Batmi Digital Team – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Sat, 30 Jul 2022 15:05:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg Batmi Digital Team – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 दिल्लीचे तख्त महाराष्ट्र असे राखतो… https://www.batmi.net/26147-2/ https://www.batmi.net/26147-2/#respond Sat, 30 Jul 2022 11:54:58 +0000 https://www.batmi.net/?p=26147 ‘भीमथडीच्या तट्टांना ह्या यमुनेचे पाणी पाजा, ‘जय जय महाराष्ट्र माझा हे राजा बढे ह्यांचे गीत आपण शाहीर साबळे ह्यांच्या स्वरात आजवर ऐकत आलेलो आहोत. हे गीत ऐकून आजही महाराष्ट्र धर्माचे मर्म आपल्या मनात जागृत होते. तसे हे गीत समजून घ्यायला सोपे आहे पण ह्यातल्या काही ओळी किंवा शब्द लवकर समजत नाहीत. भीमथडी म्हणजे काय? तट्टांना पाणी पाजावे म्हणजे काय? कोणाला नि कसे पाणी पाजायचे आहे? एकूणच ह्या गीताचा अर्थ काय? इतिहास, परंपरा नि भविष्य सारे काही ह्या गाण्यात आहे. कसे ते पाहुयात आजच्या लेखात.

“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा।
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी।
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी।
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा।
जय महाराष्ट्र माझा”

राजा बढे आपल्या या गीतामध्ये महाराष्ट्राचा जयजयकार करत आहेत. गर्जना करणाऱ्या महाराष्ट्राचा जयजयकार असो म्हणत ते सांगतायत. इथली विचारधारा इथला इतिहास, रेवा, वरदा, कृष्ण, कोयना सारख्या नद्या महाराष्ट्राला आजपर्यंत जगवत आल्या आहेत. इतक्या नद्या अर्थात इतकं वैविध्य असून देखील इथले लोक एकीचे पाणी भरतात.

जातीयवाद इथेच ठेचून पुरोगामी महाराष्ट्र इथले लोक घडवत आहे. आता वेळ आहे भीमथडीच्या तट्टांना यमुनेचे पाणी पाजण्याची. थडी म्हणजे किनारा आणि तट्ट म्हणजे घोडे. अरबी आणि तुर्की घोड्यांचे संकर्ण होऊन जे घोडे बनले त्यांना भीमा नदीच्या जवळ ठेवण्यात आले त्यांना तट्ट म्हणतात. तर भीमा नदीच्या किनारी असणाऱ्या मराठी घोड्यांना यमुनेचे पाणी पाजा.

पण मराठ्यांनी पूर्वी हेच केले. आज घोडे देखील नाही आणि तशी आवश्यकता देखील नाही. पण ह्या ओळी प्रतिकात्मक आहेत. खरा अर्थ हा आहे की आपल्यातील गुणवैशिष्ट्यांच्या जोरावर उत्तरेत जा. जगभर जा आणि मराठी विचार सर्वत्र प्रसारित करा. रामदास स्वामींच्या ओव्या अशाच स्वरूपाच्या आहेत.

“आहे तितुके जतन करावे। पुढे अधिक मेळवावे। महाराष्ट्र राज्याची करावे जिकडे तिकडे।।”

हाच विचार ह्या गीतातल्या ओळींमधून दिसतो. यमुना नदी केवळ प्रतिकात्मक असून महाराष्ट्र धर्म आता जगात पोहोचवण्याची वेळ आहे असा सल्ला राजा बढे ह्यांनी दिला आहे.

“भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा।
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा।।
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा।
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा।।”

आता महाराष्ट्रातल्या लोकांचे वर्णन करताना कवी म्हणतात, आम्हाला गडगडणाऱ्या नभाची भीती नाहीच. पण अस्मानी सुलतान अर्थात प्रचंड मोठे सैन्य आणि साम्राज्य असणाऱ्या सुलतानांची देखील आम्हाला भीती नाही. वेळ पडलीच तर आम्ही त्यांना आमच्या ह्या तिखट जिभांनी उत्तर देऊ. इथे शिवरायांनी औरंगजेबाला भर दरबारात नामोहरम केले होते हाच आदर्श कवीने मांडला आहे. म्हणून तर सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा असं म्हटलं आहे. आणि आता वेळ आहे महाराष्ट्रातील मराठ्यांनी दरीदरीतून एकच नाद करण्याची. तो नाद म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा.

“काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी।
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी।
दारिद्र्याच्या उन्हात शिजला। निढ़ळाच्या घामाने भिजला।
देशगौरवासाठी झिजला। दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा।।”

ह्यात देखील महाराष्ट्राचे वर्णन केलेले आहे. काळी छाती आणि त्यावरची लेणी म्हणताच वेरूळच्या लेण्या पुढे उभ्या राहतात. इथल्या लोकांचे पोलादी मनगट जीवघेणे खेळ खेळतात. अर्थात धाडसी लोक इथे जन्मला आले. पण पुढे कवीने महाराष्ट्राची सद्य:स्थिती सांगितली आहे. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, कपाळावरील घामाने भिजला असा हा कष्टकरी महाराष्ट्र! तरीही देशाच्या गौरवासाठी झिजला. इतके होऊनही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत दिल्लीचे तख्त राखणारा हाच आमचा महाराष्ट्र आहे.

ह्या गीतात जणू कवीने आपल्याला सल्लाच दिला आहे की ह्या दारिद्र्याच्या उन्हातून आता समाधानाच्या नि सुखाच्या सावलीत बसायचे असेल तर आपण भीमथडीच्या तट्टांना यमुनेचे पाणी पाजलेच पाहिजे, शिवशंभू राजप्रमाणे अस्मानी सुलतानांना आपल्या जिभांनी उत्तर दिलेच पाहिजे. गर्जना ही झालीच पाहिजे.

तेव्हा कुठे दिल्लीचे तख्त मराठी मताने चालेल. दिल्लीचे तख्त मराठी मतानेच का चालावे असा प्रश्न पडला असेल तर हे ध्यानी घ्यावे लागेल की हिमालयाच्या मदतीसाठी नेहमी आणि नेहमीच सह्याद्री धावून जातो. त्यामुळेच अभिमानाने म्हणावेसे वाटते जय जय महाराष्ट्र माझा.

]]>
https://www.batmi.net/26147-2/feed/ 0 26147
अशी बंद केली शंभू राजांनी गुलाम विक्रीची पद्धत… https://www.batmi.net/%e0%a4%85%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a6-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%82%e0%a4%ad%e0%a5%82-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80/ https://www.batmi.net/%e0%a4%85%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a6-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%82%e0%a4%ad%e0%a5%82-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80/#respond Sat, 30 Jul 2022 11:47:11 +0000 https://www.batmi.net/?p=26144 संभाजी राजे म्हणताच धाडस, पराक्रम, शौर्य असे गुण पुढे दिसतात. आबासाहेबांचे जे संकल्पित तेच आम्हास करणे अगत्य अर्थात शिवरायांनी जो मार्ग दाखवला तेच आम्ही करू असे संभाजी महाराज म्हणतात. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या पातशाह्यांविरुद्ध शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केले तेच संभाजी राजांनी पुढे चालवले. त्यातलाच एक किस्सा म्हणजे संभाजी राजांनी केलेली गुलामांची सुटका. मानवतेचे दर्शन घडवणारे शंभूराजे कसे होते हे पाहुयात आजच्या लेखात.

स्वराज्यात अनेक कष्टकरी होते पण त्यांच्या घामाला आणि अश्रूंना किंमत नव्हती. कारण ते गुलाम होते. शंभूराजांनी त्यांच्या मालकांकडून त्यांना विकत घेतले आणि त्यांना मुक्त केले. त्याचे झाले असे की सिद्दीकडे असणारा जंजिरा किल्ला शिवरायांना जिंकायचा होता.

पण ते शक्य झाले नाही. संभाजी महाराजांनी जेव्हा ही मोहीम हाती घेतली तेव्हा एक सूत्र त्यांनी ध्यानी घेतले, ते म्हणजे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. ह्याच तत्वावर संभाजी राजांनी अरबी लोकांसोबत मैत्री करायचे ठरवले. जंगे-ए-खान हा अरबी सैन्याचा सेनाधीश. त्याला बोलावून शंभूराजांनी ह्या मोहिमेस सुरुवात केली होती. जंजिऱ्याच्या सिद्द्यांना हरवायचे म्हणजे उत्तम नाव, होड्या, जहाज, गलबते लागणार.

शिवाय जहाजांवर नवीन तोफा हव्यात, तसेच जहावरून उत्तम बाण मारणे, भाला फेक करणे असे प्रशिक्षण मावळ्यांना देणे गरजेचे होते. ह्या अरबी लोकांना गलबताचे चांगले ज्ञान होते. त्यासाठी ह्या जंग-ए-खानाला संभाजी राजांनी बोलावले होते. तो आला तेव्हा त्याची भेट घेऊन शंभूराजांनी त्याच्या जवळ असणारी जहाजे पाहण्याचे ठरवले.

त्याने देखील राजांना जहाजं दाखवली. आतील बाजूस कसे समान ठेवावे, कुठे काय असावे, तोफा कशा ठेवाव्यात ह्या विषयी चर्चा चालू असताना संभाजी राजांची नजर एका कोपऱ्यात गेली. तिथे काही लोक बसले होते. त्यांचे हात सुताने बांधलेले होते.

संभाजी राजांनी जंग-ए-खानाला विचारता त्याने सांगितले की हे तर गुलाम आहेत. हे ऐकताच संभाजी राजांनी जंग-ए-खानाला आदेश दिला ह्यांना आधी सोडावे. गुलामगिरी आम्हास मान्य नाही. हे लोक घाम गाळून काम करतात आणि त्याचा मोबदला देखील तुम्ही त्यांना देत नाही.

जंग-ए-खानाने ही गुलाम मंडळी दुसरीकडून विकत घेतली होती. त्यासाठी त्याने त्याचे पैसे खर्च केले होते. आता ह्या गुलामांना कसे सोडावे हा विचार तो करत होता. तोच शंभूराजांनी त्याच्याकडून सारे गुलाम विकत घेतले आणि त्यांना मुक्त केले.

माणुसकीला काळिमा फासणारी पद्धत स्वराज्याची नाही असे म्हणत संभाजी राजांनी साऱ्यांना सोडून दिले. हे सिद्दी, सामान्य लोकांना समुद्री मार्गाने पळवून नेतात पुढे इंग्रजांना विकतात आणि ही इंग्रज मंडळी हेच लोक गुलाम म्हणून परदेशी विकतात. ही साखळी आता शंभुराजांना मोडून काढायची होती.

संभाजी राजांनी असेच एकदा इंग्रजांसोबत तह करून गुलामांची सुटका केली होती. २६ एप्रिल १६८४ ला राजांनी इंग्रजांसोबत तह करत गुलामांना सोडवले होते. न सोडल्यास दंड आकारण्याची भाषा केली होती. ‘इतकेच असेल तर तुमच्या देशातून गुलाम आणावेत,’ असे बोल शंभूराजांनी त्यांना सुनावले होते.

शिवरायांनी देखील गुलाम विक्रीला विरोध केला होता. तोच विरोध आता संभाजी राजे करत होते. नुसता विरोध नाही तर संभाजी राजांनी कायदा केला होता. स्वराज्यात गुलाम विक्री खरेदीवर बंदी होती. लहान मुलांकडून काम करून घेण्यास मनाई होती. ह्या सर्व गोष्टी बघता शंभुराजांना गुलाम विक्री विरुद्ध किती चीड होती हे कळते.

ह्यामुळेच स्वराज्यात गुलामांची कधीही खरेदी विक्री होत नव्हती. शिवरायांनी व संभाजी राजांनी ती कधी होऊ दिली नाही. असे होते माणुसकी धर्म पाळणारे मानवतावादी शंभूराजे. ही कथा वाचून तुमच्या मनात असलेला शंभू राजांविषयीचा आदर द्विगुणीत झाला असेल ना! काय वाटलं नेमकं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

]]>
https://www.batmi.net/%e0%a4%85%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a6-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%82%e0%a4%ad%e0%a5%82-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80/feed/ 0 26144
भारतावर या ‘तीन’ साम्राज्यांचा होता एकछत्री अंमल! https://www.batmi.net/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c/ https://www.batmi.net/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c/#respond Sat, 30 Jul 2022 11:41:19 +0000 https://www.batmi.net/?p=26141 भारत एक अतिप्राचीन संस्कृती असलेला देश. भारताचे वैशिष्ट्य त्याच्या वैविध्यात आहे. एक परंपरा, एक भाषा, एक सण, एकच देव, एक रंग, एक पद्धत ह्या देशात नाही. ह्या वैविध्यामुळे इथे राज्य करणारे राजे देखील अनेक होऊन गेले. एक हाती सत्ता किंवा एकछत्री साम्राज्य क्वचितच ह्या देशात टिकले. इंग्रज आणि मोगलांनी भारतावर राज्य केलेच परंतु असे कोणते एतद्देशीय साम्राज्य होते ज्यांची भारतावर एकछत्री सत्ता राहिली ते पाहुया आजच्या लेखात.

१) मौर्य साम्राज्य :

मौर्य साम्राज्य हे चंद्रगुप्त मौर्य ह्यांनी स्थापन केले होते. साधारण ३२५ ते १८५ इसविसन पूर्व हा ह्या साम्राज्याचा काळ होता. नंद साम्राज्यामध्ये वाढणाऱ्या भ्रष्टाचाराला उत्तर देण्यासाठी चाणक्यांनी हे व्रत हाती घेतले होते. त्यांच्याच मार्गदर्शनात चंद्रगुप्त मौर्य ह्यांनी हे राज्य स्थापन केले. चाणक्यांची नीती आणि चंद्रगुप्ताचे सामर्थ्य ह्या साम्राज्यात होते.

पाटलीपुत्रला राजधानी बनवत हे राज्य निर्माण झाले होते. हेच पाटलीपुत्र आज आपण पटना म्हणून ओळखतो. बंगालपासून सौराष्ट्रापर्यंत आणि पाकिस्तान अफगाणिस्तान पासून आंध्र प्रदेश पर्यंत हे साम्राज्य विस्तारले होते. ह्या साम्राज्यातले चंद्रगुप्त, बिंदूसार आणि अशोक हे सम्राट प्रसिद्ध आहेत. धर्माचा विचार करता चंद्रगुप्ताने जैन धर्म स्वीकारला व अशोकाने बौद्ध धम्म स्वीकारला.

त्याच पद्धतीने ह्या राज्याचा स्तूप, लेण्या, विहार बांधण्यात आली. ह्या राज्याची प्रशासन पद्धत केंद्रीय पद्धतीची होती. अर्थात सारे सूत्र राजाकडून हलायचे. राज्यात कर अत्यंत जास्त प्रमाणात लावला गेला होता. मौर्य साम्राज्याचा व्यापार हा बाहेरच्या राज्यात देखील चालायचा. इतके महान असणारे हे साम्राज्य अंर्तकलहामुळे अस्ताला गेले. भ्रष्ट्राचारामुळेच हे राज्य संपले.

२) गुप्त साम्राज्य :

श्री चंद्रगुप्त ह्यांनी स्थापन केलेले हे गुप्त साम्राज्य इसविसन ३२० ते ५५० पर्यंत भारतात राहिले. ह्या राज्याची वैशिष्ट्ये होती कला, चित्र, साहित्य, विज्ञान इत्यादी विषयांमधील प्रगती. संस्कृत भाषेवर प्रभुत्व असणारे कालिदास ह्याच काळात होऊन गेले. जसा मौर्य साम्राज्यात बौद्ध धम्माचा प्रचार झाला तसा गुप्त साम्राज्यात हिंदू धर्म मोठा झाला.

मथुरा सारखी अनेक मंदिरे ह्या काळात बांधण्यात आली. मौर्यांच्या तुलनेत हे साम्राज्य कमी काळ होते. अर्थात सीमाभाग कमी असलेले हे साम्राज्य होते. तसेच ह्यांचे प्रशासन हे केंद्रीय नसून विभागलेले होते. जनतेकडून कर देखील कमी आकारण्यात यायचा. ह्या साम्राज्याचा व्यापार तसा भारतापुरताच मर्यादित राहिला. अखेर हे साम्राज्य बाहेरील आक्रमणामुळे अस्ताला गेले.

३) मराठा साम्राज्य :

छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी स्थापन केलले स्वराज्य ६ जून १६७४ ला सार्वभौम साम्राज्य झाले. पुढे संभाजी महाराजांनी इथे राज्य केले. राजाराम महाराजांनंतर शाहू महाराज छत्रपती झाले आणि तेव्हा पेशवाईचा उदय झाला. पेशवेपद आधीपासून होते पण बाजीरावांपासून पेशवाई मोठी झाली असे म्हणता येईल. हे साम्राज्य १८१८ पर्यंत राहिले.

हिंदू धर्म ह्या साम्राज्यामध्ये दिसला. शिवाय ह्या साम्राज्यात केंद्रीय व विभागीय अशा दोन्ही पद्धती दिसतात. छत्रपती हेच साम्राज्याचे मालक होते. पण तरी पुण्यात पेशवे, इंदोरला होळकर, ग्वाल्हेरला शिंदे असे हे साम्राज्य विस्तारले होते.

कर प्रणाली तशी पेशव्यांच्या काळात बरी होती पण इतर प्रांतातून गोळा केलेल्या चौथाईमुळे पानिपतावर मराठ्यांसाठी कोणीच धावून गेले नाही. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात ह्या साम्राज्यात जातीयवाद अत्यंत टोकाला गेला. अंतर्कलह चालूच होते पण इंग्रजांचे देखील संकट ह्या साम्राज्यावर कोसळले. १८१८ ला हे साम्राज्य अस्ताला गेले.

अशी ही काही महत्त्वाची साम्राज्ये भारतात होऊन गेली. या व्यतिरिक्त अनेक साम्राज्ये उत्तर आणि दक्षिणेत झाली. पण ती साम्राज्ये एका विशिष्ट भूमर्यादे पलीकडे पोहोचली नाहीत. तुम्हाला अशा कोणत्या साम्राज्याविषयी माहिती असल्यास आम्हाला नक्की कमेंट करून सांगा.

]]>
https://www.batmi.net/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c/feed/ 0 26141
स्वराज्य बांधणीत शिवरायांच्या ८ विवाहांचे योगदान काय? https://www.batmi.net/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be/ https://www.batmi.net/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be/#respond Sat, 30 Jul 2022 11:35:22 +0000 https://www.batmi.net/?p=26138 शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही विचार करून केलेली असायची. उगीच स्वतःच्या आनंदासाठी महाराजांनी एकही क्षण व्यतीत केला नसेल. शिवराय जरी सिंहासनाधिष्ठित झाले असले आणि रयत त्यांची लेकरं असली तरी त्यांनी कधीही स्वतःच्या परिवाराकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही.

शिवरायांचे आठ विवाह झाले होते, हे आपण जाणतोच पण ही गोष्ट देखील अत्यंत विचार करून जिजाऊंनी आणि शिवरायांनी केली होती. आजच्या लेखात आपण शिवरायांच्या आठ विवाहांमागील कारणं आणि अर्थ जाणून घेणार आहोत.

हे विवाह मराठी सरदारांना एकत्र आणण्यासाठी केले होते, हे आपल्याला माहिती असेल मात्र ह्याचा योग्य परिणाम झाला का, इतके विवाह करून शिवरायांना आणि स्वराज्याला काय प्राप्त झाले, हे जाणून घेऊ आजच्या लेखात.

जिजाऊंनी शहाजी राजांच्या बरोबरीने ह्या स्वराज्याचा विचार केला होता. पण शहाजी राजांना त्रास झाला तो आप्त स्वकीयांमुळेच. मराठे एकत्र राहिले असते तर कदाचित आपण पारतंत्र्यात अडकलोच नसतो हे जिजाऊंना कळले होते. म्हणूनच शिवरायांकडून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्याआधी जिजाऊंनी मराठी सरदारांना एकत्र आणायला सुरुवात केली होती.

काही मंडळी एकत्र तर यायची पण अडीअडचणीच्या काळी शत्रूला सामील व्हायची. शिवाय ह्या प्रत्येक सरदाराच्या मनगटीत जोर होता. गरज होती ती केवळ एकीची. आणि ती एकी झाली शिवरायांच्या विवाहाच्या निमित्ताने.

एकदा का एखाद्या सरदाराची मुलगी आपली सून झाली की, ते घराणे स्वराज्याच्या विरोधात जाणार नाही, सर्व मतभेद सोडून ही मंडळी स्वराज्यासाठी एकत्र येतील, हाच उद्देश समोर ठेऊन जिजाऊंनी शिवरायांचा पहिला विवाह ‘सईबाई’ ह्यांच्या सोबत लावला.

फलटणच्या निंबाळकर घराण्यासोबत जोडलेले हे संबंध नवीन नव्हते. जिजाऊंच्या सासूबाई ‘दीपाऊ’ आणि आई ‘म्हाळसाबाई’ ह्या दोघी निंबाळकर घराण्यातील होत्या. जरी सईबाई ह्यांचे बंधु बजाजी आदिलशाहीत होते तरी नंतर त्यांनी स्वराज्यासाठी मोहीमा केल्याचे इतिहासकार सांगतात.

शिवाजी महाराजांचा पहिला विवाह बघता आला नाही म्हणून शहाजी राजांनी शिवरायांचा दूसरा विवाह बंगळूरला आपल्या दुसऱ्या पत्नी तुकाबाई ह्यांच्या भावाच्या मुलीशी अर्थात ‘सोयराबाई’ ह्यांच्या सोबत लावला. ह्या मोहिते घराण्यातील होत्या.

या घराण्यामुळे स्वराज्याला ‘हंबीरराव मोहिते’ व ‘महाराणी ताराबाई साहेब’ लाभल्या. पुढे शिवरायांचा विवाह पालकर घराण्यातील पुतळाबाई ह्यांच्या सोबत झाला. पुतळाबाई ह्यांचे काका म्हणजेच नेतोजी पालकर. ज्यांची ओळख प्रती शिवाजी अशी होती. नेतोजी स्वराज्याचे सेनापती होते. ह्यावरूनच समजते की जिजाऊंनी जो लोकांना संघटित करण्याचा विचार केला होता तो योग्य होता.

शिवाजी महाराजांचा विवाह नंतर शिर्के घराण्यातील ‘सगुणाबाई’ ह्यांच्या सोबत झाला. हे शिर्के घराणे अत्यंत नामवंत होते. जेव्हा अल्लाउद्दीन अजमशाने मलिक तूज्जार ह्या आपल्या माणसाला विशाळगड घेण्यास पाठवले तेव्हा दक्षिणीत शिर्के आणि मोरे राज्य करीत होते.

ह्या शिर्क्यांनी मलिक तूज्जारच्या सैन्याला सह्याद्रीच्या जंगलामध्ये गनिमी कावा करत हरवले. अर्थात अत्यंत हुशार असणारे हे घराणे स्वराज्याच्या सेवेत रुजू झाले होते. शंभूराजांच्या पत्नी ‘महाराणी येसुबाई’ ह्या देखील शिर्के घराण्यातील होत्या. शिवाजी महाराजांनी नंतर गुप्त मोहिमेदरम्यान विचारे घराण्यातील ‘लक्ष्मीबाई’ ह्यांच्या सोबत विवाह केला. लक्ष्मीबाई ह्यांचे बंधु पुढे शिवरायांकरीता पावनखिंडीत धारातीर्थी पडले.

जिजाऊ मासाहेबांनी नंतर शिवरायांचा विवाह नामवंत असणाऱ्या गायकवाड घराण्यातील ‘सकवारबाई’ ह्यांच्या सोबत लावला. गायकवाड घराणे अत्यंत इमानदार होते. प्रतापगडी जेव्हा शिवरायांची अफजलखानासोबत भेट झाली तेव्हा दहा अंगरक्षकांपैकी एक सकवारबाई ह्यांचे बंधु नांदोजीराव गायकवाड होते.

अगदी ह्याच प्रमाणे इंगळे घराणे होते. हे घराने तसे तंजावरचे होते. पण जिजाऊंसोबत ते वऱ्हाडला आले होते. आदिलशाहीत अत्यंत महत्वाच्या पदावर इंगळे सरदार होते. ‘गुणवंतीबाई इंगळे’ ह्यांच्या सोबत राजांचा विवाह झाला होता. गुणवंतीबाई ह्यांचे बंधु कात्याजी इंगळे अफजलखान प्रसंगी राजांचे अंगरक्षक होते.

तसेच शिवरायांनी केलेल्या पहिल्या लढाईत शिवाजी इंगळे हे इंगळे घराण्यातील सरदार कामी आले होते. रूस्तम-ए-जमान व फाजल खान स्वराज्यावर चालून आले तेव्हा हिरोजी इंगळे राजांसोबत होते. तसेच पन्हाळगडावर त्र्यंबकजी इंगळे किल्लेदार होते आणि यांच्या सोबतीला बाळाजी व कान्होजी इंगळे होते.

शिवरायांनी आणखी एक विवाह केला तो जाधव घराण्यातील काशीबाई ह्यांच्या सोबत. जिजाऊ स्वतः जाधव घराण्यातील होत्या. पण हे नाते आणखी पक्के व्हावे ह्या हेतूने ही सोयरीक झाली होती. काशीबाई ह्यांचे बंधु देखील पावनखिंडीत शिवरायांसाठी धारातीर्थी पडले होते.

असे हे घराणे व त्या घराण्यातील आप्तेष्ठ मंडळी स्वराज्यासाठी कामी आली. पुढे देखील शिवरायांनी आपल्या मुलामुलींचा विवाह ह्याच घराण्यात लावला. हेच शंभुराजांनी केले. ह्याच साथीमुळे स्वराज्य निर्माण झाले व त्याचे रक्षण देखील ह्याच लोकांनी केले.

]]>
https://www.batmi.net/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be/feed/ 0 26138
शंभूराजे – दिलेरखानाची मैत्री होती एक राजकीय चाल! https://www.batmi.net/%e0%a4%b6%e0%a4%82%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%88/ https://www.batmi.net/%e0%a4%b6%e0%a4%82%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%88/#respond Sat, 30 Jul 2022 11:31:32 +0000 https://www.batmi.net/?p=26135 दिलेरखानाला संभाजी महाराज जाऊन मिळाले होते, हे जवळपास सर्वांनाच माहिती आहे. पण ह्या भेटीमागचे राजकारण काय होते? शंभुराजे खरोखर चिडून दिलेरखानाला जाऊन मिळाले होते की त्यामागे ही स्वराज्य हित होते? आजच्या लेखात ह्या दिलेरखान भेटीमागच्या राजकारणावर आपण प्रकाश टाकणार आहोत. ही भेट स्वराज्य हिताची कशी ठरली ते पाहुयात.

ह्या घटनेची पार्श्वभूमी आपल्याला सर्वप्रथम समजून घ्यावी लागेल. रायगडावर जेव्हा मंत्रीमंडळाने निर्णय घेत शंभुराजांना लांब ठेवण्यास शिवाजी महाराजांना सांगितले तेव्हा स्वतः शिवाजी महाराजांनी शंभुराजांना श्रुंगारपूरला पाठवले होते. आता शिवरायांनी मंत्र्यांचे ऐकून नाही तर एका मोठ्या मोहिमेसाठी शंभुराजांना श्रुंगारपूरला पाठवले होते.

पण ही पाठवणी सरळ पद्धतीने न होता भांडण करून झाली. अर्थात हे नाटक होते. शंभुराजे आणि शिवराय भांडले म्हणजे सर्वांनाच त्या गोष्टीचे गांभीर्य लक्षात येणार होते. शिवराय आणि शंभूराजे यांच्यात हा तथाकथित बेबनाव झाला आणि शंभुराजे आपल्या सासुरवाडीला अर्थात श्रुंगारपूरला आले.

नंतर शिवराय देखील दक्षिण दिग्विजयासाठी दक्षिणेत गेले. आता इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की औरंगजेबाने आपल्या दिलेरखान नामक सरदाराला दक्षिणेत पाठवले होते. ह्याला काहीही करून थांबवणे महत्वाचे होते. इथूनच सुरू झाला गनिमी कावा..!

संभाजी महाराज श्रुंगारपूरला असताना दिलेरखानाचे त्यांना पत्र आले. अत्यंत मैत्रीपूर्वक लिहिलेले ते पत्र शंभुराजांना विनवित होते की, “राजे तुम्ही आम्हाला सामील व्हा आम्ही तुमचा योग्य आदर सत्कार करू. तुम्हाला होणारे त्रास इथे कमी होतील.” हे पत्र आले पण शंभुराजांनी पत्राकडे दुर्लक्ष केले. नंतर अनेक पत्रं येऊ लागली अखेर शंभुराजांनी ह्या मैत्रीला धुडकावले.

पण दिलेरखानाला काहीही करून शंभूराजांना आपल्या बाजूने वळवून घ्यायचे होते. नंतर काही दिवसांनी शंभूराजांनी कलशाभिषेक करवून घेतला. शिवरायांच्या निरोगी व सुखी आयुष्यासाठी हा शाक्त पद्धतीचा अभिषेक शंभूराजांनी केला होता. हा अभिषेक मंत्र्यांना सहन झाला नाही. त्यांनी शिवरायांना पत्र धाडले. शंभुराजे स्वतःचा राजाभिषेक करवून घेतायत अशी अफवा पसरवली.

नंतर शंभुराजांनी तरुणांसाठी आखाडे उभे केले तर त्यांच्यावर फौज उभी केल्याचा आरोप झाला. दिलेरखानही हे सारे पाहत होता. त्याने पुन्हा पत्र धाडले तेव्हा शंभूराजांनी त्यास स्पष्ट सांगितले की, “आमचे आबासाहेब परमुलुखी असल्याने आम्ही येऊ शकणार नाही, तुमच्या मैत्रीबाबत आम्ही नंतर नक्की विचार करू.”

शिवराय नंतर महाराष्ट्रात आले. आता शंभुराजांची भेट घेण्याऐवजी शिवरायांनी शंभुराजांना थेट सज्जनगडावर जाण्यास सांगितले. तिथे रामदास स्वामी नव्हते. त्यामुळे शंभुराजांना सुधारण्यासाठी इथे पाठवले होते हे म्हणणं म्हणजे मूर्खपणा आहे. आता शिवराय महाराष्ट्रात आले म्हटल्यावर दिलेरखान आणि विजापूरचे सिद्दी मसूद व सर्जा खान एकत्र येणार होते हे स्पष्ट होते.

हे एकमेकांना सामील झाले तर स्वराज्याला धोका होता. आताच दक्षिणेतील युद्धाने थकून आलेले सैनिक कसा सामना करणार होते. ह्याचाच विचार करता शिवरायांनी हे राजकारण केले होते. आता हे स्पष्ट आहे की शंभूराजांना मोगलांना सामील व्हायचेच होते तर शिवराय दक्षिणेत असतांनाच व्हायला पाहिजे होते.

अखेर संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या गुप्त आदेशानुसार दिलेरखानाला सामील झाले. तिथे शंभूराजे असल्यामुळे दिलेरखान आणि सिद्दी मसूदची होणारी मैत्री होता होता राहिली. ज्याचा फायदा स्वराज्याला झाला. पुढे संभाजी राजांना ह्या दिलेरखानाने बहादूर गडावर ठेवले. अकरा महिने झाले तरी हाती काहीही लागत नाही म्हटल्यावर औरंगजेबाने दिलेरखानाला जाब विचारला. तेव्हा मात्र शंभुराजांना स्वराज्यावर हल्ला करावा लागला.

भुपालगड जिंकून शंभूराजांनी दिलेरखानास दिला. जो मराठ्यांनी पुन्हा १४ दिवसात जिंकला. असे चाललेले पाहून औरंगजेबाने शंभुराजांना कैद करण्याचे फरमान धाडले. तेव्हा शिवरायांनी शंभुराजांची तिथून सुटका करवून घेतली. आता शंभूराजे जर फितूर झाले असते तर शिवरायांनी त्यांना सोडवले असते का? त्यात नंतर शिवरायांनी शंभुराजांची भेट देखील घेतली होती. जो राजा फितुरांना शासन करतो.

ज्याच्या न्यायव्यवस्थेसमोर नातीगोती गृहीत धरली जात नाही. तो राजा शंभुराजांना केवळ मुलगा म्हणून माफ कसा करेल? त्यात शिवरायांना राजाराम नावाचे दुसरे पुत्र होते. मग शंभुराजांना जवळ करण्याचे कारण काय? ह्याचे उत्तर एकच की शंभुराजे फितूर नव्हतेच ते केवळ एक राजकारण होते.

मावळ्यांना आराम मिळवा, सिद्दी मसूदची आणि दिलेरखानाची मैत्री तोडावी आणि औरंगजेबाचा मुलगा शाहआलम यास फितूर करणे हाच ह्या राजकारणाचा उद्देश होता. आता जे संभाजी महाराज दिलेरखानाला फितूर झाले ते लगेच दहा वर्षांनी इतके महान बलिदान कसे देतील? असे काही प्रश्न स्पष्टपणे ह्या राजकारणाची कोडी उलगडण्यास मदत करतात.

अशीच खेळी शिवरायांनी नेतोजी पालकरांना खेळायला लावली होती. अगदी तेच शिवरायांनी शंभुराजांना करायला लावले होते. पण इतिहासकारांनी अनेक घटनांचा विपर्यास केला. शंभूराजांवर अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. अस्तित्वात नसलेल्या बायका देखील काही कारस्थानी इतिहासकारांनी उभ्या करून त्यांच्यावरून शंभूराजांच्या शीलावर शिंतोडे उडवले गेले.

मात्र त्यांच्या विरोधात खेळलेली खेळी लवकरच लक्षात आली आणि शंभुराजे प्रत्येक आरोपातून निर्दोष मुक्त होत गेले. शिवरायांनीही आपल्या या मुलावर विश्वासाने स्वराज्याची मोठी भिस्त ठेवली. शंभूराजांनी ती निष्ठेने पार पाडली. म्हणून तर संभाजी महाराज स्वराज्य रक्षक ठरले.

]]>
https://www.batmi.net/%e0%a4%b6%e0%a4%82%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%88/feed/ 0 26135
कोण होते क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल? https://www.batmi.net/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a3-%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%95-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae/ https://www.batmi.net/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a3-%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%95-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae/#respond Sat, 30 Jul 2022 11:22:11 +0000 https://www.batmi.net/?p=26127 रामप्रसाद बिस्मिल म्हणजे शस्त्रातला तिखटपणा आणि लेखणीतला प्रेमळगंध. अर्थात हे प्रेम भारतमातेसाठी. हा तिखटपणा देखील भारताच्या संरक्षणासाठी नि स्वातंत्र्यासाठी. इंग्रजांनी अनेक क्रांतीकारकांना फाशीची शिक्षा दिली त्यातलेच एक रामप्रसाद बिस्मिल होते. सशस्त्र मार्ग निवडत त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. आज ११ जून त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्यकाळाबद्दल, कर्तृत्वाबद्दल आपण जाणून घेऊयात.

रामप्रसाद बिस्मिल ह्यांचा जन्म उत्तर भारतातील शाहजहानपूरमध्ये ११ जून १८९७ रोजी झाला. मूलमती आणि मुरलीधर तोमर हे रामप्रसाद ह्यांचे आईवडील होते. तोमर हे राजपुतांमधील खानदानी घराणे होते. रामप्रसाद ह्यांचे लहानपण खेळण्याच्या बाबतीत इतर मुलांसारखे गेले असले तरी शिक्षणाबाबतीत त्यांचे आयुष्य थोडे वेगळे होते.

त्यांच्या वडिलांना हिंदी येत असल्यामुळे रामप्रसाद हिंदी भाषा चटकन शिकले. तसेच त्यांच्या वडिलांनी त्यांना एका मौलवीकडे उर्दू शिकण्यास पाठवले. लहानपणी त्यांना ह्या दोन भाषा अवगत होतायत तोच त्यांच्या वडिलांनी त्यांना इंग्रजी माध्यमातील शाळेत घातले.

अर्थात वडिलांच्या कृपेने रामप्रसाद ह्यांची ओळख अनेक भाषांसोबत झाली. ज्याचे फळ असे की रामप्रसाद उत्तम कविता लिहू लागले. रामप्रसाद ह्यांना लहानपणी आणखी एक गोडी लागली ती म्हणजे आर्य समाजाची. आर्य समाजातील विचार, त्यांचे आचरण आणि मंदिर इत्यादी गोष्टी रामप्रसादांना आवडू लागल्या होत्या.

त्यांच्या आयुष्याला मोठे वळण लाभले ते सोमदेव ह्यांच्या भेटीनंतरच. एकदा रामप्रसाद आर्य समाजातील मंदिरात गेले असता तिथे स्वामी सोमदेव बोलत होते. त्यांच्या मुखातून देशभक्ती विषयी वाक्य बाहेर पडत होते. इंग्रजांनी केलेले अत्याचार ते सांगत होते.

त्यांनी सद्य:स्थिती बद्दल बोलायला सुरुवात केली आणि रामप्रसाद ह्यांची देशभक्ती वाढू लागली. आपल्याकडील लिखाणाचा आपल्या देशाला फायदा व्हावा असे रामप्रसाद ह्यांना वाटू लागले. तसेच कधी काळी वेळ पडली तर हाती शस्त्र देखील घेता आले पाहिजे म्हणून त्यांनी सशस्त्र क्रांतिकारकांच्या भेटी घेतल्या.

त्यांच्या आयुष्यात ‘मणिपुरी चा कट’ हा अत्यंत महत्वाचा प्रसंग ठरला होता. त्यांनी अनेक क्रांतिकरांच्या भेटी घ्यायला सुरुवात केली होती. तेव्हा त्यांची भेट झाली गेंदालाल दीक्षित ह्यांच्याशी. गेंदालाल दीक्षित हे देखील मोठे क्रांतिकारक असल्याने त्यांच्या विचारांचा प्रभाव रामप्रसाद ह्यांच्यावर पडलेला आपल्याला दिसतो. गेंदालाल दीक्षित ह्यांनी निर्माण केलेल्या सशस्त्र क्रांतिकारकांच्या ‘शिवाजी समिती’ मध्ये रामप्रसाद सामील झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन गेंदालाल ह्यांनी ही समिती निर्माण केली होती. त्याच दरम्यान रामप्रसाद ह्यांनी काही पत्रिकांचे वाटप सम्पूर्ण मणिपुरी गावात केले. ‘देशवासीयो के नाम संदेश’ असे शीर्षक त्या पत्रिकेवर होते. त्यात रामप्रसाद ह्यांनी लिहिलेली ‘मणिपुरी प्रतिज्ञा’ नावाची कविता देखील होती. इंग्रजांनी आता भारत सोडून निघून जावे अन्यथा आम्ही त्यांना सहकार्य करणार नाही. शिवाय शास्त्राच्या बळावर आमचा देश पुन्हा मिळवू अशी कविता आता जनसामान्यांपर्यंत पोहोचली होती. तेव्हाच रामप्रसाद ह्यांनी मणिपूर इथे मोठी लूट मिळवली होती.

त्यावेळेस क्रांतिकारक मंडळी अशी लूट मिळवायचे आणि तोच पैसा देशहितासाठी वापरायचे. ज्यांनी इतरांचा देश चोरला होता ते इंग्रज ह्या कामाला चोरी म्हणायचे. रामप्रसाद ह्यांना पुन्हा एक लूट करायची होती, पण इंग्रजांना ह्या गोष्टीची खबर लागली होती. एक दिवस अचानक छापा मारून इंग्रजांनी क्रांतीकारकांना पकडायचे ठरवले. रामप्रसाद, गेंदालाल दीक्षित ही मंडळी वेष बदलून गावामध्ये पुस्तके विकत होती. पण इंग्रजांना हे समजले होते.

त्यांनी गोळीबार सुरू केला. आणि म्हणता म्हणता अनेक लोक मारले गेले. काही जण पळू लागले. रामप्रसाद ह्यांचा पाठलाग करत इंग्रज यमुना नदीपर्यंत पोहोचले होते. रामप्रसाद ह्यांनी नदीत उडी मारली आणि तिथून ते निसटले. रामप्रसाद ह्यांचा मृत्यू झाला असे समजत इंग्रज माघारी फिरले. गेंदालाल ह्यांना आग्र्याच्या किल्ल्यात ठेवण्यात आले जिथून ते निसटले. म्हणूनच ह्याला मणिपुरी कट म्हणण्यात येते.

यानंतर रामप्रसाद हे उत्तर प्रदेश मधील काही गावात अज्ञातपणे आपल्याच कवितेची पुस्तके विकू लागले. देशातील लोकांपर्यंत त्यांचे विचार कवितेच्या मार्फत पोहोचू लागले होते. काही वर्षांनंतर मणिपुरी कटात सामील असलेल्या क्रांतीकारकांना सोडून देण्यात आले. तेव्हा पुढे येऊन रामप्रसाद ह्यांनी इंग्रजांसमोर कबुली दिली.

शिवाय इथून पुढे कोणत्याच चळवळीत भाग न घेण्याचे वचन दिले. त्यांना मुक्त करण्यात आले. नंतर ते काँग्रेसमध्ये सामील झाले. तिथे त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाषणे दिली. काँग्रेसमध्ये गेले तरी विचार बदलले नव्हते. अहिंसेच्या मार्गाने काहीही होणार नाही असे त्यांचे म्हणणे असल्यामुळे काँग्रेसमध्ये त्यांची घुसमट होऊ लागली.

नंतर त्यांनी काँग्रेस सोडली आणि हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनमध्ये सहभाग घेतला. त्यांनी पुन्हा सशस्त्र मार्ग निवडल्यामुळे तसेच कार्य देखील सुरू झाले होते. एकदा ट्रेन लुटल्यामुळे त्यांना इंग्रजांनी शिक्षा दिली आणि ही शिक्षा त्यांच्या आयुष्यातली शेवटची शिक्षा ठरली.

फाशीची शिक्षा देत इंग्रजांनी रामप्रसाद बिस्मिल नावाचा क्रांतिकारी अध्याय संपवला होता. १९ डिसेंबर १९२७ रोजी गोरखपूरमध्ये रामप्रसाद बिस्मिल ह्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. आज त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याची आठवण करणे आपली जवाबदारी आहे. त्यांच्या जयंती निमित्त त्यांना शतशः नमन!
]]>
https://www.batmi.net/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a3-%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%95-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae/feed/ 0 26127
राजकारणातील घोडेबाजार म्हणजे काय? https://www.batmi.net/what-is-a-horse-market-in-politics/ https://www.batmi.net/what-is-a-horse-market-in-politics/#respond Sat, 30 Jul 2022 10:39:59 +0000 https://www.batmi.net/?p=26064 राज्यसभा, विधानपरिषद, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचं पद या सर्व पदांच्या निवडणुकीदरम्यान अनेक राजकारण्यांच्या तोंडी आपल्याला घोडेबाजार हा शब्द अनेकदा ऐकायला मिळतो.

पण घोडेबाजार म्हणजे नेमकं काय, हे आजवर अनेकांना माहित नाही. आजच्या लेखात आपण घोडेबाजार म्हणजे नेमकं काय, राजकारणात याचा काय अर्थ आहे, हा शब्द कुठून आला, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

घोडे बाजार म्हणजे काय ?

घोडे बाजाराचा साधारण अर्थ हा घोड्यांचा बाजार असाच आहे. केंब्रिज डिक्शनरीमध्ये याला हॉर्स ट्रेडिंग असं म्हंटल गेलं आहे. घोडे बाजारात घोड्यांची खरेदी-विक्री केली जाते.

घोडे बाजार शब्द कधी प्रचलित झाला ?

१८ व्या शतकात घोडेबाजार या शब्दाचा सर्वात जास्त वापर झालेला दिसतो. १८२० च्या दरम्यान परप्रांतात उच्चवर्गीय आपल्या करमणुकीसाठी घोडा विकत घेऊन किंवा त्यावर भरगच्च पैसे लावून घोड्यांच्या स्पर्धेत सहभागी होत.

या व्यापारातील नफा पाहून अनेक व्यापाऱ्यांनी घोडे बाजारात घोड्यांच्या विक्रीला सुरुवात केली होती. काही व्यापारी इतर काही व्यापाऱ्यांकडून कमी किंमतीत घोडे खरेदी करत आणि अधिक नफा कमवण्यासाठी घोड्यांची किंमत तिप्पट पटीने वाढवून विकत.

अनेक व्यापारी चांगल्या जातीचे घोडे लपवत आणि जास्त किंमत देईल त्याला ते घोडे विकत. मात्र कालांतराने घोडे बाजारात व्यापारी वर्ग करत असलेली ही चलाखी उघडकीस आली आणि व्यापारी वर्गात चढाओढ निर्माण झाली. त्यामुळे अठराव्या शतकापासून घोडेबाजार हा शब्द प्रचलित झाला.

भारतीय राजकारणात हा शब्द कधी आला ?

भारतात घोडेबाजार हा शब्द १९ व्या शतकात आल्याचं कळतं. साधारण ऑक्टोबर १९६७ मध्ये हरियाणातल्या हसनपूर विधानसभा मतदारसंघातले आमदार गयालाल यांनी एकाच दिवसात तीन वेळा पक्ष बदलला. आधी कॉँग्रेसला सोडून ते जनता पक्षात गेले नंतर ते पुन्हा कॉँग्रेसमध्ये आले.

काही तासांनी त्यांचं मत परीवर्तन झालं आणि ते पुन्हा जनता पक्षात गेले. त्यामुळे पत्रकार परिषदेत कॉँग्रेसचे नेते राव बिरेन्द्र यांनी गयालाल यांच्यावर टिपणी करत ‘आया लाल गया लाल’ असं वाक्य म्हटलं होतं.

ते वाक्य राजकारण्यांपासून ते सामान्य माणसांपासून सर्वांनी उचलून धरलं. महाराष्ट्रात गयालाल यांच्या कृतीवर भाष्य करताना त्याला घोडेबाजाराचा संदर्भ जोडला गेला.

राजकारणातील घोडे बाजाराचा अर्थ काय आणि घोडे बाजार का होतो ?

१. राजकारणात घोडेबाजार हा शब्द खासदार, आमदार अशा राजकीय उमेदवारांच्या लालचीपणासाठी वापरला जातो.

जेव्हा उमेदवार स्वत:चा फायदा पाहून सरकार अस्थिर करण्यासाठी इतर पक्षात प्रवेश करतात तेव्हा त्या उमेदवाराला घोड्याची उपमा दिली जाते आणि पक्षाच्या खेळीला बाजार असं म्हंटलं जातं.

२. दोन पक्ष दोन्ही पक्षाचा फायदा पाहत त्यावर अनौपचारीक चर्चा घडवून करार करतात आणि आपल्या उमेदवारांची अदलाबदल करतात किंवा काही उमेदवारांना पक्षातून काढत इतर पक्षातील उमेदवाराला त्याचा फायदा दाखवून आपल्या पक्षात घेतात याला देखिल घोडेबाजार असं म्हटलं जातं.

३. सत्ता मिळवण्यासाठी पक्षाकडे बहुमतांचा आकडा कमी असेल तेव्हा विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचं काम पक्षातून केलं जातं. यावेळेस दोन पक्षात चांगलाच अटीतटीचा सामना राजकारणातील घोडेबाजारात रंगलेला दिसतो.

४. राजकारणातील घोडेबाजारात केवळ राजकीय पक्ष, राजकीय नेतेच सहभागी नसतात तर पॉवर ब्रोकरही सहभागी असतात. पॉवर ब्रोकर हे राजकारणातील घोडेबाजारात नेत्याला दुसऱ्या पक्षाचं आमिष देतात आणि पक्षाकडून नफा कमवतात.

५. राजकारणातील अनेक गोष्टी या सर्वसामान्य लोकांपर्यंत न पोहोचण्याची योग्य खबरदारी घेतली जाते. राजकरणातील घोडेबाजारात घोड्यावर लावलेली रक्कम लाखांच्या, कोटींच्या घरात असते. स्थानिक पातळीवर ही रक्कम काही हजारांवरही लावली जाते.

घोडे बाजार म्हणजे अपमान आहे का ?

अनेक जण असाही विचार करतात की, उगाच त्या घोड्यांना बेईमान नेत्यांची उपमा का द्यायची किंवा काही जण नेत्यांंना घोडा म्हणून हिणवलं यासाठी आक्षेप घेतात. सामाजिक माध्यमांवर या दोन्ही गोष्टींचा राग काढला जातो पण हे दोन्ही विचार चुकीचे आहेत.

घोड्यांचा अपमान व्हावा किंवा नेत्यांचा अपमान व्हावा असा त्याचा अर्थ नाही. व्यवहारात असे अनेक शब्द रूढ होत जातात हा शब्द त्याचेच एक उदाहरण आहे.

तर ज्यांना राजकारणात रस आहे अशा आपल्या मित्रमैत्रिणींना हा लेख पाठवा. तुम्हालाही या लेखातील माहिती कशी वाटली, हे कमेंटमध्ये नक्की सांगा.

]]>
https://www.batmi.net/what-is-a-horse-market-in-politics/feed/ 0 26064
‘या’ ५ गोष्टी कधीही समोरच्याला बोलून दुखावू नका… https://www.batmi.net/never-hurt-others-by-saying-these-5-things/ https://www.batmi.net/never-hurt-others-by-saying-these-5-things/#respond Sat, 30 Jul 2022 09:55:22 +0000 https://www.batmi.net/?p=26062 कधी चुकून तर कधी मुद्दाम ठरवून इतरांना काहीतरी वाईट आपण बोलून जातो. तूझा पगार किती कमी आहे, तुझा प्रेमभंग का झाला, तुझं लग्न कसं काय मोडलं, तुझ्या ओठांचा आकार असा विचित्र का आहे अशा कितीतरी गोष्टींवर गरज नसताना बोलण्याची अनेकांना सवय असते.

अशा गोष्टी बोलणं आपण प्रकर्षाने टाळलं पाहिजे. आणखी नेमक्या कोणत्या गोष्टींवर कधीही बोलू नये हे या लेखातून आपल्याला जाणून घेता येणार आहे.

१. जन्मतः लाभलेल्या गोष्टींबद्दल चेष्टा करू नये.

प्रत्येकाला जन्मतःच अनेक गोष्टी लाभलेल्या असतात. आपलं दिसणं, आपल्या शरीराची रचना याबरोबरच काही लोकांना जन्मतःच व्यंगदेखील सोबत आलेले असतात. त्या व्यंगांमुळे किंवा ठराविक पद्धतीने दिसण्याविषयी अपेक्षा पूर्ण होत नसल्याने अनेकांमध्ये न्यूनगंड आलेला असतो.

जेव्हा आपल्याला ही परिस्थिती कळते तेव्हा आपण अशा लोकांची अजिबात चेष्टा करु नये. कोणाच्याही व्यंगाचा विनोद करु नये.

आपल्या विनोदामुळे, चेष्टा करण्याच्या स्वभावामुळे त्या व्यक्तीच्या मानसिक, भावनिकतेवर घाला घातला जाऊ शकतो. ती व्यक्ती दुखावली जाऊ शकते याची जाण आपण ठेवली पाहिजे.

२. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलणं टाळावं.

प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी असते. एखाद्याकडे गडगंज संपत्ती असते तर दुसरा कोणी दैनंदिन गरजा भागवण्यासाठीही संघर्ष करत असतो. एखादा चांगली कमाई करत असूनही जबाबदारीमुक्त असू शकतो तर दुसरा कोणी थोड्या कमाईतही मोठी जबाबदारी पेलत असतो.

या सगळ्यानुसार ज्याची – त्याची भौतिक सुखांची जीवनशैलीही ठरत असते. याचा संवेदनशीलपणे विचार आपण केला पाहिजे. कधीही कोणाला त्याची आर्थिक मिळकत विचारु नये. कमी लेखू नये.

जो – तो आपल्या परिस्थितीनुसार जगत असतो हे समजून घेत प्रत्येकाचा सन्मान आपल्याला करता आला पाहिजे. तसंच स्वतःचा आर्थिक मोठेपणा दाखवणंही टाळावं.

३. राजकारणातील संवेदनशील मुद्दे काळजीपूर्वक बोलावे.

राजकारणावर बोलणं हा तर सध्या अतिशय संवेदनशील विषय बनला आहे. अगदी घराघरांमध्ये राजकारणाच्या मुद्द्यांनी वाद पेटवले आहेत. राजकारणातील एखादा ठराविक पक्ष आणि ठराविक व्यक्तीप्रती इतकं मोठं समर्पण वाढलं आहे की त्यासाठी आपल्या जवळच्या माणसांशी भांडणं करायलाही अनेकजण तयार असतात.

राज्यातल्या राजकारणाने तर अनेक मित्रांचं रुपांतर शत्रुंमध्ये केलं आहे. हे सगळं टाळण्याची गरज आहे. छान गप्पा रंगलेल्या असताना, आपल्या जवळच्या लोकांशी बोलत असताना राजकारणातल्या संवेदनशील मुद्द्यांवर, ज्यातून वाद होतील अशा मुद्द्यांवर बोलणं प्रकर्षाने टाळावं. कोणाच्या भावना दुखावतील असं काहीच बोलू नये.

४. इतरांच्या परंपरा, चालीरीती यावर नकारात्मक चर्चा टाळावी.

कधी ध्यानीमनी नसताना तर कधी जाणूनबुजून इतरांच्या घरातील पद्धती, चालीरिती, संस्कृतीवर आपण बोलत असतो. एखाद्या पदार्थात आपल्याकडे गुळ घालत असतील आणि दुसऱ्यांकडे साखर घालत असतील तर साखर घालणं कसं चुकीचं आहे आणि साखर चव कशी बिघडवते म्हणत समोरच्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न कधीही करु नये.

प्रत्येकाचं वेगळेपण आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. काही जुन्या चालीरिती असतील तर आपण त्याकडे तटस्थपणे बघावं. या चालीरिती सोडून द्याव्या की नाही हा त्या घराचा, व्यक्तीचा वैयक्तिक मुद्दा आहे याची जाण ठेवत वाद निर्माण होतील असा संवाद तिथे टाळावा.

५. समोरच्याच्या आयुष्यातली दुखरी बाजू उघड करू नये

प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुखरी बाजू असतेच. कोणी वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करुनही यश मिळवू शकलेला नसतो, तर कोणाला आपल्या प्रेयसीवर जीव ओवाळूनही तिची सोबत आयुष्यभरासाठी मिळालेली नसते.

एखाद्याच्या हातून चांगली नोकरीची संधी गेलेली असते. व्यक्ती तितके दुःख आणि तितक्याच त्यांच्या दुखऱ्या बाजू. काही जणांना उगाच समोरच्याच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवण्याची सवय असते. त्यातूनही असुरी आनंद घेण्याचा प्रयत्न केला जातो.

पण एक चांगलं, संवेदनशील व्यक्तीमत्व कधीही अशी चूक करणार नाही. आपणही ही बेसिक नैतिकता जपली पाहिजे.

एखादा विषय काढल्याने समोरचा त्रस्त होतो हे आपल्याला माहित असेल तर त्या विषयांवर बोलणं आपल्याला टाळता आलंच पाहिजे.

या सगळ्या मुद्द्यांचा शांतपणे बसून विचार केला तर आपल्यालाही त्यातलं गांभीर्य लक्षात येईल. कधीकधी समोरच्यावर राग दाखवण्यासाठी त्याच्या आयुष्यातल्या वाईट प्रसंगांवर आपण बोलत बसतो.

यातून आपलंच व्यक्तिमत्व समोरच्या व्यक्तीच्या नजरेत दूषित होतं. त्यामुळे कधीही लेखात सांगितलेल्या गोष्टींवर बोलू नये.

]]>
https://www.batmi.net/never-hurt-others-by-saying-these-5-things/feed/ 0 26062
सतत लॅपटॉपवर काम करताना डोळ्यांची काळजी कशी घ्यावी? https://www.batmi.net/how-to-take-care-of-eyes-while-constantly-working-on-laptop/ https://www.batmi.net/how-to-take-care-of-eyes-while-constantly-working-on-laptop/#respond Sat, 30 Jul 2022 09:48:59 +0000 https://www.batmi.net/?p=26058 बापरे! डोळे किती लाल झालेत… डोळ्यांची भयंकर आग होतेय!.. कुठे बघवतही नाही, एवढे डोळे चुरचुरतायत!.. ही अशी वाक्य रोज तुमच्या तोंडी असतात का? डोळ्यांना एवढा त्रास होत असताना काम करण्यासाठी रोज लॅपटॉप समोर बसावचं लागतं का? जर तुमचं उत्तर हो असेल तर डोळ्यांच्या बाबत निष्काळजीपणा महागात पडू शकतो.

सतत लॅपटॉपवर काम करत असताना डोळ्याची आपण विशेष काळजी घ्यायला हवी. त्यासाठी काय करायचं, हे जाणून घेऊया आजच्या लेखात.

१. प्रकाशाची व्यवस्था कशी असावी?

आपण ज्या ठिकाणी लॅपटॉपवर काम करायला बसतो त्या ठिकाणी योग्य प्रकाश असणं महत्त्वाचं आहे. कारण आपल्या आजूबाजूला अधीक तीव्र प्रकाश असेल किंवा अगदीच काळोख असेल तर त्यामुळे लॅपटॉपवर काम करताना आपल्या डोळ्यावर जास्त ताण येऊ शकतो.

त्यामुळे आपण जिथे बसत आहोत तिथे योग्य प्रमाणात प्रकाश असणं महत्त्वाचं आहे. आपल्या लॅपटॉपचा ब्राइटनेस अगदीच जास्त किंवा अगदीच कमी असता कामा नये नाहीतर त्यानेही डोळ्यावर ताण येऊ शकतो.

२. डोळ्यांचा मसाज –

सतत लॅपटॉपवर काम करत असू तर दिवसातून साधारण दोन वेळातरी आपण डोळ्यांचा मसाज करायला हवा.

मसाज करण्यासाठी हातावर ॲलोव्हेरा जेल घेऊन अनामिकेने (करंगळीच्या बाजूचं बोट) डोळे बंद करून डोळ्यांच्या बुबुळांच्या ठिकाणी उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे असा घड्याळाकृती पद्धतीत मसाज करा.

त्याने सतत लॅपटॉपकडे बघून आपले ताठरलेले डोळे जड वाटणार नाहीत. डोळ्यांना सूज येणार नाही. रोज दहा मिनिटे हा मसाज करावा.

३. स्क्रीनची वॉलपेपर सेटिंग अशी करा –

स्क्रीनवर आपण आपल्या आवडीनुसार वॉलपेपर लावतो पण तज्ञ सांगतात की, स्क्रीनवर कधीही हिरवा, नीला, पिवळा असे डोळ्याला टोचणाऱ्या रंगाचे वॉलपेपर लावू नये.

वॉलपेपर फिकट रंगाचा असावा. सोबतच स्क्रीनवरची अक्षरं ही सामान्य फॉन्टमध्ये असावीत. अक्षरांचा आकार ही अधीक मोठा किंवा अधीक छोटा नसावा.

४. २० – २० – २० चा फॉर्म्युला –

हा फॉर्म्युला अगदी सोप्पा आहे. आपण २० मिनिटे लॅपटॉपवर काम केल्यानंतर आपल्यापासून २० फुट दूर असलेल्या कोणत्याही गोष्टीकडे २० सेकंदासाठी पहायचं याने डोळ्यांना स्क्रीनचा त्रास होत नाही.

५. अंतर किती असावं –

लॅपटॉपवर सतत काम करत असताना आपल्यात आणि लॅपटॉपमध्ये तीन फुटाचं अंतर ठेवा. जर ते शक्य नसेल तर दूसरा किबोर्ड घ्या आणि तो लॅपटॉपला जोडा म्हणजे लॅपटॉप योग्य अंतरावर ठेवून आपल्याला काम करता येईल आणि डोळ्यांना त्रासही होणार नाही.

६. चांगल्या डोळ्यांसाठी हे करायला हवं –

लॅपटॉपवर काम करता करता अनेकांना काही खाण्याची सवय असते. आपण एका हाताने खातो आणि तोच हात कसा तरी पुसुन पुन्हा किबोर्डला लावतो. त्यामुळे किबोर्डवर जंतु निर्माण होतात. किबोर्डला लावलेला तोच हात आपण डोळ्याला लावला त्यामुळे डोळ्याला खाज येणं, डोळ्यातून पाणी येणं.

डोळ्यांच्या कडांना फोड येणं सुरू होतं त्यामुळे लॅपटॉप वापरताना डोळ्याला हात लावणं टाळा. डोळ्यांना हात लावण्याआधी हात साबणाने स्वच्छ धुवा. लॅपटॉप वेळोवेळी मऊसूत कापडाने स्वच्छ करा.

७. डोळ्यांचा ओलावा कायम ठेवण्यासाठी –

सतत लॅपटॉपवर काम केल्यामुळे आपल्या डोळ्यांना कोरडेपणा येतो आणि डोळ्यांची आग होते त्यासाठीच लॅपटॉपवर काम करताना दर एक दोन तासाने आपल्या डोळ्यांवर पाणी मारणं हे डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं शिवाय डोळ्यांचा ओलावा टिकून राहतो डोळे चुरचुरत नाहीत किंवा डोळा येणं किंवा रांजनवाडी येत नाही.

८. लॅपटॉपची सेटिंग –

लॅपटॉपच्या स्क्रीनपासून आपल्या डोळ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवर ॲटी रिफ्लेक्शन काच लावून घेऊ शकतो. विशेष करून ज्या लोकांना चष्मा असतो त्या लोकांसाठी हा चांगला पर्याय आहे कारण स्क्रीनचा प्रकाश चष्म्यावर परावर्तित होत नाही.

९. व्यायाम महत्त्वाचा –

जेव्हा आपलं लॅपटॉपवरचं काम होईल तेव्हा एक अर्धातास शांत बसा. डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या. दोन्ही तळहात एकमेकांवर घासून डोळ्यावर ठेवा. डोळे वर–खाली, डावीकडे-उजवीकडे फिरवा. गोलाकार फिरवा. आपल्या नाकाच्या टोकाला तीनचार सेकंद पाहणं असे रोज डोळेचे व्यायाम करा.

१०. चष्मा असेल तर लावा –

अनेक लोक लॅपटॉपवर काम करताना चष्मा असूनही तो लावत नाही पण त्याने आपल्या डोळ्याचा नंबर वाढण्याची शक्यता जास्त असते.

चष्म्यामुळे आपल्या डोळ्यांच्या बुबुळांना सुरक्षित ठेवता येतं आणि डोळ्यावर ताण येऊन डोळे आणि डोकं दुखत नाही.

तर या आहेत काही गोष्टी ज्या काटेकोरपणे पाळून आपण डोळ्याची चांगली निगा राखू शकतो आणि लॅपटॉपवर उत्तमरीत्या कामही करू शकतो.

तुम्हाला हा लेख कसा वाटला हे नक्की सांगा आणि रोज लॅपटॉपवर काम करणाऱ्या आपल्या मित्रपरिवाराला हा लेख पाठवायला विसरू नका.

]]>
https://www.batmi.net/how-to-take-care-of-eyes-while-constantly-working-on-laptop/feed/ 0 26058
पावसाळ्यात ‘असे’ जपा आपले आरोग्य… https://www.batmi.net/take-care-of-your-health-like-this-during-monsoon/ https://www.batmi.net/take-care-of-your-health-like-this-during-monsoon/#respond Sat, 30 Jul 2022 09:38:43 +0000 https://www.batmi.net/?p=26054 पावसाळा आता जवळ आला आहे. या ऋतूमध्ये तब्येतीची काळजी घेणं फार आवश्यक आहे. सतत बरसणारा पाऊस हा अनेक आजारांना आमंत्रण देतो.

पावसाळ्यात थोडं जरी निष्काळजीपणाने वागलं तरी आपल्याला आणि मुलांना आजारपण येऊ शकतं. म्हणून लहान मुलांचे व स्वतःचे आरोग्य चांगले रहावं यासाठी या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

सतत स्वच्छता राखा:
पावसाळ्यात पाणीच पाणी चहूकडे अशी परिस्थिती असल्यामुळे सगळीकडे चिखल किंवा घाण झालेली असते. अशा परिस्थितीत घरात त्याच पायांनी येतो, म्हणून घरात सतत स्वच्छता राखायला हवी. बहुतांश वेळा आपण आणि घरातील बाकी सदस्य फरशीवर बसतात त्यामुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते.

म्हणूनच घरातील फरशी वरचेवर पुसली जाणं आवश्यक आहे. वेळोवेळी, फरशीला डेटॉल सारख्या निर्जंतुक करणाऱ्या रसायनाने धुवायला हवं. जेणेकरून फरशीवर कोणत्याही प्रकारचा संसर्ग पसरणार नाही.

पावसात भिजलात तर लगेच कोरडे व्हा:
पावसामुळे वातावरण खूपच गार होऊन जातं. तसेच हवेत अपेक्षित सूर्यप्रकाश नसतो म्हणून जीवाणू-विषाणू यांचा नायनाट न होता त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. ऋतुबदल झाल्यामुळे आपली प्रतिकारक शक्ती थोडी कमी होते.

म्हणूनच पावसाळ्यात वरचेवर ताप, सर्दी, खोकला, होत राहतो. यासाठी पावसाच्या पाण्यात शक्यतो भिजू नये. जर पावसात भिजलो तर गरम पाणी हात-पायांवर ओतावं आणि हात पाय धुवून घ्यावेत.

अंग व केस लगेच कोरडे करून घ्यावेत कारण जर केसात पाणी राहत असेल बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. तसेच ओले कपडे घातल्याने रॅश होतात किंवा ओल्या कपड्यामुळे सर्दीचा त्रास होऊ शकतो.

पाणी उकळून प्यावं:
पावसाने पाणी दूषित होतं. दूषित पाण्यामुळे संसर्ग होत असतो. आणि पोटाचे विकार होऊ शकतात. जंतूसंसर्गापासून रक्षण व्हावं पाणी उकळून प्यावं. निर्जंतुकीकरण करण्यासाठी तुरटी व ठराविक रसायने मिळतात त्यांचा वापर करावा.

डासांपासून सावध रहा:
पाऊस मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया सारखे साथीचे आजार आणतो. याचं कारण म्हणजे पावसाळ्यात साठलेल्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होते. म्हणूनच घरात आणि आजूबाजूच्या परिसरात डासांची संख्या वाढू देऊ नका.

घरात अंगणात कुठेही पाणी साचत असेल तर ते वेळीच काढून टाका. मच्छरदाणी, डासांपासून रक्षण करणारे क्रीम लावून झोपत जा.

घरचंच अन्न खावं:
या ऋतूत थंडावा असल्यामुळे बाहेर उघड्यावर असणारे वडा, भजी सारखे चमचमीत पदार्थ खाणं आपल्याला अपायकारक ठरू शकतं. या ऋतूत जीवाणूंना पोषक ओलावा वातावरणात असल्याने साठवलेल्या अन्नावर जीवजंतू लवकर वाढतात, त्यामुळे साठवलेलं अन्न खाऊ नये.

तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मोसमी फळे खावीत. आरोग्य राखण्यासाठी आपल्या घरातलं अन्न तसेच डाळिंब, जांभूळ, पीच, प्लम(अलुबुखार), नासपाती (पेअर) अशी फळे खावीत. पावसाळ्यात हे उपाय करा आणि मनसोक्त व निरोगी राहून पावसाळा सर्वांनी एन्जॉय करा.

]]>
https://www.batmi.net/take-care-of-your-health-like-this-during-monsoon/feed/ 0 26054