and-how-do-youtubers-earn-in-india-know/ https://www.batmi.net/how-much-and-how-do-youtubers-earn-in-india-know/#respond Tue, 03 Jan 2023 05:25:50 +0000 https://www.batmi.net/?p=29140 पैसा हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्वाचा भाग आहे. गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजेच या कोरोनाच्या काळामध्ये सगळं जीवन ऑनलाईन झालं होत, आणि त्यावरून अनेकांनी ऑनलाईन पैसे सुद्धा कमविले होते. (How much and how do Youtubers earn in India?, Know)

तुम्हाला जर माहिती असेल तर मोठं मोठे सेलेब्रिटीना त्यांच्या पोस्ट वरून, इंस्टाग्राम च्या माध्यमातून पैसे मिळत असतात. तसेच युट्युब वरून देखील असंख्य भारतातील लोक पैसे कमवत असतात.

पण तुम्हाला माहिती आहे का की , युटूबवरून पैसे कसे कमवल्या जातात? आणि भारतातील यूट्युबर्स असे किती पैसे कमावतात? याबाबत तुम्हालाही विचार आला असेल तर आज यामध्ये याच प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात.

जगभरामध्ये यूट्युबचे २.३ अब्ज पेक्षा जास्त युजर्स आहेत. २०२० मध्ये यूट्युबच्या वार्षिक कमाईमध्ये ३०.४ टक्के वाढ झाली आहे. एका वर्षामध्ये यूट्युबने १९. ७ बिलियनची कमाई सुद्धा केली आहे.

यूट्युबवरच असलेल्या लोकप्रिय मुलांची चॅनल, रायन्स वर्ल्डनं २०२० मध्ये २९.५ मिलियन डॉर्लसची कमाई केली. भारतात असे काही व्यक्ती आहेत, जे यूट्युबच्या माध्यमातून भरपूर पैसे कमवतअसतात.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हि कमाई होते तरी कशी? तर यूट्युबनं गेल्या तीन वर्षांमध्ये क्रिएटर्स, आर्टिस्ट आणि मीडिया संस्थांना जवळपास ३० अब्ज डॉलर्स दिले आहे.

२०१९ मध्ये, टी-सिरीज हे १०० मिलियन युजर्सचा टप्पा पार करणारं भारतामधल पहिलं यूट्युब चॅनल बनलं आहे. अनेक यूट्युबर्सनी व्ह्युवर्सचे अशक्य वाटणारे आकडे ओलंडले आहेत.

कोरोना साथीमुळे भारतात यूट्युबच्या वाढीला वेग मिळाला. कोरोना साथीच्या रोगापूर्वी, व्हॉट्सअॅप हे भारतातील प्रबळ व्यासपीठ होतं. पण, अॅप अॅनीच्या डेटानुसार, डिसेंबर २०२० मध्ये यूट्युबचे महिन्याचे अॅक्टिव्ह युजर्स ४२५ मिलियन इतके होते.

तर व्हॉट्सअॅपचे महिन्याचे अॅक्टिव्ह युजर्स ४२२ मिलियन होते. युट्युबवर प्रत्येक वेगवगेळ्या कॅटेगिरीज नुसार पैसे मिळत असतात. तुमच्या कुठल्या विषयावर चॅनल बनवलेले आहे ते सुद्धा तितकेच महत्वाचे ठरते.

उदाहरण द्यायचे झाले की कुणाचं टेकनॉलॉजी रिलेटेड चॅनल असेल तर १००० ते २००० व्ह्यूज ला १ ते २ डॉलर मिळत. म्हणजे ७० ते १४० रुपये मिळतात. तुम्हला महिन्याला साठ हजार रुपये सुद्धा मिळू शकतात.

वर्षभरात एखादी व्यक्ती अंदाजे सात लाख 30 हजार रुपये मिळवू शकते. ही संख्या माघेपुढे होऊ शकते. लाईक ला कमेंट ला डिसलाईक ला किंवा सबस्क्राईब ला कुठलाही पैसा मिळत नाही.

असे प्राप्त झालेल्या माहितीनुसार पुढे आले आहे. जे लोक तुमचे व्हिडीओ बघतात त्यावर जे अड्वर्टाइज येत असतात त्याचेच फक्त पैसे मिळतात. जर कुठल्या लोकल कॅटेगरी मधलं तुमचं चॅनल असेल तर मग तिथे तुम्हाला ५००० व्ह्यूज नंतर १ डॉलर मिळतो.

याव्यतिरिक्त यूट्युब पार्टनरशीप प्रोगॅमसाठी अर्ज करून पैसे कमावता येतात. यूट्युब कंटेंट क्रिएटर्सना त्यांच्या चॅनेलची जाहिरातीतील कमाई, चॅनल मेंबरशीप, सुपर चॅट्स, सुपर स्टिकर्स, मर्च शेल्फ्स आणि यूट्युब प्रीमिअम कमाईच्या माध्यमातून पैसे मिळवण्यास देखील मदत करतं.

तुम्ही यासाठी पात्र असल्यास यूट्युब शॉर्ट्स फंडाचा भाग म्हणून तुम्हाला शॉर्ट्स बोनससुद्धा मिळू शकतो. यूट्युब पार्टनरशीप प्रोग्रॅमसाठी पात्र होण्याकरिता, तुमच्या यूट्युब चॅनेलला गेल्या एका वर्ष्यामध्ये म्हणजेच १२ महिन्यात चार हजार वॉच अवर्स आणि १० हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स असणं आवश्यक आहे.

अॅडव्हर्टायझिंग रिव्हेन्यु, चॅनेल मेंबरशीप, सुपर चॅट्स आणि सुपर स्टिकर्स, मर्च शेल्फ, यूट्युब प्रीमिअम रिव्हेन्यु यातील उत्पन्नाचा काही भाग यूट्युब आपल्या पात्र क्रिएटर्सना देतं असत.

तुमचे व्ह्युज जर भारतामधून मिळत असतील तर प्रतिहजार व्हिडिओ व्ह्युजमागे तुम्हाला १.५ ते ३ डॉलर्स मिळू शकतात. पण, जर तुमचे दर्शक युनायटेड स्टेट्समधील असतील तर तुम्हाला २ ते ४ चार डॉलर्स मिळू शकतात.

सीपीएम अंदाजानुसार तुम्ही यूट्युबवर किती पैसे कमवू शकता हे अचूकपणे सांगणं कठीण आहे. प्राप्त झालेल्या माहितीदरम्यान भारतामधले युटूबर वेगवेगळ्या श्रेणीसाठी वेगवेगळे पैसे मिळवत असतात.

कॉमेडी व्हिडिओसाठी २२ ते ३० हजार रुपये, म्युझिक व्हिडिओसाठी ७ ते ११ हजार, टेक्नॉलॉजी व्हिडिओसाठी १४ ते २२ हजार, रोस्टिंग व्हिडिओसाठी १८ ते २९ हजार, फूड व्हिडिओसाठी ७ ते ११ हजार आणि गेमिंग व्हिडिओसाठी ७ ते १४ हजार रुपये मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यूट्युब हे भारतातील प्रबळ व्यासपीठ आहे. यामुळे तुम्ही सुद्धा युट्युब वर चॅनल उघडू शकता, आणि पैसे कमवू शकता. फक्त यासाठी तुम्हला तुमचा पूर्ण वेळ आणि स्ट्रॅटेजि हवी.

]]>
https://www.batmi.net/how-much-and-how-do-youtubers-earn-in-india-know/feed/ 0 29140
कोल्हापुरातील महालक्ष्मी-अंबाबाई मंदिराच्या ‘या’ गोष्टी तुम्हालाही माहित नसतील… https://www.batmi.net/you-may-not-even-know-these-things-about-mahalakshmi-ambabai-temple-in-kolhapur/ https://www.batmi.net/you-may-not-even-know-these-things-about-mahalakshmi-ambabai-temple-in-kolhapur/#respond Sat, 31 Dec 2022 09:30:18 +0000 https://www.batmi.net/?p=29127 कोल्हापुरातील महालक्ष्मी-अंबाबाई मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे. कोल्हापूरच्या मंदिराचा उल्लेख अंबाबाई किंवा महालक्ष्मी असा करण्यात येतो. अनेक पिढीतील लोक कोल्हापूर येथील देवीच्या दर्शनासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी करतात. (You may not even know ‘these’ things about Mahalakshmi-Ambabai Temple in Kolhapur)

या मंदिराचा इतिहास प्राचीन तर आहेच पण या मंदिरानं अनेक शतकांचा इतिहास घडतांना बघितलेला आहे. पण या मंदिराबद्दल अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसणार? चला तर मग याच मंदिराबद्दल च्या काही माहित नसलेल्या गोष्टी आपण जाणून घेऊयात.

कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर अंबाबाईचे देऊळ हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक व महाराष्ट्रात असलेल्या देवींच्या साडेतीन पीठांपैकी एक मानले जाते. प्राप्त माहितीनुसार मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ. स. ६०० ते ७०० मध्ये बांधले गेल्याची शक्यता दर्शवितात.

मंदिराचे पहिले बांधकाम हे राष्ट्रकूट किंवा त्याआधीच्या शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे असे सांगण्यात येते. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातत्व वेळोवेळी सिद्ध होते. आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते.

कोल्हापूर या शहराची किंवा सुरुवातीच्या काळातील वस्तीची सुरुवात पंचगंगा या नदीच्या काठावर झाली असे ब्रह्मपुरी टेकडीवर मिळालेल्या अवशेषांवरून सांगण्यात येतं. जर आज या मंदिराचा इतिहास बघायला गेल तर पौराणिक आणि ज्ञात ऐतिहासिक पुरावे या दोन्हीचा विचार करावा लागतो.

पुराणामध्ये सुद्धा याचे उल्लेख आहेत आणि काही कागदोपत्री पुराव्यांवरही इतिहास लिहिला गेला आहे. मंदिराचं गर्भागार कर्णदेव नावाच्या चालुक्यांच्या सुभेदाराने ६२४ मध्ये बांधलं आणि त्यानंतर शिलाहारांच्या मारसिंह नावाच्या राजाने या मंदिराचा विस्तार केला. व त्याच्याच वंशातल्या गंडरादित्यानं मंदिरावर कळस चढवला, असं मानले जाते.

आजच्या महालक्ष्मी-अंबाबाई मंदिराच्या संकुलाची रचना विचारात घेतली असता सुरुवातील महाद्वार, चारही दिशांनी… द्वार, आत गेल्यावर मेंढा व बैल यांचे शिल्प, नगारखाना, दीपमाळा, मध्यवर्ती महालक्ष्मी-महाकाली, महासरस्वती यांची मंदिरं आणि चारही बाजूंनी अनेक देवतांची मंदिरं दिसून येतात.

महालक्ष्मी समग्र दर्शन या पुस्तकामध्ये लिहल्या गेले आहे की, हे मंदिर कोणी बांधले यासंबंधी काही पुरावे उपलब्ध नाहीत. केव्हा बांधले याबद्दल अनेक प्रवाद आहेत. प्र. कृ. प्रभुदेसाई यांनी एका मुलाखती दरम्यान म्हटले होते की, महालक्ष्मी मंदिराचे १०५५ च्या आधी आणि नंतर असे दोन टप्पे आढळून येतात.

चोळ राजांनी हे मंदिर जाळण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजे त्याचा बहुतांश भाग हा लाकडाचा असावा. प्रभुदेसाई यांनी या मंदिराची वैशिष्ट्ये सांगताना म्हटले कि, हे मंदिर एकमेवाद्वितिय असं म्हटलं पाहिजे. यात दोन मजले असून दोन गर्भगृहे आहेत. सध्या दिसणारी शिखरं अगदी अलिकडची म्हणजे १८ व्या किंवा १९ व्या शतका मधली असावीत.

मंदिराच्या रचनेबद्दल त्यांनी म्हटलं की, मंदिराच्या छताचा आतला भाग पाहिला असता लाकडामध्ये जे स्थापत्य बनवले जाते, अगदी त्याचीच नक्कल दगडामध्ये घडवल्याचे दिसून येतं. महालक्ष्मीच्या मूर्तीबद्दल इतिहास अभ्यासक इंद्रनील बंकापुरे यांनी एका मुलाखती दरम्यान म्हटलं की, ही मूर्ती काळ्या पाषाणात म्हणजे बेसॉल्टपासून तयार केलेली आहे.

ती उभी मूर्ती आहे. तिच्या हातामध्ये म्हाळुंग म्हणजे बीजपूरक, गदा, ढाल, पानपत्र आहेत. अशाप्रकारची रचना असलेल्या मूर्ती कर्नाटक, तामिळनाडू, ओडिसात आढळून येतात. देवी म्हणून तिच्या भक्तांची व्याप्ती दूरवर पसरलेली आहे. ओडिसा, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतापासून भाविक दर्शनासाठी या मंदिरामध्ये येत असतात. नवरात्रामध्ये भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते.

]]>
https://www.batmi.net/you-may-not-even-know-these-things-about-mahalakshmi-ambabai-temple-in-kolhapur/feed/ 0 29127
नवीन वर्षात येणार १००० चे नोट, २००० चे नोट परतणार बँकेत? नेमकं सत्य काय? https://www.batmi.net/1000-note-coming-in-the-new-year-2000-note-will-be-returned-to-the-bank-what-is-the-real-truth/ https://www.batmi.net/1000-note-coming-in-the-new-year-2000-note-will-be-returned-to-the-bank-what-is-the-real-truth/#respond Wed, 28 Dec 2022 06:22:14 +0000 https://www.batmi.net/?p=29113 सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. ज्यामध्ये १००० रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात येणार असल्याचा दावा केला जात आहे. हे 1 जानेवारी २०२३ पासून होणार असल्याचे,सांगण्यात येत आहे. (1000 note coming in the new year, 2000 note will be returned to the bank? What is the real truth?)

त्या सोबतच २००० रुपयांच्या नोटा त्याच दिवशी बॅंक्समध्ये परत जाणार,असेही म्हटले जात आहे. नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काहीच दिवस बाकी आहेत. देशात अनेक नियमही बदलणार आहेत.

ज्याचा थेट परिणाम जनजीवनावर होणार आहे.अश्यात नवीन नोट येणार,आणि जुनी नोट जाणार, या चर्चाना उधाण आलाय. पण या मध्ये किती तथ्य आहे? सरकार कडून या बद्दल काही बोललं गेलय का? आरबीआय या वर काय म्हणतं. हेच आज आपण यामध्ये जाणून घेणार आहोत.

सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्या मध्ये लिहले आहे की, १ जानेवारी पासून १००० रुपयाचे नवीन नोट येणार आहे. २००० चे नोट बँकेत परत जाणार आहे. तुम्हाला फक्त ₹ ५०००० जमा करण्याची परवानगी असेल.

ही परवानगी देखील फक्त १० दिवसांसाठी असेल, त्यानंतर २००० च्या नोटांना किंमत राहणार नाही. या संपूर्ण प्रकरणातील आश्‍चर्यकारक बाब म्हणजे,सरकारने नवीन १००० रुपयांच्या नोटा जारी करणे आणि २००० रुपयांच्या नोटा काढण्यासंबंधी कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही.

अशा परिस्थितीत या गोष्टीवर विश्वास ठेवणे फार कठीण होते. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओचे, सत्य जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकने तपास केला. व्हायरल होत असलेल्या सर्व दाव्यांची वास्तविकता सांगण्यासाठी सरकारद्वारे पीआयबी फॅक्ट चेक चालवला जातो.

सरकार वेळोवेळी फेक न्यूजवर कारवाईही करत असते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ,करण्यात आलेला दावा पूर्णपणे खोटा असल्याचे पीआयबी फॅक्ट चेक च्या तपासात आढळून आले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने अशी कोणतीही योजना केलेली नाही.

किंवा अशा प्रकारे २००० रुपयांच्या नोटा काढण्याची कोणतीही योजना नाही. याचा सरळ अर्थ असा की १ जानेवारी २०२३ पासून नवीन १००० रुपयांच्या नोटा येणार नाहीत. आणि २००० रुपयांची नोट पूर्वीसारखीच बाजारात चालणार आहे.

पीआयबीने ट्विट करून याबाबत माहिती दिली असून, लोकांना असे मेसेज फॉरवर्ड न करण्याचे आवाहन केले आहे. पीआयबीने हा व्हायरल मेसेजही ट्विटमध्ये दाखवला आहे. २०१६ मध्ये नोटाबंदीनंतर १००० रुपयाच्या नोटा चलनातून काढून टाकण्यात आल्या होत्या.

ब्लॅक मणीला आळा घालण्यासाठी हे केले गेले. त्याच वर्षी सरकारने २००० च्या नव्या नोटा बाजारात आणल्या होत्या. अलीकडेच, संसदेत एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्र सरकारने सांगितले की, २००० च्या नवीन नोटांच्या छपाईसाठी २०१८-१९ नंतर कोणताही नवीन ऑर्डर देण्यात आलेला नाही.

सोप्या शब्दात समजून घ्यायचे झाले ,तर २००० च्या नवीन नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. पण असं असले तरीही २००० च्या नोट या अजूनही चलनात सुरु आहेजेव्हापासून सोशल मीडियाचे युग सुरू झाले, तेव्हापासून अनेक चुकीच्या गोष्टी पसरवल्या जाऊ लागल्या.

बर्‍याच वेळा सामान्य जनता या फेक न्यूजला खरे मानते, ज्यामुळे भविष्यात त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला नेहमी सतर्क करत असत आणि सतर्क राहायला सांगत.

तुम्हालाही असा काही मेसेज आला तर अजिबात काळजी करू नका. असे फेक मेसेज कोणाशीही शेअर करू नका. याशिवाय तुम्ही कोणत्याही बातमीची तथ्य तपासणी करूनच पुढचं पाऊल उचला.

]]>
https://www.batmi.net/1000-note-coming-in-the-new-year-2000-note-will-be-returned-to-the-bank-what-is-the-real-truth/feed/ 0 29113
‘या’ हत्तीला हजारो लोकांसमोर देण्यात आली होती फाशी, इतिहासातील क्रूर घटनांपैकी एक… https://www.batmi.net/this-elephant-was-hanged-in-front-of-thousands-of-people-one-of-the-cruelest-events-in-history/ https://www.batmi.net/this-elephant-was-hanged-in-front-of-thousands-of-people-one-of-the-cruelest-events-in-history/#respond Tue, 27 Dec 2022 05:35:21 +0000 https://www.batmi.net/?p=29105 जगामध्ये असा कुठलाही देश नसेल जिथे नियम आणि कायदे नाहीत. प्रत्येक देशामध्ये गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी नियम आणि कायदे बनवल्या गेले आहेत. अश्या अनेक देशाचा कायदा आहे जो इतका धोकादायक असतो की तो ऐकल्यावरच अंगाला शहारे येतात. (‘This’ elephant was hanged in front of thousands of people, one of the cruelest events in history)

मात्र, केवळ दुष्ट अपराध करण्यासाठीच दोषीला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद आहे. तुम्ही आजवर सर्व लोकांना फाशीची शिक्षा सुनावल्याचे ऐकले असेल, पण आजपर्यंत कुठल्याच प्राण्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असेल, असे कधी ऐकले नसणार.

नसेल ऐकले तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका हत्तीची कहाणी सांगणार आहोत. ज्याला १०५ वर्षांपूर्वी अमेरिकेत सार्वजनिकरित्या फाशी देण्यात आली होती. होय, हे ऐकून तुम्हाला विचित्र नक्की वाटेल, पण हे खरे आहे.

पण जर दुष्ट अपराधासाठीच फाशीची शिक्षा होत असेल. तर मग असं या हत्तीने काय केलं असावं, कि ज्याला चक्क सार्वजनिक रित्या फाशी देण्यात आली. चला तर मग हेच आपण आज यामध्ये जाणून घेऊयात.

१०५ वर्षांपूर्वी, १३ सप्टेंबर १९१६ रोजी अमेरिकेच्या टेनेसी राज्यात मेरी नावाच्या हत्तीला दोन हजार लोकांसमोर फाशी देण्यात आली होती. हत्तीला फाशी देण्याच्या वाक्यामागे एक विचित्र कथा असल्याचे सांगण्यात येते.

प्रत्यक्षात, चार्ली स्पार्क नावाचा व्यक्ती टेनेसीमध्ये ‘स्पार्क्स वर्ल्ड फेमस शो’ नावाचे सर्कस चालवत होता. त्या सर्कसमध्ये मेरी नावाच्या आशियाई हत्तीसह अनेक प्राणी होते, असे म्हणतात.

की एके दिवशी मेरीला सांभाळणाऱ्याने म्हणजेच तिच्या माहूतने काही कारणामुळे सर्कस सोडली. त्यानंतर सर्कसच्या मालकाने त्याच्या जागी दुसरा माहूत ठेवला.

अशा स्थितीत नव्या माहूतला मेरीबद्दल फारशी माहिती नव्हती. तसेच मेरीनेही माहूतसोबत जास्त वेळ घालवला नव्हता. त्यामुळे माहुतला मेरीवर नियंत्रण ठेवण्यात अडचण येऊ लागली.

दरम्यान, सर्कसच्या प्रचारासाठी शहरात एक दिवस परेडचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये मेरीसह सर्व प्राणी आणि सर्कसचे सर्व कलाकार सहभागी झाले होते.

शहराच्या मध्यभागी मिरवणूक काढण्यात आली. यादरम्यान मेरीला वाटेत काहीतरी खायचे दिसले, ज्यासाठी ती वेगाने पुढे जाऊ लागली. यादरम्यान हत्तीवर स्वार झालेल्या माहुतने हत्तीच्या कानामागे मानेवर भाला खुपसला.

त्यामुळे हत्तीला राग आला आणि तिने माहूतला खाली पाडले. त्यानंतर हत्तीने त्याला पायाने चिरडले. त्यामुळे माहुतचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेने नाराज झालेल्या काही लोकांनी हत्तीला मारण्याच्या घोषणा देत रस्त्यावर गोंधळ घातला.

मात्र त्यावेळी हे प्रकरण कसेबसे शांत झाले होते. पण शहरातील बहुतांश नागरिकांनी हत्तीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सुरू केली. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिकन वृत्तपत्रांनी या दुर्दैवी घटनेबद्दल वृत्तपत्रामध्ये छापले.

त्यानंतर संपूर्ण शहरात ही बातमी वेगाने पसरली. शहरातील लोकांनी सर्कसचा मालक चार्ली स्पार्क याच्याकडे हत्ती मेरीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीला सुरुवात केली.

सोबतच असे न झाल्यास शहरात पुन्हा कधीही सर्कस होऊ देणार नाही, अशी धमकी ही त्यांनी दिली. अनेक लोक हत्तीला विविध प्रकारे मारून टाका असे सांगत होते. शेवटी, चार्ली स्पार्कला लोकांच्या आग्रहापुढे मेरीला मृत्यूदंड देण्याचा निर्णय घ्यावाच लागला.

यासाठी त्यांनी १०० टन वजन उचलणारी क्रेन मागवली आणि १३ सप्टेंबर १९१६ रोजी क्रेनच्या सहाय्याने हजारो लोकांमध्ये हत्तीला फाशी देण्यात आली.

ही घटना इतिहासातील प्राण्यांप्रती मानवतेचे सर्वात क्रूर उदाहरण मानले जाते. ही घटना अक्षरशः मनाला हादरून टाकणारी आहे.

]]>
https://www.batmi.net/this-elephant-was-hanged-in-front-of-thousands-of-people-one-of-the-cruelest-events-in-history/feed/ 0 29105
अष्टमासिद्धी। महाराष्ट्रातल्या या चमत्कारी विहिरीच्या पाण्याने त्वचारोगही जातात पळून… https://www.batmi.net/ashtmasiddhi-skin-diseases-are-also-cured-by-the-water-of-this-miraculous-well-in-maharashtra/ https://www.batmi.net/ashtmasiddhi-skin-diseases-are-also-cured-by-the-water-of-this-miraculous-well-in-maharashtra/#respond Mon, 26 Dec 2022 11:23:07 +0000 https://www.batmi.net/?p=29097 आपला भारत देश असा आहे की जिथे प्रत्येक दिवशी काहीना-काही चमत्कार होतच असतात. आता मला सांगा तुम्ही आजारी असले की सगळ्यात आधी कुठे जाता. (Ashtmasiddhi | Skin diseases are also cured by the water of this miraculous well in Maharashtra)

साहजिक आहे डॉक्टरांकडे पण, आपल्या महाराष्ट्रात कित्येक वर्षा पासून अशी एक चमत्कारी विहीर आहे, ज्या विहिरीच्या पाण्यानी लहान मुलांची अंघोळ घातली की सगळी रोगराई निघून जाते. तुम्हाला ही आश्यर्य वाटत असेल पण हे खर आहे. कारण या गोष्टीला डॉ.सुद्धा मान्य करतात.

चला तर मग यामध्ये जाणून घेऊयात ही विहीर कुठे आहे? आणि या विहिरी मागचं नेमकं रहस्य काय ? अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात असणारी अष्टमासिद्धी येथील छोटीशी विहीर पर्यटकांना खुणावत असते. लहान मुलांची आंघोळ या विहिरीतील पाण्याने घातली की त्यांची रोगराई दूर होते.

असा अनेकांचा विश्‍वास आहे. या विहिरीवर आंघोळ करणाऱ्यांची गर्दी असते. लहान मुलांसोबतच प्रत्येकांनी या विहिरीच्या पाण्याने आंघोळ केली तर ते आरोग्यासाठी पोषक असल्यामुळे केवळ अमरावती जिल्ह्यातूनच नव्हे तर, विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील अनेक कुटुंबाची या विहिरीच्या पाण्याने अंघोळ करण्यासाठी नेहमीच गर्दी पाहायला मिळते.

याच ठिकाणी गोविंद प्रभू यांनी काही लिला केल्या असल्याचा देखील उल्लेख महानुभाव साहित्यात आढळतो. बुधवार आणि शुक्रवार महानुभव पंथीय भाविक मोठ्या संख्येन या मंदिरात दर्शनासाठी येत असल्याने,या मंदिर परिसरात असणाऱ्या विहिरीच्या पाण्याने अंघोळ करण्यासाठी सुद्धा बुधवारी आणि शुक्रवारी या दोन दिवसांना महत्व देण्यात येते.

आता इथे येणाऱ्या नागरिकांसाठी विहिरीतून पाणी काढायला दोर आणि बकेट भाड्याने मिळते. यात आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते ती म्हणजे इथे मुलांनी ज्या कपड्यावर अंघोळ केली, ते कपडे परत मुलांना घालू न देता ते तिथल्या झाडावर नेहमीसाठी टांगून देतात.

अंघोळ करायच्या आधी बकेट विहिरीत टाकताना त्यात विड्याचं पान ठेऊन कपूर जाळण्यात येतो,आणि मगच पाणी काढावं लागत अशी इथे प्रथा आहे. पण आता मी म्हटल्या प्रमाणे डॉक्टर सुद्धा या विहिरीला खर मानतात. मग ही खरंच चमत्कारी विहीर आहे का? तर होय.. हा निसर्गाचा चमत्कार आहे.

म्हणजे काय तर अष्टमासिद्धी येथील विहिरीच्या पाण्यामध्ये औषधी गुण असल्यामुळे या पाण्याने आंघोळ केल्यामुळे त्वचेशी संबंधित विकार होत नाही. भौगोलिकदृष्टीने विचार केला तर अष्टमासिद्धी ची विहीर ज्या ठिकाणी आहे तो संपूर्ण दख्खनचा पठार असून याची निर्मिती लावा रसाच्या उद्रेकामुळे झाली आहे.

लावा रसाचा उद्रेक होताना त्यामधून अनेक वायू सुद्धा बाहेर पडलेत. यापैकीच सल्फर अर्थात गंधक या वायूचा प्रवाह जमिनीतून अष्टमासिद्धी येथील विहिरीत आला आहे. या विहिरीतील पाण्यात गंधकाचे मिश्रण सतत होत असल्यामुळे या पाण्याचा रंग पिवळसर झाला असून, हे पाणी सतत गरम असतं.

अष्टमासिद्धी येथील विहिरीच्या पाण्याचा उपसा सतत सुरू असल्यामुळे हे पाणी आता फारसे गरम नसले तरी ,गंधकयुक्त असणार हे पाणी त्वचेसाठी अत्यंत गुणकारी आहे.  बालरोगांसाठी देखील या विहिरीचे पाणी उपयुक्त आहे अशी माहिती भूगोल विषयाचे अभ्यासक सांगतात आणि तेथील डॉकटर्स सुद्धा सांगतात.

अष्टमासिद्धी येथील विहिरीच्या औषधीयुक्त पाण्याबाबत संशोधन होणे गरजेचे असल्याचे देखील ते म्हणतात

]]>
https://www.batmi.net/ashtmasiddhi-skin-diseases-are-also-cured-by-the-water-of-this-miraculous-well-in-maharashtra/feed/ 0 29097
बर्थडे स्पेशल: जेव्हा अटल बिहारी वाजपेयी बैलगाडीतून संसदेत पोहोचले होते… https://www.batmi.net/birthday-special-when-atal-bihari-vajpayee-reached-parliament-in-a-bullock-cart/ https://www.batmi.net/birthday-special-when-atal-bihari-vajpayee-reached-parliament-in-a-bullock-cart/#respond Mon, 26 Dec 2022 11:15:54 +0000 https://www.batmi.net/?p=29093 आज पेट्रोल आणि डिजेलचे भाव गगनाला भिडले आहेत, अश्यात अटल बिहारी वाजपेयी यांचा एक किस्सा आठवतो. मला सांगा जेव्हा एखादी मोठी व्यक्ती किंवा मोठा नेता तुम्हाला बैलगाडीतुन फिरताना दिसला तर तुम्हाला कस वाटेल, थोडं विचित्रच वाटेल ना. (Birthday Special: When Atal Bihari Vajpayee reached Parliament in a bullock cart)

की इतका मोठा माणूस असा का फिरतोय. तर आपले भारताचे पुर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अशेच एकदा बैलगाडीत बसून संसदेत पोहोचले होते, आता ते बैलगाडीतूनच का गेले, ते तर कार ने ही जाऊ शकत होते.

पण बैलगाडीतुन जाण्यामागेही त्यांचा एक मोठा किस्सा प्रचलित आहे. आणि विशेष म्हणजे या किस्स्याची चर्चा संपूर्ण विश्वात झाली होती. चला तर मग यामध्ये जाणून घेऊयात हा किस्सा नेमका आहे तरी काय.

तर गोष्ट आहे १९७३ ची. इंदिरा गांधी त्या काळात भारताच्या पंतप्रधान होत्या,आणि पूर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे जनसंघ म्हणजेच आता ची भाजपाचे मुख्य नेता होते.

या दिवसांमध्ये इंदिरा गांधी पेट्रोल वाचवण्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बग्गीतून प्रवास करत होत्या. कारण त्यावेळी जगभरात तेल एक्स्पोर्ट करणारी ऑर्गनायजेशन ओपेक ने तेल निर्यात कमी करण्याचा निर्णय घेतला.

तेल निर्यातदार देशांच्या संघटनेने म्हणजेच ओपेक ने जगभरातील तेलाचा पुरवठा कमी केला तेव्हा तेल संकट आले. आणि याचे नुकसान भारताला देखील झाले, कारण पेट्रोल डिजेलसाठी भारत पूर्णपणे या देशांवरच निर्भर होता.

आता त्या वेळी परिस्थीला बघून इंदिरा गांधी सरकार कडे महसुलासाठी तेलावर कर लावण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता त्यामुळे,इंदिरा गांधींच्या सरकारने तेलाच्या किमती ८० टक्क्यांहून अधिक वाढवण्याचा निर्णय घेतला.

आता इतका मोठा निर्णय घेतल्या नंतर विरोधी पक्ष शांत कसा राहणार.आणि म्हटल्या प्रमाणे विरोधी पक्षाने या विरुद्ध जोरदार आंदोलन केले, पण यातही वेगळी आणि मजेशीर गोष्ट अशी घडली की.

नोव्हेंबर १९७३ चे संसदीय अधिवेशन सुरु होणार होत, सरकारला घेरण्याचा विरोधी पक्षाचा प्लॅन होता, पण त्यातच याच प्लॅन सोबत काही वेगळं करण्याचा प्लॅन जनसंघ म्हणजेच आताच्या भाजपाने केला होता.

वाजपेयी यांच्या डोक्यात काही तरी शिजत होत आणि बघतो तर काय. भारताचे पूर्व पंतप्रधान आणि जनसंघ प्रमुख अटल बिहारी वाजपीयी, आपल्या दोन साथीदारान सोबत चक्क बैलगाडी वर बसून संसदेत पोहोचले.

इतकच नव्हे तर काही मेम्बर ऑफ पार्लियामेंट सायकल वरून सुद्धा सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत संसदेत पोहोचले.हे बघून त्या वेळी तिथे सगळेच आश्चर्यात होते.

हा एक अनोखा आणि वेगळा निषेध होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिजेलच्या विरोधात पहिल्यांदाच अश्या आंदोलनाची बातमी प्रसिद्ध झाली होती, त्या वेळी न्यूयॉर्क टाइम्स ने देखील या निषेधाचे वृत्त प्रसिद्ध केले होते.

आता जेव्हाही पेट्रोल डीझेल चे भाव वाढतात तेव्हा अटलजींचा हा अनोख्या बैलगाडीच्या निषेधाचा किस्सा नेहमीच आठवतो. पण आज परिस्तिथी अशी झाली आहे की तेव्हाचे या आंदोलनातले नेते आता मात्र पेट्रोल डीजेल च्या वाढत्या भावावर शांत बसले आहेत.

]]>
https://www.batmi.net/birthday-special-when-atal-bihari-vajpayee-reached-parliament-in-a-bullock-cart/feed/ 0 29093
लोक म्हणतात सापाला केस असतात, हे खरं आहे का? https://www.batmi.net/people-say-snakes-have-hair-is-it-true/ https://www.batmi.net/people-say-snakes-have-hair-is-it-true/#respond Mon, 26 Dec 2022 10:49:47 +0000 https://www.batmi.net/?p=29083 मी लहान असताना सुट्ट्या लागल्या की आजी कडे राहायला जायची,आजी च्या घराच्या बाजूनी भलं मोठं पिंपळाच झाड होत.एक दिवस आम्ही रात्री बाहेर चांदण्या बघत बसलो, मी काही तरी आणायचं म्हणून पिंपळाच्या झाडा कडे जायला निघाली इतक्यात, आजी ची हाक कानावर ऐकू आली. (People say snakes have hair, is it true?)

इतक्या रात्री पिंपळाच्या झाडा जवळ जाऊ नये तिथे मुंज्या असतो. तुम्ही ही हे नाव अनेकदा ऐकलं असतील पण आता हा मुंज्या कोण आणि हा काय प्रकार आहे हे विचारलं असता, तो भूताखेताचाच काही तरी प्रकार असल्याचं कळलं पण पिंपळाच्या झाडाला अक्षय वृक्ष म्हटल्या जाते या विशाल वृक्षा खाली बसून गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्ती केली होती.

पिंपळाच्या पानांनी लाख बनवतात त्याच्या औषधाने व्रण बरे होतात . आणि हे झाड किती तरी पटीनं आपल्यासाठी गुणकारी आहे तरीही हे झाड इतकं भयावह का ठरलं . लोक रात्री या झाडाकडे जायला का भितात किंवा या मुंज्या मागे काही वेगळा दृष्टीकोण आहे का याचा शोध घेत असतांना काही गोष्टींचं तथ्य पुढं आलं पण ते काय ,

प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही कारण नक्कीच असते तसच,या पिंपळाच्या झाडावरच्या मुंज्या मागे ही एक शास्त्रीय कारण आहे आता ते काय तर सगळे वृक्ष दिवसा वातावरणातील कार्बनडाय ऑक्सईड शोषून सूर्य प्रकाशाच्या साहाय्याने झाडासाठी पोषक अन्न तयार करतात आणि मोबदल्यात प्राणवायू सोडतात.

मात्र रात्री सूर्य किरणांच्या अभावी त्याच्या कार्यात अडथळा येतो आणि त्यांच्या वाटे कार्बनडाय ऑक्सइड बाहेर टाकल्या जातो .
हा वायू मानवी शरीरासाठी हानिकारक असतो म्हणून रात्रीच्या वेळी झाडाजवळ जाऊ नये असे मोठे आपल्याला सांगतात. आता हे तत्व तर सगळ्याच झाडा साठी लागू आहे मग पिंपळाच्या झाडात असं काय की यालाच असं भयावह बनवलं.

तर पिंपळाच झाड रात्रीच्या अनाघ्रात मोठ्या राक्षसासारखा वाटतो . पिंपळाच्या पानांची सळसळ होता ती एका वर एक आपटून पावलांचा आवाज येतो आणि कितीही म्हटलं तरी शेवटी आपण मनुष्यच आपण या आवाजाने लवकर घाबरून जातो अन अश्याच गोष्टीं मुळे पिंपळावरच्या मुंज्या च्या दंतकथांना सुरुवात झाली.

परंतु प्रत्येक अध्यात्मिक श्रद्धेमागे, विज्ञान लपलेलं आहे. पिंपळाच्या झाडावर मुंजा असतो अशी दंतकथा प्रचलित झाल्याने त्या झाडाला कापण्याचा, तोडण्याचा, सहसा कोणी प्रयत्न करत नाही . भुताखेतांच्या कथा रचून वृक्ष भोवती कुंपण आखण्यात आले कारण जीवाची भीती प्रत्येकालाच असते म्हणूनच या पुरातन वृक्षाची कत्तल कमी प्रमाणात होते.

तरी प्रश्न उरतोच की मुंज्या म्हणजे नेमकं काय? तर रिकामटेकडी माणसं, जी हमखास गावाच्या पारावर काथ्याकूट करत बसलेली असतात अश्या लोकांचा संग टाळा,असाही एक त्याचा अर्थ घेता येईल. कस असतं, एखाद्या लहान मुलांना काही गोष्ट सांगितली की ते ऐकत नाही आणि जर तुम्ही त्यांना भीती घातली की ते लगेच शांत होतात.

ऐकतात पण हे मोठे लोक भीती दाखवायसाठी नाही ,तर काळजी पोटी करतात. तसाच काही तरी पिंपळाच्या झाडा सोबत झालय.
अक्षय वृक्षापासून जैविक पर्यावरण समतोल राहण्यास मदत होते. निसर्गचक्र झाडांमुळे सुरळीत चालते ह्या सर्व गोष्टी आपल्या पूर्वजांना ठाऊक असाव्या.

म्हणूनच वृक्ष संवर्धनासाठी लोककथा रचून मनामध्ये भीतीच्या रूपात चिंच, वड, पिंपळ, औदुंबर अश्या झाडांवर विविध आख्यायिका तयार झाल्या. आणि एका पिढी पासून दुसऱ्या पिढी पर्यंत या पसरत गेल्या.म्हणून कुठल्याही गोष्टी मागे काही ना काही कारण असतात त्या मागील कारण जाणून घ्या आणि मगच कुठल्याही गोष्टी वर विश्वास ठेवा.

]]>
https://www.batmi.net/people-say-snakes-have-hair-is-it-true/feed/ 0 29083
शेतजमिनीवर होणारे वाद मिटवणारी “सलोखा योजना”, जाणून घ्या ‘या’ योजनेचे फायदे काय? https://www.batmi.net/salokha-yojana-to-settle-agricultural-land-disputes-know-what-are-the-benefits-of-this-scheme/ https://www.batmi.net/salokha-yojana-to-settle-agricultural-land-disputes-know-what-are-the-benefits-of-this-scheme/#respond Mon, 26 Dec 2022 10:41:54 +0000 https://www.batmi.net/?p=29079 राज्य सरकार कडून मानवी हितासाठी अनेक सरकारी योजना राबवण्यात येतात. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं शेतजमिनीचे वाद हे काही नवे नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीच्या वादामुळं काही शेतकरी कोर्ट-कचेरीत फेऱ्या मारत आहेत. (‘Salokha Yojana’ to settle agricultural land disputes, know what are the benefits of this scheme?)

म्हणूनच शेतजमिनीचे वाद मिटवण्यासाठी राज्य सरकारनं आता ‘सलोखा योजना’ आणली आहे. तर यामध्ये आज आपण ही योजना नेमकी काय? आणि याचा फायदा काय होणार याबाबत जाणून घेणार आहोत.

शेतजमिनीचा ताबा आणि वहिवाटी बाबत शेतकऱ्यांमध्ये आप आपसात अनेक ठिकाणी वाद होतात. ते वाद मिटवण्यासाठी तसेच समाजामध्ये सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी ही सलोखा योजना आणण्यात आली आहे.

या योजनेत एका शेतकऱ्याच्या नावावरील शेत जमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेत जमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमिन धारकांचे अदलाबदल दस्तासाठी नोंदणी फी आणि मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्यात येईल, असे राज्य सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

या योजनेअंतर्गत दस्तनोंदणीच्या अदलाबदलासाठी मुद्रांक शुल्क 1 हजार रुपये आणि नोंदणी फी १०० रुपये आकारण्यात येईल.आता राज्य सरकारने सलोखा योजनेस मान्यता दिली खरी, पण याचा नेमका काय फायदा होणार असा सर्वांना प्रश्न पडला असेल.

तर या योजनेमुळं शेतकऱ्यांना विविध फायदे होणार आहेत या योजनेमागची भूमिका स्पष्ट करताना सरकारनं म्हटलंय की, या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक मानसिकता निर्माण होईल. तसंच विविध न्यायालयातील प्रकरणं निकाली निघतील.

भूमाफियांचा अनावश्यक हस्तक्षेप सुद्धा होणार नाही. तर एकूण जमिनधारकांची खातेसंख्या ३ कोटी ३७ लाख ८८ हजार २५३ एवढी आहे. तर एकूण वहिवाटदार शेतकरी १ कोटी ५२ लाख इतके आहेत. शेत जमिनीच्या ताब्यासंदर्भात एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या सुमारे १३ लाख २८ हजार ३४० इतकी आहे.

सलोखा योजनेत अर्ज केल्यानंतर तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी १५ दिवसात पंचनामा करणे आवश्यक असल्याची माहिती देखील राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे. पन्नास वर्षांपूर्वी राज्य शासनाने जमीन सुधारणा करण्यासाठी, शेतकरी बांधवांचा खर्च वाचवण्यासाठी आणि उत्पन्न वाढेल या अनुषंगाने जमिन एकत्रिकरण योजना आणली होती.

या योजनेअंतर्गत जमीनीच्या चुकीच्या नोंदी झाल्या आणि मालकी हक्काबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला , जमिनीचे छोटे छोटे तुकडे झाले असल्याने शेती करण्यासाठी परवडत नव्हती. त्यामुळे १९७१ मध्ये शासनाने एक योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून परस्पर संमतीने लगतच्या तुकड्यांचे एकत्रीकरण करण्यात आले.

यामध्ये मात्र मोठ्या तांत्रिक चुका पाहायला मिळाल्यात. सर्वात मोठी चूक म्हणजे जो शेती करतो त्याच्या नावावर शेत जमीन नव्हती तर जो करत नाही त्याच्या नावावर शेत जमीन झाली. म्हणजे सातबारा कुणाचा आणि त्याच्यावर जमीन असणारा दुसराच. अशी परिस्थिती सर्वत्र पाहायला मिळत होती. गाव गाड्या नुसार तीन ते चार प्रकरणे अशी आपल्याला हमखास पाहायला मिळतात.

नंतर शेत जमिनीला सोन्याचा भाव आला. वाढत्या औद्योगीकरणामुळे, शहरीकरणामुळे शेतजमिनीची मागणी वाढली. विशेषता शहरा लगत असलेल्या जमिनीला तर हिऱ्या-मोत्यापेक्षाही अधिक दर मिळू लागला. परंतु जमीन कसणार दुसरा आणि जमीन दुसऱ्याच कोणाच्या नावावर असल्याने शेतजमीन विक्री करताना तंटे उभे राहिले.

खरं पाहता शासनाने एकत्रित केलेले बहुतेक शेतीचे मालक हे भाऊबंद होते. यामुळे भाऊबंदकीमध्ये मोठा वाद सुरू झाला. हा वाद आपसी सलोख्याने काही मिटू शकला नाही. आजपर्यंत तेव्हा सुरू झालेला वाद कायम आहे. या जमिनीच्या वादामुळे चक्क मर्डर आणि हाफ मर्डर सारख्या घटना घडल्या आहेत.

दरम्यान आता यावर उपाय म्हणून शासनाकडून सलोखा योजना राबवली जाणार आहे. तब्बल ५० वर्षांपूर्वी सुरू झालेला हा वाद, यामुळे मिटेल अशी आशा शासनाने व्यक्त केली आहे.

]]>
https://www.batmi.net/salokha-yojana-to-settle-agricultural-land-disputes-know-what-are-the-benefits-of-this-scheme/feed/ 0 29079
एटीएम मधून फाटलेली नोट बाहेर आली तर? नेमकं करायचं तरी काय? https://www.batmi.net/what-if-a-torn-note-comes-out-of-an-atm-what-to-do-exactly/ https://www.batmi.net/what-if-a-torn-note-comes-out-of-an-atm-what-to-do-exactly/#respond Sat, 24 Dec 2022 06:16:34 +0000 https://www.batmi.net/?p=29065 एटीएम हे प्रत्येकाजवळ असत, आधी एटीएम नव्हते तर बँक मध्ये रांगेत लागून पैसे काढण्याकरिता तासंतास उभे राहावे लागायचे. पण जेव्हा एटीएम आल तेव्हा कुठल्याही रांगेत उभं न राहता, अगदी चोखपणे कधी ही पैसे काढणे शक्य झाले. (What if a torn note comes out of an ATM? What to do exactly?)

आता एटीएम मधून पैसे काढणे यूजर फ्रेंडली झाले आहे. पण, कधी कधी आपण एटीएममधून पैसे काढताना फाटलेल्या नोटा बाहेर येत असतात आणि त्यामुळे ग्राहकांना अडचणी येत असतात. कारण या फाटलेल्या नोटांना कोणताही दुकानदार घेत नाही आणि त्यामुळे तुम्हाला नाईलाजाने त्या त्रासाचा सामना करावा लागतो.

तुमच्या सोबत सुद्धा कधीतरी असं झालं असेलच की एखादी फाटलेली नोट एटीएम मधून निघाली असेल आणि ती कुठलाही दुकानदार घेत नसेल… तर तुम्हाला सुद्धा त्यावेळी हा प्रश्न नक्कीच पडला असेल की आता नेमकं करायचं तरी काय? तर आता तुम्हाला चिंता करायची आवश्यकता नाही कारण आपण आज याच बदल चर्चा करणार आहोत.

एटीएममधून फाटलेल्या नोटा जर आल्या, तर त्या बदलण्यासाठी तुम्हाला ज्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढले जाते त्या बँकेकडे अर्ज करावा लागतो. या अर्जामध्ये एटीएमची तारीख, वेळ आणि ठिकाण लिहावे लागेल. तसेच तुम्हाला पैसे काढण्याची स्लिप जोडावी लागेल. जर तुमच्याकडे स्लिप नसेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आलेल्या मॅसेजची माहिती द्यावी लागेल.

आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणतीही सरकारी बँक सहजपणे नोटा बदलून देऊ शकते. त्यामुळे आता तुम्हाला फाटलेल्या नोटा सहजपणे बदलून मिळू शकतात आणि या प्रक्रियेला जास्त वेळ सुद्धा लागत नाही. बँकेने दिलेल्या माहिती नुसार ट्विटरवर एका ग्राहकाच्या तक्रारीची माहिती देताना बँकेने या परिस्थितीत ग्राहकांनी कोणती पावले उचलली पाहिजेत हे सुद्धा सांगितले आहे.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, एटीएममध्ये नोटा लोड करण्यापूर्वी, त्या अत्याधुनिक नोट सॉर्टिंग मशीनद्वारे तपासल्या जात असते. त्यामुळे फाटलेल्या नोटा ग्राहकांना मिळू शकत नाही. तरी सुद्धा एखादी नोट फाटलेली आढळली, तर तुम्ही कोणत्याही शाखेतून नोटा सहजपणे बदलून घेऊ शकता.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तक्रार कशी नोंदवायची तर चला या बद्दल जाणून घेऊयात. उदाहरण सांगायचं झालं तर, जर का स्टेट बँक शाखेच्या एटीएममशीन मधून फाटलेल्या नोटा आल्या तर, स्टेट बँकेच्या माहितीनुसार, एचटीटीपीएस कोलन डबल स्लॅश सीआरसीएफ डॉट एसबीआय डॉट को डॉट इन स्लॅश सीसीएफ स्लॅश या वेब साईट वर देखील तुम्ही तक्रार करू शकता.

ही लिंक फक्त स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमसाठी आहे. लक्षात ठेवा तुम्हाला कुठलीही बँक, एटीएममधून फाटलेल्या नोटा बदलण्यास नकार देऊ शकत नाही. असे असताना सुद्धा बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. ग्राहकांच्या तक्रारीच्या आधारे बँकेला १० हजारांपर्यंतचे नुकसान भरपाई करून द्यावे लागू शकते.

]]>
https://www.batmi.net/what-if-a-torn-note-comes-out-of-an-atm-what-to-do-exactly/feed/ 0 29065
टिटवी या पक्षाचे अंडे माणसाने खाल्ले तर त्याची झोप खरचं पूर्णपणे नाहीशी होते का? https://www.batmi.net/if-a-person-eats-the-egg-of-titvi-does-his-sleep-really-disappear-completely/ https://www.batmi.net/if-a-person-eats-the-egg-of-titvi-does-his-sleep-really-disappear-completely/#respond Fri, 23 Dec 2022 11:30:55 +0000 https://www.batmi.net/?p=29052 तुम्ही अनेक पक्षांबद्दल ऐकलं असेल, पण तुम्हला टिटवी या पक्षाबद्दल माहिती आहे का हो… असं म्हटल्या जाते की टिटवी या पक्षाचे अंडे जर मनुष्याने खाल्ले तर त्याची झोप नाहीशी होते. सोबतच टिटवी या पक्षाला अपशकुनी सुद्धा म्हटल्या जाते. (If a person eats the egg of Titvi, does his sleep really disappear completely?)

एखाद्याच्या घरावरून टिटवी आवाज करत गेली ,की काहीतरी अपशगुन होणारच.. अशे लोक बोलतात पण हे कितपत खरंय ? हेच आज यामध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर टिटवी या पक्षा बद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. ३३ सेंटीमीटर आकाराचा असणारा हा जीव. रात्रीच्या शांततेचे गूढ वाढविण्याच्या आवाजाच सामर्थ असणाऱ्या पक्षांमध्ये टिटवीला गणल्या जात.

पण टिटवी बद्दल बोलल्या जाणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या आहेत का ? तर या बद्दल एक-एक करून आपण समजून घेऊयात. तर पाहीली गोष्ट अशी की हा पक्षी अपशगुणी असतो का? पूर्वी एखाद्या घरावरून ही टिटवी रात्री-बेरात्री जोरजोराने ओरडत गेली की , अनेकांचा रात्रभर डोळ्याला डोळा लागत नसायचा. कारण टिटवीचा आक्रोश हा प्रियजनांच्या विरहाचा संदेश असल्याची समजूत आहे.

पण खर सांगायचं तर हि निव्वळ एक अफवा आहे जी पिढी न पिढी पसरत गेलीय. टिटवी हा पक्षी केवळ आपल्या ओरडण्यासाठी बदनाम आहे. परंतु टिटवीच्या ओरडण्या मागे सुद्धा एक रंजक गोष्ट आहे. तिच्या ओरडण्यातून अपशकुन होत नाही तर तिच्या पिल्लांचं संरक्षण होत, आता तुम्ही म्हणत असाल ते कसं, तर आता आपण एक उदाहरण घेऊयात आपल्याला काही झालं किंवा आपल्यावर कुठलं संकट आलं.

की आपले आई वडील कुठलाही विचार न करता आपल्या संरक्षणासाठी धावपळ करत असतात. तसंच यांचं आहे.. हे पक्ष्याचं जोडपं आपल्या घरट्यातील अंड्यांवर, त्यातनं डोकावणाऱ्या लालचुटूक पिल्लांवर अतोनात प्रेम करतं.आपल्या घरट्यावर घारीचीच काय, पण झाडाच्या पानाच्या सावलीची दखलसुध्दा या पक्ष्याला अस्वस्थ करते. अन् तिथनंचं सुरू होतो या जीवाचा आकांत.

ज्यातली करूणा , पिलांच्या रक्षणासाठीची आर्तता डोळ्याआड करत आपल्याचं पिल्लांचा विचार ते करू लागतात. नदी परिसर, ओसाड, माळराने, मैदान आणि निर्जन डोंगरावर या पक्षाचे अधिवास असते. कारण घर बांधने टिटवीला शक्य नाही तिच्या पायाची विशिष्ट रचना असल्याने ती जमिनीवरच राहते. टिटवी ला झाडाची फांदी धरून ठेवता येत नाही.

जमिनीवर खड्डा खोदून टिटवी त्यात आपली अंडी घालते.या घरट्या जवळ साप ,कोल्हा, लांडगा ,मुंगूस किंवा माणूस असा कोणताही प्राणी आल्यास टिटवी जिवाचा आक्रोश करून आसमंत डोक्यावर घेते. तर दुसरी टिटवी घरट्याच्या दूर पंख मोडल्याने फडफडत असल्याचं नाटक करते, त्यामुळे शत्रू प्राण्याचे लक्ष विचलित होते तो प्राणी जखमी असल्याचे नाटक करणाऱ्या टिटवीच्या दिशेने जातो.

त्याला भुलवत – भुलवत ती घरट्यापासनं दूर नेऊन त्याची दिशाभूल करते आणि पिल्यांच्या-अंड्यांचं रक्षण करते. मादी एका वेळी ३ ते ४ तपकिरी आणि राखाडी रंगाची टिपके असलेली अंडी देते.या अंड्यातून बाहेर आलेली पिल्ली दोन दिवसातच धावू लागते. त्याच्यावर कोणतं संकट येणार हे टिटवी ला कळताच ती सांकेतिक आवाजातून आपल्या पिल्लांना सतर्क करते.

आपल्या पालकांच्य ओरडण्यातून संकेत मिळताच पाय दुमडून हि पिल्लं जमिनीशी एकरूप होऊन जातात. त्यामुळे शत्रू प्राण्याला त्यांच्या असण्याची थोडीही चाहूल लागत नाही आणि तो प्राणी तिथंन दूर जातो. याच कारणांमुळे खासकरून माळरानात टिटवी सतत ओरडत असते. हा तिचा आवाज अपशगुन नाही तर तिच्या पिल्लांसाठी तिची काळजी असते

आता दुसरी गोष्ट म्हणजे टिटवी पक्षाचे अंडे जर मनुष्याने खाल्ले तर त्याची झोप नाहीशी होते का ? तर असल काहीही नाही आहे.. ही केवळ लोकांनी पसरवलेली एक अंधश्रद्धा आहे… कारण अजून पर्यंत आम्हला तरी असला कोणता मनुष्य सापडलेला नाही. आणि सांगायचंच झालं तर मी म्हटल्या प्रमाने टिटवीचं आपल्या अंड्यावर आणि पिल्लांवर अतोनात प्रेम आहे.

तुम्ही तिच्या अंड्यांना हात जरी लावला तर ती तुम्हाला सोडणार नाही. टिटवी एक हिंमतवान पक्षी आहे . आपलं मानवी मन कुठलीही गोष्ट ऐकलं की लगेच घाबरत आणि अश्या अफवांना तर आपण खूप लवकर बळी पडतो. मला वाटत आता तुमचा गैरसमज दूर झाला असावा आता कधीही तुमच्या घरावरून टिटवी ओरडत गेली, की मनात भीती ची धाक नाही तर टिटवीच्या मायेची आस म्हणून तुम्ही तिच्या कडे बघा.

]]>
https://www.batmi.net/if-a-person-eats-the-egg-of-titvi-does-his-sleep-really-disappear-completely/feed/ 0 29052