छत्रपती शिवाजी महाराज – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Wed, 03 Aug 2022 14:42:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg छत्रपती शिवाजी महाराज – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 लुटेत आलेल्या परस्त्रीलाही शिवरायांनी कसे वागवले? https://www.batmi.net/how-did-shivaraya-treat-the-woman-who-came-to-loot/ https://www.batmi.net/how-did-shivaraya-treat-the-woman-who-came-to-loot/#respond Tue, 02 Aug 2022 12:50:51 +0000 https://www.batmi.net/?p=26260 कल्याणच्या सुभेदाराची सून शिवरायांनी सन्मानाने मागे पाठवून दिली ही कथा आपण आजवर अनेकदा ऐकली असेल. शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा नेहमीच आदर केला. स्त्री म्हणजे मराठ्यांसाठी लक्ष्मीचे रूप, तिची विटंबना महाराष्ट्र देशी होणे शक्यच नाही.

ह्याच तत्वावर शिवरायांनी सुभेदाराची सून सन्मानाने परत पाठवली. ही कथा ऐकताना महाराजांविषयी असणारा आदर अधिकच वाढतो.

पण नेमके काय घडले होते? कोणी त्या सुनेला धरून आणले होते? ही कथा सत्य आहे की निव्वळ एक दंतकथा? ह्या कथेमधील काही समज गैरसमज आपण आजच्या लेखामधून दूर करण्याचा प्रयत्न करूयात.

त्या वेळेस कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद होता. शिवरायांनी एकीकडे जावळी जिंकून चंद्रराव मोऱ्यास ठार केले होते व रायगड सारख्या किल्ल्याचे बांधकाम देखील चालू केले होते. खर्च प्रचंड येत होता पण स्वराज्यात नवनवीन मुलुख सामील करावेच लागणार होते.

विजापूरचा आदिलशाह शेवटचे श्वास मोजत असतानाच मोठा मुलुख स्वराज्यात सामील केलेला बरा असा निर्धार करत शिवरायांनी मोठा प्रांत स्वराज्यात जोडला होता. त्याच दरम्यान राजांना खबर लागली की कल्याणचा सुभेदार मोठा खजिना घेऊन विजापूरला निघाला आहे.

आता शिवरायांनी मोठी मोहीम आखली होती. काहीही करून हा खजिना मिळवायचाच होता. म्हणून महाराज काही विश्वासू लोकांना घेऊन कल्याणच्या मार्गाने निघाले होते. राजांनी एक तुकडी पुढे पाठवली होती तिचे नेतृत्व आबाजी सोनदेव करत होते.

एकीकडे हा कल्याणचा सुभेदार आपल्या कुटुंबियांसोबत घाट पार करत होता. त्यात मुलं आणि सुनाही होत्या. सर्व बाजूंनी घनदाट जंगल, तरी सुभेदार तिथून प्रवास करत होता.

काही काळ भयाण शांतता होती पण नंतर मात्र मराठ्यांनी हर हर महादेवच्या घोषणा देत विजापुरी फौजेवर हल्ला चढवला होता.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे विजापुरी सैन्य पळून गेले होते आणि मराठ्यांच्या हाती हा शाही खजिना लागला होता. तो खजिना घेत आबाजींनी भिवंडी व कल्याण काबीज केले.

शिवराय कल्याणला आले तेव्हा त्यांचे मोठ्या जल्लोषात लोकांनी स्वागत केले. राजांपुढे सारा खजिना पेश करण्यात आला.

अत्यंत मौल्यवान हिरे, माणके, विविध रत्न, सोने रूपे त्या खजिन्यात होते. आबाजी सोनदेवांनी इशारा केला आणि काही मावळे एक मेणा घेऊन दरबारात आले.

कल्याणच्या सुभेदाराची सून त्या मेण्यातून बाहेर आली. लुटीदरम्यान तिला देखील अटक झाली होती. आबाजी सोनदेवांनी महाराजांना सल्ला दिला की, “ही एक अत्यंत रूपवान स्त्री आहे. त्यात ती सुभेदाराची सून आहे.

तिला आपण नाटकशाळेत ठेवावे.” राजांना हे ऐकून अत्यंत राग आला. त्यांनी असे करण्यास नकार दिला. तेव्हा आबाजी सोनदेव म्हणाले, “महाराज, अहो ह्या पातशहांनी आपल्या आया बहिणी नागवल्या, बाटवल्या. आपण ह्यांचा सूड घेतलाच पाहिजे.” राजांसमोर आता तुकोबांचे शब्द येऊ लागले होते परस्त्री रखुमाई समान.

महाराज म्हणाले, “आबाजी, अहो ह्या पातशहांनी ऐसें केले म्हणून तर आपण हे ईश्वरीय राज्य निर्माण करत आहोत. ह्या सुभेदाराच्या सुनेला उचित मान करून पुन्हा माघारी पाठवा.”

महाराजांचा आदेश निघाला होता, अगदी तसेच करण्यात आले होते. शिवरायांनी महिलेचा आदर केला होता. स्वराज्यात महिला देवासमान होत्या.

आता शिवरायांच्या तोंडी काही जणांनी एक वाक्य घातले आहे ते म्हणजे अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती.

अर्थात महाराज तिला म्हणाले होते की. आमची आई तुझ्यासारखी सुंदर असती तर आम्हीही सुंदर निपजलो असतो. पण हे वाक्य निव्वळ ढोबळ वाटते. कितीही कुरूप असली तरी मुलाला आपली आई प्रिय असते.

त्यात समकालीन असणाऱ्या परमानंदाने जिजाऊंचे वर्णन करताना अत्यंत सुंदर रूपवान असल्याचे म्हटले आहे. आपल्या आईची बरोबरी आपण कोणाबरोबरही करत नाही. केवळ तुम्ही आम्हाला आईच्या जागी आहात असे म्हटले जाते. हेच महाराजांना अभिप्रेत असावे.

ही कथा खरी की खोटी ह्यावर एकमत नाहीय. पण ऐतिहासिक बखरींमध्ये ह्या कथेचा उल्लेख येतो. कथा खरी असो वा खोटी पण महाराजांनी स्त्रियांचा आदर नेहमीच केला हे आपल्याला त्यांच्या चरित्रातून स्पष्ट जाणवते. ह्या कथे विषयी तुमचे मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
]]>
https://www.batmi.net/how-did-shivaraya-treat-the-woman-who-came-to-loot/feed/ 0 26260
ही होती मराठ्यांची ऐतिहासिक ‘दहा’ शस्त्रे… https://www.batmi.net/these-were-the-historical-ten-weapons-of-the-marathas/ https://www.batmi.net/these-were-the-historical-ten-weapons-of-the-marathas/#respond Tue, 02 Aug 2022 12:35:21 +0000 https://www.batmi.net/?p=26268 जगात सर्वत्र शांतता नांदावी, कुठेही रक्तपात होऊ नये हेच धर्मात शिकवले जाते. मात्र अधिक सत्तेच्या लालसेने शांतता भंग करणाऱ्यांना शस्त्रांनी शासन करायचे असते हे देखील धर्मच सांगतो. राजाचा विजय हा एकूण त्याच्या सैन्यावर, शस्त्रांवर व आत्मबलावर अवलंबून असतो.

शिवरायांनी इतक्या लढाया केल्या आणि मावळ्यांनी देखील जंगलात, खिंडीत, गडकोटांवर लढाया केल्याचे आपण जाणतोच. त्या लढायांमध्ये विविध प्रकारची शस्त्रं वापरली गेली.

मराठ्यांकडे कोणती अशी विशेष दहा शस्त्रं होती हे आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहुयात मराठ्यांची ऐतिहासिक शस्त्रं.

१) धोप व ढाल :

धोप हे शस्त्र मराठ्यांचे अत्यंत प्रिय शस्त्र आहे. तलवारीचे आडवे पाते सरळ केले की त्यास धोप म्हणतात. आता ह्या धोपमध्ये अनेक प्रकार आहे. कर्नाटक, महाराष्ट्र असे प्रदेशाप्रमाणे हे बदल जाणवतात. ह्या धोपला मागच्या बाजूने एक गज असतो. शिवरायांनी जी भवानी तलवार वापरली तिलाच धोप, फिरंगी अशी नावे आहेत. ह्या धोपसोबत ढाल असते आणि हे मराठ्यांचे प्राथमिक शस्त्र होते.

२) गुर्ज :

गुर्ज हे मराठ्यांचे व शिखांचे शस्त्र आहे. भारतात गदा ह्या शस्त्राला महत्व असल्यामुळे ह्या शस्त्राची रचना गदेप्रमाणे आहे. ह्या शास्त्रात तीन शस्त्रांचा समावेश दिसतो. वरचा भाग गदेप्रमाणे आहे, पण गदा गोलाकार असते इथे मात्र कुऱ्हाडीच्या पाकळ्यांनी बनलेली ही गदा असते. ह्याला धरायला खाली तलवारीची मूठ असते. अशी तीन शस्त्रं ह्यात दिसतात.

३) दांडपट्टा :

दांडपट्टा हे शस्त्र देखील अत्यंत प्रचलित असे शस्त्र आहे. बाजी प्रभू देशपांडे ह्यांनी हेच दंडपट्टे वापरत खिंड लढवली होती. जिवा महाले ह्यांच्या हाती देखील दांडपट्टा होता. ज्यामुळे शिवरायांचे प्राण वाचले होते. दांडपट्ट्याला दोन्ही बाजूने धार असते. खाली धरायला एक आडवा गज असतो आणि हात झाकतील असे कवच असते.

४) वाघनखं :

वाघनखं ह्या शस्त्राला आता सारेजण ओळखतात. अत्यंत प्रचलित असणारे हे शस्त्र शिवरायांनी निर्माण केल्याचे इतिहासकार सांगतात. ह्याला अमुक्त शस्त्र म्हणतात. मुक्त म्हणजे हातातून सुटणारे शस्त्र आणि अमुक्त म्हणजे ज्याला हातावेगळे करता येत नाही ते. शिवरायांनी वाघनखाने अफझलखानाचा कोथळा काढल्यापासून संपूर्ण जगाने ह्याची धास्तीच घेतली आहे.

५) कट्यार/ बिचवा :

कट्यार हे मानाचे आणि महत्वाचे शस्त्र होते. राजे महाराजे एकमेकांना हे शस्त्र भेट म्हणून द्यायचे. तितकाच ह्या शस्त्रांचा आपत्कालीन स्थितीत वापर व्हायचा. कमरेला खोचलेली ही कट्यार त्रिकोणी आकाराची असते. मावळ्यांकडे कट्यारीप्रमाणे छोटे छोटे बिछवे पण होते. लांबून एखाद्याला बिछवा मारून फेकला की शत्रू प्राणास मुकलाच म्हणून समजा.

६) माडू :

हे शस्त्र अत्यंत कमी वेळा वापरण्यात आलेले आहे. काळविटाची दोन शिंगं विरुद्ध दिशेने छोट्या ढालीवर बसवली जातात आणि त्यांच्या टोकाला छोट्या आकाराचे भल्याचे टोक लावले जातात. एका हातात तलवार आणि एका हातात माडू घेऊन कधी मावळा लढायला उतरलाच तर रुद्राचे तांडव होणार हे निश्चित.

७) धनुष्य बाण:

हे शस्त्र सर्वांनाच परिचयाचे आहे पण बाणांचे अत्यंत महत्व असल्याने काहींचे आडनाव बांदल पडले. ज्यांच्याकडे धनुष्यबाणाचे पथक होते ते बाण दल अर्थात बांदल. बारीक बांबूच्या काठीला पुढे टोकदार धातू असतो व मागच्या बाजूला पक्षांचे पंख लावलेले असतात. नंतरच्या काळात शंभूराजांनी विशिष्ट प्रकारचे बाण बनवले. विविध आकारांमुळे त्याला महत्व प्राप्त झाले.

८) भाला / निशाणीचा भाला / विटा :

भाला हे शस्त्र अत्यंत वापरात असलेले शस्त्र आहे. चित्रपट मालिकांमध्ये आपण मावळ्यांच्या हातात आपण अनेकदा भाला पाहतोच. पण भाल्यासोबतच निशाणीचा भाला पण असायचा.

ध्वजाला वरच्या बाजूने टोकदार भाला लावला जायचा. जेणे करून ध्वजधारी व्यक्तीला पण लढता येईल. विटा हे शस्त्र भाल्याप्रमाणेच असते फक्त हे एकदा सोडले की पुन्हा माघारी येते. हे शस्त्र शिवा काशीद ह्यांच्या हातात दिसते.

९) गोफण:

गोफण हे शस्त्र नसून केवळ शेतातली पाखरे हकण्यासाठी वापरात असणारे एक तंत्र होते. पण उपलब्ध असणाऱ्या गोष्टींमधून शिवरायांनी शस्त्रनिर्मिती केली. दगड तसे कुठेही मिळतात आणि गोफणीचा मारा असा भयानक असतो. एकदा नेम पकडला की थेट जाऊन शत्रूचे मस्तकच फोडणार. गनिमी काव्यात ह्या शस्त्राचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जाई.

१०) कुऱ्हाड / कोयता:

कुऱ्हाड झाडे तोडण्यासाठी आणि कोयता शेती कामासाठी लोक वापरायचे. पण स्वराज्य निर्माण झाल्यानंतर मात्र कुऱ्हाड आणि कोयता खूप वापरात आला. रामोशी समाजाकडे हे शस्त्र बघायला मिळते.

अशी ही मराठ्यांची शस्त्रे होती. ह्यांच्याच बळावर स्वराज्य निर्माण झाले आणि कोणत्याच शत्रूने स्वराज्याकडे वाकडी नजर करून पाहिले नाही. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

]]>
https://www.batmi.net/these-were-the-historical-ten-weapons-of-the-marathas/feed/ 0 26268
शिवकाळातील चलन कसे होते? पाहा फोटो… https://www.batmi.net/how-was-the-currency-during-shiva-period-see-the-photo/ https://www.batmi.net/how-was-the-currency-during-shiva-period-see-the-photo/#respond Tue, 02 Aug 2022 11:15:32 +0000 https://www.batmi.net/?p=26122 शिवरायांचे स्वराज्य आणि तो संपूर्ण शिवकाळ स्वत्व टिकवण्यासाठीच होता. आपली भाषा, आपली संस्कृती, आपले किल्ले, आपली भूमी सारे आपल्या राज्यात टिकावे म्हणून हे स्वराज्य निर्माण केले गेले होते.

प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून स्वराज्याला व रयतेला कसा लाभ होईल हे शिवराय नेहमी पहायचे. तसेच एक पाऊल महाराजांनी आपल्या स्वत्वासाठी उचलले होते.

अर्थकारणाला नवीन चालना मिळाली होती. शिवरायांनी स्वतःच्या नावे चलन चालू केले होते. शिवराई आणि होन ही नाणी आपल्याला माहितीच आहेत.

आजच्या लेखामधून आपण शिवकाळातील हेच चलन कसे चालायचे? ते किती प्रकारचे होते? कुठे निर्माण व्हायचे? हे पाहणार आहोत.

शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले म्हणजेच भूमीपुत्रांचे राज्य निर्माण केले. इथे स्वत्वाला महत्व होते. जसे राजाभिषेका वेळी महाराजांनी भाषा सुधारण्यासाठी राज्यव्यवहार कोष निर्माण केला अगदी तसेच राजांनी स्वराज्यासाठी नाणी बनवण्यास सांगितली.

हे चलन परकीय नाही तर स्वकीय असणार होते. ह्या आधी पातशाही होन, अशरफी इत्यादी मोगलांचे वा इतर बादशहांचे चलन स्वराज्यात चालायचे.

ह्याच गोष्टीवर शिवरायांना बंदी घालायची होती. हेन्री ऑक्सिंडन हा इंग्रज अधिकारी जेव्हा रायगडावर राजाभिषेकासाठी गेला होता तेव्हा तो इंग्रजांच्या काही मागण्या शिवरायांकडून पूर्ण करून घेणार होता.

एकूण १९ मागण्या घेऊन आलेल्या हेन्रीची शेवटची मागणी होती ती म्हणजे इंग्रजांचे चलन स्वराज्यात चालवण्याची. पण महाराजांनी ती मागणी नाकारली.

त्यावर फुली मारत राजांनी स्वत्व टिकवले. शिवरायांना स्वतःच्या चलनाविषयी आणि स्वराज्यविषयी किती प्रेम असेल हे ह्यातून दिसते.

शिवरायांनी रायगडावर टंकसाळ अर्थात नाणी पडण्याचा कारखाना निर्माण केला होता. जी आजही रायगडावर पाहता येते. केवळ रायगड नाही तर इतरही काही किल्ल्यांवर ह्या नाणी पाडल्या जात होत्या.

शिवरायांनी प्रामुख्याने दोन प्रकारची नाणी पाडली ‘होन’ आणि ‘शिवराई’. ह्यातील होन सोन्याचा व शिवराई तांब्याची होती.

होन हा कन्नड शब्द असून त्याचा अर्थ सुवर्ण असा होतो. ह्या दोन्ही नाण्यांवर एका बाजूने ‘श्री राजा शिव’ तर दुसऱ्या बाजूने ‘छत्र पती’ असे शब्द वेगवेगळे करून लिहिले होते.

केवळ एक टंकसाळ नसून अनेक किल्ल्यांवर ह्या नाणी पाडण्याचे काम चालायचे. त्याचे परवाने महाराजांनी लोकांना दिले होते. एका विशिष्ट पद्धतीने ती इतर नाणी पाडली जायची. त्यावर एक वेगळे चिन्ह असायचे म्हणून त्याला निशाणी होन म्हणायचे.

आज ह्याच एका होनाची किंमत तेरा लाख रुपये इतकी आहे. शिवराई बाबतीत विचार केला की समजते ६४ शिवराई म्हणजे एक रुपया. ह्यात अर्धी शिवराई देखील मिळायची.

एक टंकसाळेत सगळी नाणी निर्माण होत नसत त्यामुळे त्यांच्यात थोडा फरक जाणवतो. त्यावरील शिव ह्या शब्दातील वेलांटी बदलते. कधी कधी ‘सिव’ असे छापलेले दिसते.

शिवकाळात ह्या व्यतिरिक्त इतरही नाणी चालायची. अचानक इतर सगळ्या चलनावर बंदी घालणे शक्य नव्हते. म्हणून काही मोगली चलन देखील राजाभिषेकानंतर काही वर्षे सुरू राहिले.

गंभार, होन, पुतळी, रुणगिरी, पातशाही देवराई, अच्युतराई, रामचंद्रराई, धारवाडी, फलम, चक्रम असे इतर चलन देखील स्वराज्यात चालायचे.

मोहोरा ह्या नाणी एक राजा दुसऱ्या राजाला भेट देताना वापरायचा. यादव काळातील पगोडा हे चलन देखील वापरात होते.

आज जसे सुट्टे पैसे असतात त्याप्रमाणे शिवकाळात देखील अशी नाणी होती. प्रताप, धवल, चवल हे त्याचीच उदाहरणे. दोन ‘वीस’ नामक नाणी म्हणजे एक ‘व्यान’.

तसेच दोन ‘व्यान’ म्हणजे एक ‘दुव्वल’. ह्यात फलम नावाच्या नाण्यावर केवळ ‘छत्रपती’ लिहिलेले असायचे. दहा फलम म्हणजे एक होन अशा किंमती ठरलेल्या होत्या.

आज होन हा प्रकार पाहायला मिळत नाही. काही इतिहासकार ह्याचे कारण सांगतात की मोगलांच्या चलनापुढे कदाचित होन टिकले नसतील.

पण काहींच्या नुसार औरंगजेबाने दक्षिणेत आल्यानंतर मिळतील तितके होन वितळवले होते. शिवराई बाबतीत गोष्ट वेगळी आहे. शिवराई स्वराज्यात अत्यंत लोकप्रिय ठरली. आजही मोठ्या प्रमाणात ती उपलब्ध होते.

सभासद बखरमध्ये उल्लेख आहे की महाराजांच्या निधनासमयी स्वराज्यात ३१ प्रकारची सोन्याची नाणी होती. त्या सुवर्ण नाण्यांची एकूण संख्या ६९ लाखांच्या घरात होती.

त्यात ४ लाख शिवराई होन होते. अशी ही शिवकाळातली अर्थव्यवस्था व चलन होते. तुम्हाला याविषयी आणखी काही माहिती असल्यास आम्हाला नक्की सांगा. सोबत हा लेख कसा वाटला हे सागायला विसरू नका.

]]>
https://www.batmi.net/how-was-the-currency-during-shiva-period-see-the-photo/feed/ 0 26122
शाहीर अमर शेख ह्यांनी लिहिलेला शिवरायांचा पोवाडा… https://www.batmi.net/shivarais-powada-written-by-shaheer-amar-shaikh/ https://www.batmi.net/shivarais-powada-written-by-shaheer-amar-shaikh/#respond Tue, 02 Aug 2022 11:09:32 +0000 https://www.batmi.net/?p=26171 शाहीर अमर शेख म्हणजे मराठमोळ्या डफावरची मराठमोळी थाप. तुणतुण्याचा ताण नि पहाडी आवाज. धर्म माणसासाठी असतो माणसं धर्मासाठी नसतात हे तत्व पाळून त्यांनी हाडाचा मराठी बाणा सांभाळला.

‘सुटला वादळी वारा’ सारखे गीत लिहिणारे नि संयुक्त महाराष्ट्र चळवळी दरम्यान दिल्लीच्या रस्त्यारस्त्यावर डफावर थाप मारत पोवाडे गाणारे शाहीर अमर शेख अत्यंत वंदनीय आहेत.

शाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांच्या कविता व पोवाडे अमर शेख ह्यांनीच सादर केले होते. आजच्या लेखात अमर शेख ह्यांनी शिवरायांवर लिहिलेला पोवाडा आपण पाहणार आहोत. तसा हा पोवाडा मोठा आहे पण नेमके त्यांना काय म्हणायचे होते, त्यांनी केलेले वर्णन कसे आहे सारे पाहुयात.

शाहीर अमर शेख ह्यांनी महाराजांच्या आयुष्यावर पोवाडा लिहिला असला तरी इंग्रजांवर महाराजांनी केलेली स्वारी ह्यात अधिकच तीव्रतेने मांडली आहे.
आपल्या तरुणांना इंग्रज कसे होते हे ओळखता यावे असाच काही हेतू त्यांचा असावा. शिवरायांच्या जन्मापूर्वीचे वर्णन त्यांनी अत्यंत सुंदरपणे केलेले आहे. अमर शेख म्हणतात,
“एके रात्री सह्यगिरी हसला। हसताना दिसला।
आनंद त्याला कसला। झाला उमगेला मानवाला।।”

हे वर्णन शिवरायांच्या जन्मापूर्वीचे वातावरण स्पष्ट करते. सूर्यास्त झाल्यानंतर पुन्हा प्रकाश कसा आला अशी कल्पना करत शाहीर म्हणतात, हे मानवाला उमगलेच नाही. ते केवळ सह्याद्रीला माहिती होते म्हणून तो आनंदाने हसत होता.

चिमण्यांचा थवा कसा गात उठला असे म्हणत सकाळचे वातावरण अमर शेख निर्माण करतात आणि त्याचे उत्तर देताना म्हणतात की, तो प्रकाश सूर्याचा नव्हता, तो सूर्य नव्हताच मुळी ते तर शिवराय होते. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर,

“सूर्य नव्हता शिवबा जन्मले। विश्व आनंदले।
गाऊ लागले। चराचर होऊन शिवबाचे भाट।
आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट। काढली शाहिरांनं त्यातूनच वाट।
अमर शाहीर शिवबाचा भाट। पोवाड्याच्या थाट।
ध्यानी तुम्ही घ्याहो। अहो राजे हो जि रं राजे रं जी जी।।”
स्वतःला शिवरायांचा भाट म्हणवून घेताना अमर शेख ह्यांना किती अभिमान वाटत असेल हे ह्यातून दिसते. पुढच्या चौकात शाहीर अमर शेख म्हणतात की, इंग्रज हे थपेबाज आहेत. त्यांनी चुकीचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. शिवरायांना डाकू म्हटलं आहे.
“इतिहासकार इंग्रजी। मुलुखाचे पाजी।
केली थपेबाजी। त्यांनी शिवबाला डाकू म्हटलं।।” 

असे म्हणत हे इंग्रज शिवरायांना का डाकू म्हणतात त्याचे ही कारण अमर शेख पुढे सांगतात. ते म्हणतात, इंग्रजांनी शिवकाळात सुरतला पहिली वखार घातली होती.

तिथून त्यांनी दिल्लीवर नजर रोखली होती आणि ही हालचाल महाराजांच्या ध्यानी आली म्हणूनच राजांनी इंग्रजांना झोडपायचे ठरवले होते. अमर शेख म्हणतात,

“धावती तराजुच्या बसुन काट्यावर। तिचं नव्हतं काही भागणार।
राज्य ती होती हाकणार। अवघ्या भारतावर।।
शिवबा हे द्रष्टे होते थोर। हेरलं त्यांनी सारं।
इंग्रज हे चोर। जळवा ह्या माझ्या वंशवेलिला।
मराठ्यांच्या शूर भावी पिढीला।। नाही तुडवायचं गुजराथ्याला।
तुडवायचं फक्त इंग्रजाला। तसंच मोगली सरदारांना।।” 

हे शब्द लिहून जणू अमर शेख शिवरायांचे मनोदय स्पष्ट करतात. गुजराती लोकांना हात न लावता इंग्रज व मोगलांना झोडपा हा आदेश सांगतो की महाराजांनी सुरत लुटली पण गुजराती बांधवांना नाही लुटले.

अमर शेख ह्यांनी आपल्या शब्दांमधून त्याच काळात हे गैर समज दूर केले होते. इंग्रजांना असे झोडपल्यामुळेच त्यांनी आपला इतिहास चुकीचा सांगितला हे ह्यातून स्पष्ट होते. शाहीर अमर शेख नंतर शिवरायांच्या पूर्वजांचे वर्णन करतात आणि शहाजी राजांचे वर्णन करताना ते म्हणतात,

“पेरावं तेच पीक येतं। जगाची रीत। नवं न्हाई त्यात।
शहाजीनं पराक्रम पेरला। शिवाजी सरजा अवतरला।।”

ह्यातून शिवरायांना स्वराज्य मंत्र देणारे शहाजी महाराज आहेत हेच अमर शेख सांगताय. शिवपूर्व काळातल्या महाराष्ट्राचे वर्णन करताना शाहीर म्हणतात की, जणू आई आणि मूल आडरानी अडकले आहे. त्यात जोराचा पाऊस व्हावा, वादळ सुटल्यामुळे जीव भयभीत व्हावा, तोच विजांचा कडकडाट व्हावा.

कुठून तरी वाघाच्या डरकाळीचा आवाज यावा आणि जीव फाटावा, वरून दगडांप्रमाणे गारांचा वर्षाव व्हावा, आश्रयासाठी एक गुहा दिसावी पण आत शिरताच डोंगर कोसळून खाली पडावा अशी काही अवस्था महाराष्ट्राची झाली होती. जी केवळ शिवरायांमुळे दूर झाली आणि महाराष्ट्र पुन्हा स्वतंत्र झाला.

शाहीर अमर शेख शिवरायांच्या मातापित्यांचे वर्णन करताना म्हणतात, जिजाऊंचे व शिवरायांचे कार्य गाताना ते म्हणतात,

“आला आला शिवाजी आला। अरुणोदय झाला।
लाल जनतेला। जिजाऊनं दिला योग्य वेळेला।
मराठ्यांनो करा रे जयजयकार। थोर त्या आईचे उपकार।
नाही रे नाही तुमच्यानं नाही फिटणारं जी जी जी जी….!”

महाराष्ट्राच्या इतिहासात शाहिरांचं मोलाचं योगदान आहे. त्यांनी जसं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात डफावरच्या थापेने ती आग पेरली तशीच शिवाजी महाराजांची कीर्ती सुद्धा जनमनात रुजवली.

शाहिरांच्या या कार्यामुळेच महाराजांचा लढा आजही कोणत्याही लढ्याला बळ देत असतो. शाहीर अमर शेखांना, त्यांच्या कलेला आणि अस्मिता, अभिमान जागृत करणाऱ्या त्यांच्या काव्याला आणि मनाचा मुजरा!

]]>
https://www.batmi.net/shivarais-powada-written-by-shaheer-amar-shaikh/feed/ 0 26171